डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

10 वी 12 वी बाबत नियमावली....परीक्षा

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२



कार्यवाहीचा तपशील


प्रकटन


महाराष्ट्र राज्यमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी शासन व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करूनसदर परीक्षांचा कालावधी व स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. तसेच परीक्षा सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी काही विशेष उपाययोजना राबविण्यात येत

आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

 १. परीक्षेचा कालावधी प्रचलित पद्धतीनुसार इ. १२ वी ची परीक्षा २० फेब्रुवारी दरम्यान व इ. १० वीची परीक्षा ०१ मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. इ. १२ वी लेखी परीक्षा दि. ०४ मार्च २०२२ ते दि. ३० मार्च २०२२


श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते दि. ०३ मार्च २०२२ इ. १० वी लेखी परीक्षा दि. १५ मार्च २०२२ ते दि. ०४ एप्रिल २०२२ श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. २५ फेब्रुवारी २०२२ ते दि. १४ मार्च २०२२


२. विद्यार्थी संख्या सद्यस्थितीत मंडळाकडे परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी इ.१२वी- १४,७२,५६२ इ. १० वी १६, २५,३११


३. विषय माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या


मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. इ. १२ वी विषय १५८, विज्ञान शाखा माध्यम ०४ इतर शाखा माध्यम ०६ प्रश्नपत्रिका संख्या ३५६ इ. १० वी विषय ६० माध्यम ०८, प्रश्नपत्रिका संख्या १५८


४. परीक्षेत विविध घटकांचा सहभाग -


सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, मुख्य नियामक नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे १.७५ लक्ष घटकांचा समावेश असतो.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्याथ्र्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता प्रचलित ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.


१. परीक्षा केंद्रे


प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. तथापि गदर परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तेथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. त्यामुळे त्यांना परिचित वातावरण मिळून परीक्षा देण्यास सुलभता वाटेल. तसेच परीक्षेसाठी कमी प्रवास करावा लागेल.


२. परीक्षेची वेळ -


विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ तसेच ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.


३. अभ्यासक्रम -


कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात २५% कपातकरण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन ७५% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.


४. प्रात्यक्षिक परीक्षा


कोबिड १९ च्या प्रादुर्भावामुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिककार्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलतदेण्यात आलेली आहे.


इ. १२वी प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. इ. १० वी शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल.


किमान ४०% च्या मर्यादेतशाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेसाठी प्रयोग निवडण्याची लवचिकता असेल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहि:स्थ परिक्षक संबंधित शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधून नियुक्त करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. परीक्षांचे नियोजन व सबमिशन गटनिहाय केले जाईल.


५. तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा दिली आहे.


६. विशेष सवलत


कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन प्रात्यक्षिक / सबमिशन करून शकल्यास लेखी परीक्षेनंतर इ. १० वी आणि इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.


४ टिप्पण्या:

लता राधाकिसन पाथ्रीकर म्हणाले...

