संवर्ग एक व दोन मधून प्रथमत: बदली करताना सेवेची अट नसल्याबाबतचे परिपत्रक....
या विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरीता या विभागाचे दि.२३.११.२०२२ रोजीचे पत्र रद्द करुन, शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२.४.२०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे.
२. उपरोक्त दि.२.४.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दि.२१.२.२०१९ रोजीच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक-भाग १ व विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज सादर करण्याकरीता विद्यमान शाळेतील ३ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही.
उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग-१ व विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत...inter district transfer
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि. २१/०६/ २०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि. ०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात,
येत आहेत. (31) शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी..
तसेच सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन २०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.
(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.
उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्व संबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. असे आदेशीत करण्यात आलेले आहे.
शिक्षक बदली प्रक्रिया ही दिवसेंदिवस फारच जठील होत चाललेली आहे .
यासाठी दोन वेळेस ऑनलाईन बदलीचे सॉफ्टवेअर निर्माण झालेले आहे .असंख्य सुधारित धोरणही तयार करण्यात आले परंतु परिस्थिती जर पाहिली तर ऑनलाईन बदली प्रक्रिया ही वेळखाऊ ठरत आहे .
ज्यामुळे आता पूर्ण संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. ऑनलाइन बदली प्रक्रियेत जितके न्यायालयीन प्रकरणे झाली तितके आजवर ऑफलाईन बदलीत कधी झालेले दिसून येत नाही.
मध्यंतरीच्या काळात आलेला एलसीडी पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी मानला गेला जाऊ शकतो. कारण या बदली प्रक्रियेमध्ये बदली मागणाऱ्याला समोरच पर्याय देऊन बदली केल्या जायची आणि त्याचे समाधान त्या बदलीवर निश्चितच होऊन जायचे जवळजवळ 90% च्या वर समाधान या बदली मध्ये होऊन जायचे. परंतु आता जर विचार केला तर ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये प्रत्येक संवर्गात प्रत्येक घटकावर अन्याय होत आहे असे दिसून येत आहे. आणि या बदली प्रक्रियेमधून खरंतर वेळ वाचवणारी प्रक्रिया हवी होती.
तसं न होता यामध्ये अधिकार वेळ संपूर्ण प्रशासन व शिक्षकांचा जात आहे. एका हिशोबाने पाहिले तर आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन बदली प्रक्रिया ही वरदानच म्हणावी लागेल कारण आंतर जिल्हा बदलीला या प्रक्रियेने गतिमान केलेले आहे .
त्या स्वरूपात जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन बदलीनेस केल्या गेल्यास याचा निश्चितच सर्वांना फायदा होणार आहे, परंतु जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही जर एलसीडी पॅटर्ननुसार करण्यात आली व यासाठी जो संकलित डाटा जर एका ठिकाणी घेऊन असं जर करण्यात आले तर यामध्ये असं वाटत नाही की कोणावर अन्याय होईल माहिती संपूर्णतः निपक्षपाती राहून कुणालाही फायदा अथवा अन्याय करणारी ठरणार नाही .
संवर्ग निहाय या प्रकीयेत लवकरच बदली प्रक्रिया पुर्ण होण्यास लाभ होईल.
प्रकाशसिंग राजपूत
समूहनिर्माता
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र
हे केवळ माझे वैयक्तिक मत आहे आपणांस काय वाटते ते काॕमेंट करा.....
ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदली करिता आता 26 बदल करण्यात आलेले आहे .
यामध्ये आता प्रामुख्याने महत्त्वाचा बदल असा करण्यात आलेला आहे की , दुर्गम क्षेत्रातील शाळेवर आता महिला शिक्षकांची बदली ही करण्यात येणार आहे येणार आहे ग्रामसेवक तथा तलाठी यांच्या प्रमाणे आता महिला शिक्षिकांनाही आवड क्षेत्रामध्ये सेवा बजवावी लागणार आहे.
