कोरोनाने अनेकांचे हाल केले. अनेकांचा रोजगार बुडाला. तर अनेक उद्योगधंद्याना त्याचा फटका बसला. असाच फटका राज्यातील शिक्षणाला बसला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नभरता येणारे नुकसान झाले.
शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देतेय असं नाही तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरु असल्याचेही गायकवाड यांनी सांगितलं. तर निजामकालीन शाळांसाठी 160 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर आदर्श शाळांसाठी या वर्षी 54 कोटी प्रस्तावित करण्यात आले असून पुढल्या वर्षीसाठी 300 कोटी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येक जिल्ह्यात ई-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे असेही माहिती त्यांनी दिली. त्याबरोबर विद्यार्थ्यांना good touch आणि bad touch याचं शिक्षण दिले जाईल असही त्यांनी सांगितले.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.