नमस्कार मी औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव पायी जाताना विना इन्श्योरन्सवाल्या गाडीने उडवले म्हणून दोन्ही पायांनी कायमचे अपंग अवलंबून व बेरोजगार पती ची सामाजिक न्याय मंत्रालयाचे युनिक डिसेबिलिटी कार्ड नुसार पत्नी नाते पालक होते आता 11/ 11/2020पासून अपंग बेरोजगार पती ची पेन्शन न घेणारी विधवा शिक्षिका कर्मचारी पत्नी सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय,घर व शाळा दोन कुटुंब सांभाळणारी कोरोनाकाळात पाचपट भाडे देतोय, प्रभारी मुख्याध्यापिका ( जिपप्राशा सातारा तांडा,ता.औरंगाबाद)आहे.मुलगी दहावी सीबीएसई त व मुलगा बारावी स्टेटबोर्ड ला आहे.निदान विधवा विधुर सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय यांना लेकरांसाठी वार्षिक परीक्षा पुरत्या तरी रजा लगेच पगार निघेल अशा बालसंगोपन इ रजा मिळाव्या ही कळकळीची विनंती.एका पगारावर घर तरी विधवा भरतात आयकर.ती सूट द्या.मागे कुटुंबात जिवंत नाही कमवतेचा प्रश्नच नाही.अपंगपतीनावे असलेली टु थ्री फोर व्हीलर वाहने अपंग व विधवा दोघे संवर्ग एक मध्येच येतात,ती टू इन वन वाहने पुन्हा सेटिंग बदलची आवश्यकता नाही.हातांत ब्रेक गिअर साठी साठ हजार रुपये लागले कारण ते अपंग बेरोजगार होते तेच अपंग कर्मचारी तर स्वस्तात होते.पुन्हा विधवांना खर्च नको व रोड टॅक्स सवलत सह ती वाहने विधवा पत्नींच्या नावे सहज व्हावी तरती उपयोगात येतील व रोजचे येजासाठीलागणारा खर्चात एखादा कुशल बेरोजगार ड्रायव्हर चे घर चालेल शासनासही नियमित इन्योरन्स मिळेल.तसेच, अपंग असलेला कर्मचार्याचा जोडीदार मोठ्या प्रयत्नाने आमच्या स्ववेदनेतून हिरकणी धाडसाला छत्रपतींसारखा न्याय देणार्या मान्यवरांचे आभार तर यांमुळे जीआर मध्ये आला.पदोन्नतीत अपंग जोडीदार असलेले आधी घ्यावे, जोडीदार चे जागेवर सगळे तेच करतात,अपत्य बहीण भाऊ यांचे कुणीही करेल,दत्तक देता येईल,पण जोडीदार पती-पत्नी नाते पालक यांना व्यवसाय कर सूट कर्मचारी भत्ता वाहन रोड टॅक्स घरखरेदी सवलत आयकर सूट प्रवास सूट मतदान जनगणना ड्युटीसुट कोरोना काळात घरून कामाची मुभा मालमत्ता पाणीपट्टी अकृषक कर सूट ग्लास द्यावे.