अवघड क्षेत्रातील सुंदर अशी मुरूमखेडावाडी ची शाळा
हा फार मोठा बदल बदल्यांमध्ये करण्यात आलेला असून 2023 च्या बदल्यांमध्ये हा नियम लागू होणार आहे. अवघड क्षेत्रातील शाळेवर आता महिला शिक्षिका़ंना बदली देण्यात येणार आहे. 2017 च्या बदली धोरण नंतर अनेक बदली बदल निर्माण झालेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अवघड क्षेत्रात महिलांसाठी बदली देण्यात येऊ नये असे निश्चित झालेले होते .परंतु या वेळेस केलेल्या 26 बदलांमध्ये आता महिलांना अवघड क्षेत्रात नोकरी करावी लागणार आहे.
मा. मंत्री, ग्राम विकास मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दालन क्र. १२३. पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे गुरुवार, १६.०३.२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीचे इतिवृत्त सोबत दिलेले आहे.
यासाठी प्रारंभिक माहिती चा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे यानुसार आपण जिल्हा अंतर्गत बदली करिता प्रामुख्याने कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे ते यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.
बदल्या संदर्भात अनेक बाबतीत संभ्रम निर्माण झालेले असून यावर श्री संतोष ताठेसर यांचे संघटनात्मक नेतृत्व दृष्टीने मांडलेले हे विचार आहेत.
📣📣📣📣📣📣📣📣
*बदली अपडेट*
📣📣📣📣📣📣📣📣
*शिक्षक बदल्या होतील का ?*
🧐😇🤔
*शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या २०२२*
*सर्वांना सस्नेह नमस्कार*🙏🏻🙏🏻
शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदली प्रक्रियेबाबत एक बातमी सध्या सगळीकडे स्प्रेड होताना दिसतेय की ...*राज्यसरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना नोव्हेंबरपर्यंत स्थगिती...*
यावरून बऱ्याच बांधवांनी मला वैयक्तिक फोन करून विचारले की आपल्या बदल्या होतील की नाही ?
तर मी वैयक्तिक बाबतीत *९० %* पॉझिटिव्ह आहे की आपल्या बदल्या होणारच ! उर्वरित *१०% भाग* म्हणजे *५ %भाग * शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे आणि *५ %भाग* राजकीय मानसिकता यांवर अवलंबून आहे !
आपण आता थोड्या नकारात्मक बाबी बघू ... त्यानंतर बदल्या होण्याची शक्यता पडताळून बघू .
नवनवीन शैक्षणिक अपडेट मिळविण्यासाठी डिजिटल youtube चॕनलला सबस्क्राईब करा...👇
*बदल्या का होणार नाहीत ?*
१} *शैक्षणिक नुकसान -* आर.टी.ई २००९ नूसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यांसाठी शिक्षक बदल्या या शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी पूर्ण प्रक्रिया राबविण्यात यावी .
२} *नवीन मंत्रिमंडळाचा निर्णय -* नवीन मंत्रिमंडळाला जर हा धोरणात्मक वाटला नाही तर किंवा नवीन ग्रामविकासमंत्री यांना यांत काही तृटी वाटल्यास अडचणी येऊ शकतात .
३} *सॉफ्टवेअर* विन्सिट कंपनीचे सॉफ्टवेअर जर शासनाला अयोग्य वाटले किंवा त्यांच्या व्यवहारात जर कमी- जास्तपणा झाला किंवा उर्वरित रक्कम टप्पा देणे घेणे यांत काही अडचण आली तर ...याचा परिणाम होऊ शकतो .