जोडीदार अपंग पण कर्मचारी नव्हते मी कर्मचारी पण अपंग नाही म्हणून दोघेही वंचित सवलतींपासून.जी पेन्शन त्यांना दिली असती तीच पेन्शन आयुष्यभर विभागून दोन अपत्य यांना देण्यात यावी एक कर्मचारी एकदा पेन्शन.व विधवा विधुर चे लेकरांना तीस किमी आत भलेही आमच्यासारखे पदव्युत्तर पर्यंत चे सगळे ए ग्रेड पण शिक्षण सेवक सारखे नोकरी घ्या, विधवा विधुर स्वतंत्र पदोन्नती यादी असावी.सीबीएस इ वावरतानाही दहावी बारावी चे क्रीडा गुण स्टेटबोर्डसारखी नोंद करता यावी.मुलाला दहावी सीबीएसई त तलवार बाजी राज्य स्तरीय दोन मेडल व प्रमाणपत्र आहेत. माझेमाजी सैनिक वडील ही 23/1/ 2021ला देवाघरी गेले. अमृतमहोत्सवी वर्षात पणतू नोकरी त लागताहेत तरी शिक्षक जीआर , पदोन्नती त माजी सैनिक पाल्य नाही आले अजून.. अविवाहित अवलंबून न कमवते बेरोजगार एकवीस व मतिमंद अॉस्टोमी इ.प्रकारचे अपंग विशेष लेकरांचे पालक दोघे नोकरी वाले 20%शिक्षक इ.कर्मचारी बांधव आहेत .. अपंग जोडीदार चे पालक आधी , नंतर अठरावर्षे पर्यंत चे असे अपत्य अविवाहित अवलंबून बेरोजगार अपंग बहीण भाऊ यांचे पालक विचारात घ्यावे.तसेच, पतीची पेन्शन न घेणार्या विधवा 5%असतील, अपंग बेरोजगार पती ची विधवा मी एकटी..तसेच पेन्शन न घेणारे विधुर ही अल्पसंख्य आहेत.पदोन्नती,बदलीत विधवा तसे विधुर समान न्याय द्यावा.आईवडील दोघे सारखेच महत्त्वाचे असतात.पतीपत्नी दोघे एका लेकरासाठी संवर्ग दोन व संवर्ग एक मध्ये बदली विशेष क्रीडा रजा बालसंगोपन रजा,सव्वा लाख रुपये आयकर सूट तीस किमी आत विचारात घेतात दोन घरभाडे दोन कर्मचारी म्हणून देताद्या, अपंग कर्मचारी मागे कुटुंबात जिवंत कमवते धडधाकट असूही शकते पण त्यांना विवाहापासून उद्यैगापर्यंत खंबीर साठी हात देता द्या, तसेच होर्डिंग्ज वर महिलांचे सत्कार आयुष्यात प्रश्नांचा भडीमार विधवा विधुर चा अपंग कर्मचारी सारखे आर्थिकलाभ भत्ते प्रवाससूट साठी विचार व्हावा.सेवाज्येष्ठता, शिक्षण वय खूप लहान तरी पगार मोठे आहेत द्या,आमचाही विचार करून पहावे.मरण फक्त कोरोनाने नाही मयत सगळे पुरुष कर्मचारी नाही .अपंग बेरोजगार पती गेले माजी सैनिक वडील गेले अल्पभूधारक सासरे तिघेही कोरोनाकाळात कोरोनाने नाही, देवाघरी गेले निदान मयतनंतर तरी पन्नास हजार रुपये लाभ मिळावा.

लता राधाकिसन पाथ्रीकर म्हणाले...

अपघातानंतर वर्षांनंतरच मिळते अपंग प्रमाणपत्र सहा महिन्यांत क्लेम कशाच्या आधारावर करणार..जिथे तिथे कायदे तफावत.. दोन्ही पायांनी कायमचे अपंग, एकमेव विमा आहे पतीचा, अजूनही कपात सुरू आहे 2014/15पासून शेवटपर्यंत चकरा मारल्या, दोन्ही पायांनी कायमचे अपंग होते ते अपघाताने..आता मयतनंतरतरी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना चे बारा रूपये वार्षिक कपात चे दोन लाख रुपये लाभ कायमचे अपंग व मयत दोन्ही झाले ते दोन लाख रुपये आतातरी मिळावे.उडवले त्याने आजवर एक रूपया ही लाभ नाही दिला.. अपंग प्रमाणपत्र, युनिक डिसेबिलिटी कार्ड व मृत्यू प्रमाणपत्र एवढे पुरावे पुरे..हे खरेच आहे.एकटी केस तरी लाभ नाही मगहा विमा कुणाला दिला असेल? वकील जिवंत तोवर तारीख पे तारीख सुरू राहील..आमचे प्रमाणपत्र सन्मानाने मिळावे.साधी शिलाई मशीन ही नाही मिळाली पतीला.. अपंग बेरोजगार च्या लेकरांना, सिंगल पॅरेंट च्या लेकरांना गणवेष,स्वस्त धान्य जरी मिळाले तरी पुरे..शिकतो त्यास शिकू द्या.मला संस्कृतसेटला 40+54गुण आहे पण पात्र नाही.एम पी एस सी पर्यंत अपंग सारखे विधवा विधुर यांना ही फीस सूट पासून उत्तीर्ण गुण मध्ये सवलत असावी.शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथूननियमित पूर्णवेळ बीएड केंद्रीय सीईटी ने सात वर्षे सेवा नोंद करून मेरिट गुणांवर केलेले आहे ती285दिवस एकेक तासाची उपस्थितीघेतात, उपस्थिती प्रमाणपत्र आहेपण 285दिवस बिनपगारी रजा लागली एक वेतनवाढ सहाव्या वेतन आयोगाने गेली ती अध्ययनरजा जीआर नुसार प्रशिक्षण रजा मोजून कुणाचाच तोटा नाही.तीन जिल्हा बॉण्ड्री वरील शाळेत लेकरं सहावी आठवीचे पती अपंग आजारी जागेवर तरीअर्जित रजा 99गेल्याती बालसंगोपन रजा हवी. सिटी अलाउन्ससह शाळा तर दहा-बारा वर्षे जिल्हा बदली वाले सहज राहतील, तीन जिल्हा बॉण्ड्री वरही जिल्हा बदलीवाले एकल , खाजगी संस्थेतून जिपत आलेले एकल शिक्षक आहेत,ते दहा वर्षे कसे जगतील?एकल दोघे सारखेच मनलावून काम करतात घरभाडे घेतात टॅक्स भरतात, संकटकाळात पगार देशासाठी कपात करतात, विचार ही सर्वांचा व्हावा.तीन वर्ष अट पुरे.एकेक दिवस मोजून काढले,तीसेवा धरतातच, पुन्हा तिथून आलेल्यांना अवघड क्षेत्रात तीन वर्ष सेवा अट नको. एका तालुक्यात, सिटी अलाउन्ससह एक पदवीधर बदलीत दरवेळी उडतो हा अनुभव...कला क्रीडा विशेष शिक्षक जोडीदारासह ही पंधरा वर्षे ही राहतात, टोकाच्या शाळांत परिसरांतही ही गुणवंत खेळाडू चित्रकार आहेत, स्थानिक शिक्षकास तिथे प्राधान्य दिले तरी चालेल. आमचे जोडीदार कमवते नव्हते म्हणून कायम टोकाच्या शाळा खिसा खुळखुळा हाडांचा चुरा करत तिसरी पिढी होरपळते आहे..

लता राधाकिसन पाथ्रीकर म्हणाले...

केंद्रीयसीईटीने असे पात्रविनाआरक्षणविनासवलतपात्रअसे आजवरनाहीभेटले.तो एकवेतनवाढकलंकपुसलाजावा.वतो पगार मिळावा.खाजगीअर्धवेळशिफ्टवालेशक्तिमाननव्हतेदोन्हीकडेहजर पाचमहिन्यांतपदवीपदोन्नतीवेतनवाढघेतली काहींनी,2007/08ला वाहनेहीनव्हतीएकातालुक्यातूनटोकाच्याशासकीयमहाविद्यालय औरंगाबादलासाततेबारा शाळा बारातेपाचशाळा व पाचतेआठ बीएड एमएड पीएचडी करायला..अर्धीशाळा करूनच निघावे लागे.. अर्धवेळनियमिततरीअर्धीरजानाहीजशीपूर्णवेळनियमित माझी 285दिवस गेली..99%लाभार्थी , एक रूपया नुकसान नाही कुणाचेच..एक टक्का मेरिट मुळे माझा तोटा..तेव्हाच शाळेची विद्यार्थिनीनवोदयलालागलीहोतीसंस्कृत सुरूसाठीप्रस्तावहीगावानेदिलाहोता जिप कर्मचारी क्रीडा अंकात माझालेखहीप्रसिद्धझालाहोता फुलंब्रीहायस्कूलचामाझा 1विद्यार्थी माझ्यासारखादहावीला संस्कृतला 100/100गुणधारक होता, साक्षर आईवडीलांचीव पती मुळे मराठा समाजातील पहिली एम ए संस्कृत महिला, बीएड पर्यंत सगळे ए ग्रेड, मी तसे व
आजवर चार तालुके सात शाळा यात माझे प्रत्येक शाळेचे लेकरं स्टाफ सहकार्याने गुणवंत आहेत.माझीरजा शाळागाव विद्यार्थी साठी फायदेशीर च होती, आहे ती प्रशिक्षण रजा असावी.तो जीर याच साठी असेल.सेवानोंद कॉलम सीईटी फॉर्ममध्ये यासाठीच असेल.फक्त दोन्ही सिझेरियनव कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया स्वतःवर सेल्फ प्रमोटर केस माझी घाटी औरंगाबाद येथून च आहे, अडीच महिने तान्हे पासून पतीने लेकरं सांभाळले,बी एड काळात मुलीला दूध पाजून जगवण्यापुरती सवलत मला तेथील आदरणीय प्राचार्य व गुरूवर्यांनी दिली होती खूप आभार..,एम एस सी आय टी ही जुलै 2007ला च केले आहे.
गंभीर आजारी पत्नी तर शिक्षक पतीला रजा आहे पण सहावी आठवीचे दोन्ही लेकरं,पती दोन्ही पायांनी कायमचे अपंग अवलंबून बेरोजगार आजारी जागेवर बेडवरहोतेघरी तरी मला बालसंगोपन रजा तीन जिल्हा बॉण्ड्री वरील शाळेत नाही मिळाल्या 99रजा अर्जित गेल्या..पाच वर्षं अपघातापासून पोतंभर सगळे विभाग अपंग महिला बालकल्याण शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय सगळे न्याय मिळायला हवा म्हणत पण मंत्रालयात अर्ज दिलाबदली नंतर तो अर्जित चा पगार निघाला.. मंगळसूत्र मोडूनकसेतरी न ऊ महिने जगलो..आता दोन अपत्य यनंतर अबॉर्शन रजा घेणारेही दिसतात,एवढी गंभीर अडचण असू नये, असेलही कुणाची, बालसंगोपन रजा घेणारेही दिसतात बरेच..तिथेही बालसंगोपन रजा यात अपंग बेरोजगार पती चा उल्लेख असावा.नवरा मोठा असतो तर जागेवर सगळं लेकरं लहान तर पत्नीच करेल ना.. दोन्ही डिलिवरीवेळी पतीने जागेवर खाऊ पिऊ घातले, तान्हे लेकरं माऊली होतजगवले, अपघात कुणा हाती नाही..त्यांना गरज तर मी नोकरी च्या गावाला कशी जाऊन राहणार? दोन हजार रुपये भाडे रोज देऊ शकत नव्हतो 206किमी अंतर रोज वाहनेच नव्हती अपंग कर्मचारी व पतीपत्नीस घराजवळ,तीस किमी आत ती शाळा त्यांना सोप्या क्षेत्रातच वाटेल ना.. तीन जिल्हा बॉण्ड्री पेक्षा दुर्गम कोणते असेल..अशी तेथील पहिली महिला..गावाने खूप साथ दिली, आभार त्यांचे.. पहिली लेक, शिक्षिका म्हणून आम्हा दोघांना साडीकपडेदेत बोळवण केली.याही 99रजा गेल्या.इकडे सातारातांडाची पहिलीमहिलाप्रभारी मुख्याध्यापिका म्हणूनआमच्यासारखे अपंगआईवडीलअसलेले अपंगविद्यार्थी एकलपालक अनाथमुलांनादोन बाकीगुणवंतगरजवंतच च राहतात सातवीपर्यंत चे 63मुलांनाएक असे 69मुलांना पती व दोन्ही लेकरांच्या इच्छेने आम्ही वीस हजार रुपये खर्चून ट्र्ॅकसूट गणवेष मोफत वाटले बेटी बचाव बेटी पढाओ बेटेने किधर जाओ म्हणून आमचे कुटुंब जगले म्हणून.. प्रसिद्धी आवड नव्हती नाही..पण मुलाच्या दहावी परीक्षेवेळी एक जिल्हा बदली वाले सोडून सगळा स्टाफ संवर्ग एक त्यांच्या अडचणी तेच रजेवर मला रजाच नाही घेता आल्या.अपंग पतीचे खूप हाल झाले तीन तास बसले तर पाय सुजून यायचे आणि दोन चकरा माराव्या तर पाचशे रुपये खर्च कुठून देणार रोज.. शाळा ही व्यवस्थित सुरू हवी ना.. जिवंत तोवर मी शाळेची व पतीने घरची लेकरं सांभाळली..आता ते नाही राहिले.. निदान वेळापत्रक जोडून तरी तेवढे दिवस रजा द्या वी.

लता राधाकिसन पाथ्रीकर म्हणाले...

शिक्षण मोफत शिष्यवृत्ती कशासाठी तशापैशात शाळेचेलाईट बिल, पटावरील सर्वांचे गणवेष होऊ शकतात का पहावे.डिजिटलशाळा पाहतात बदली पदोन्नती त बीएड इ उत्तीर्ण दिनांक नुसार पदोन्नती द्यावी.फुलंब्री आधी पदवीधर एल सीडी झाल्याने वीस पेक्षा जास्त जण सिनियरिटीत पुढे जाताहेत म्हणजे आम्ही पुन्हा टोकालाच जाऊ.. प्रत्येक बदलीत तात्काळ रिलिव व हजर आहे आजवर.. शिक्षणसेवक तीन वर्षांत एकदिवसही खंड नाही म्हणून 22/7/2000तेकायम दि.13/07/2003आलेली आहे.78दिवस धरून..तोही पगार सगळे शिक्षणसेवक होतो..सारखाच हवा होता एकही खंड नाही, अशीमी एकटी होते तरी खूप जणांना जास्त मिळाला माझ्याहून.. दहावी ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षकांचे ए ग्रेड शासकीय महाविद्यालय चे डीएड बीएड एम एड पीएचडी पहावे या काळातील पाच महिन्यांत पदवी व सात महिने हजर म्हणून नियमित वेतनवाढ मिळाली काहींना.असो.फक्त शासकीय महाविद्यालय वाला मेरिट मुळे वंचित हा तोटा लक्षात घ्यावे.
गुणवंत विद्यार्थी पण पहावे.
सिंगल एम्प्लाय, यांच्या निराधार लेकरांना आयुष्यभर पेन्शन नाही, विधवा विधुर यांना आयकर सूट प्रवास भत्ता, तिकिटदर सवलत नाही,अठरा वर्षांत एकदाही मतदान ड्युटी रद्द नाही केली मी जनगणना एकही फॉर्म न चुकता केलेली आहे,आता विधवा विधुर ला सवलत असावी. घरून कामाची मुभा नाही, विधवा विधुर यांना तरी शाळा तिथे रहा नसेल.. दहावी बारावी व राज्य राष्ट्रीय स्तर खेळांसाठी तरी विशेष मुलांच्या पालकांना तशा रजा द्या, जिवंत व मयत यात खूप फरक आहे.एक पालक जिवंत कमवते धडधाकट पेन्शन धारी तरी आयुष्यभर पेन्शन आहे विशेष लेकरांना, तीन स्त्रोत उत्पन्नाचे आहेत द्या पण हेही पिढ्या गुणवंत करणार्या शिक्षकांचेच लेकरं आहेत,त्यांनाही न्याय द्या.पहिलीवय प्रवेश जीआर ते एसपीआय, नवोदय शिष्यवृत्ती पोलिस भरती मिलिटरी नेव्हीते हयात प्रमाणपत्र सगळीकडे एकच मानीव दिनांक फॉम भरताना नोकरी पेन्शन साठी ठेवा.एका बॅचचे बरेच लेकरं वंचित राहतात.. शालेय व्यवस्थापन समिती निवडणूक पाया दोन अपत्य नियम तिथे जरूर हवा..पाचवाले हटंना दोनवाले वंचित राहतात.. शैक्षणिक वर्ष जून ला सुरू.वूतनवाढ जुलै,पट तीस सप्टेंबरवर, जानेवारी नववर्ष कॅलेंडर वर.. आर्थिक वर्ष वेगळे चेक चालतो 90दिवस..तो हिशेब पुढील वर्षात जातो..एकच एक जानेवारी सारखे कधी का होईना असावे..
या जागी आपले जवळचे ताई मावशी समजून विचार करून जमतील ते मुद्दे विचारात घ्यावे.चुकल्यास क्षमस्व.