*१} मार्च २०२२ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया निरंतर संथ गतीने का होईना सुरू आहे .*
*२} मंत्रालयीन पातळीवर जी.आर - परिपत्रके काढणे,बदली समिती नेमणूक , परवानग्या घेणे, सॉफ्टवेअर निर्मिती - खरेदी - टेस्टिंग सर्व बाबी पूर्ण झालेल्या आहेत.*
*३} मंत्रालयीन पातळीवरील कामकाज पूर्ण झालेले असून फक्त प्रशासकिय कामकाज शिल्लक आहे ते व्यवस्थितपणे सुरू आहे.*
*४} ओबीसी आरक्षणामुळे ग्रामपंचायत , जि.प निवडणुकावर परिणाम झालेला असून आचारसंहिता आड येणार नाही अपवाद नगरपरिषद निवडणुका आहेत ती बाब आपणांस लागू नाही.*
*५} फेज - १ कामकाज अगदी व्यवस्थित पूर्ण झालेले असून सोशल अपील प्रमाण अगदीच नगण्य आहे.*
*६} आंतरजिल्हा बदली साठी रोस्टर कामकाज बऱ्याच अंशी पूर्ण असून जेथे अडचण तेथे जुनेच रोस्टर वापरायचे अधिकार मा.सी.ई.ओ यांना दिलेले आहेत .*
*७} बदली स्थगितीसाठी परिपत्रक काढतांना मागील शासनाने शिक्षक वगळून काढले होते तेच सध्याच्या शासनाने नोव्हेंबर २०२२ पर्यंत कंटिन्यू केलेले दिसते .*
*८} सध्याच्या सत्ताधारी शासनाने बऱ्याच अडचणींचा सामना केल्याने मागील शासनाने घेतलेले लोकप्रिय निर्णय टाळण्याचा प्रयत्न होणार नाही.*
*९} बदलीसाठी कालावधी वाढवून घेतलेला दिसून येतो.जर बदल्या होऊ द्यायच्या नसत्या तर तात्काळ रद्द झाल्या असत्या .*
*१०} मागील २०१७ मधील बदल्यांचा आढावा घेता त्या जुलै पर्यंत झाल्या होत्या ही बाब सकारात्मक आहे.*
*तरीही बदल्यांसाठी पुढील आठवडा हा निर्णायक असणार आहे.*
*मी फक्त सकारात्मक - नकारात्मक बाबी सांगितल्या आहेत यांसाठी येणारी वेळ हीच बाब महत्त्वाची आहे .*
सन २०२२ मध्ये करावयाच्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या ऑनलाईनद्वारे बदल्या करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार याबाबतची कार्यवाही फेब्रुवारी २०२२ पासून सुरु आहे.
या बदल्या करतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वेळोवेळी संदर्भाधीन पत्राद्वारे सुचना दिलेल्या आहेत. बदल्या करतांना येणाऱ्या अडचणीवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी नोडल अधिकान्याची नियुक्ती करण्याची तरतुद आहे. मा.न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेल्या प्रकरणी कशी कार्यवाही करावी तसेच अवघड क्षेत्र घोषित करणे याबाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.
१.समन्वयकाची नियुक्ती करणे :
सन २०२२ मधील बदल्या करण्याच्या संपूर्ण कार्यवाहीत सहभागी असलेल्या कोणत्याही जिल्हा परिषद / सॉफ्टवेअर कंपनी / कोणतीही संस्था यांना येणाऱ्या अडचणींना योग्य ते मार्गदर्शन तात्काळ करण्यासाठी खालीलप्रमाणे नोडल / समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे असे स्पष्ट करण्यात आले.
(अ) राज्य समन्वयक (१) श्री. सचिन ओंबासे भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा (२) श्री. विजय गोडा भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.
(ब) विभागीय समन्वयक संबंधित महसूल विभागाचे उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय. (क) जिल्हा समन्वयक संबंधीत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) २. मा.न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेले शिक्षक :
(अ) "बदलीस पात्र शिक्षक" व "बदली अधिकार प्राप्त शिक्षक" असेल किंवा नसेल मात्र, ज्या शिक्षकाची मा. न्यायालयाने विवक्षितपणे 'अ' शाळेवरुन 'ब' शाळेत बदली करण्याचे आदेश दिले असल्यास, अशा शिक्षकाची ऑफलाईनद्वारे संबंधीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी बदली करावी.
(ब) मा.न्यायालयाचे बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले असतील व तो बदलीस पात्र शिक्षक ( एका जिल्ह्यात १० वर्षे व त्यापैकी एका शाळेत ०५ वर्ष सेवा) व बदली अधिकार पात्र शिक्षक (एका जिल्ह्यात १० वर्षे य त्यापैकी घोषित अवघड क्षेत्रात एका शाळेत किमान ०३ वर्ष सेवा) हे बदलीसाठीच्या निकषांची पूर्तता करीत असल्यामुळे या शिक्षकांचाच नियमानुसार ऑनलाईनद्वारे होणान्या सिस्टीममध्ये समावेश होत असल्यामुळे अशा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईनद्वारे कराव्यातअसे आदेशात म्हटलेले आहे.
(क) वरील (य) मध्ये नमुद केल्याप्रमाणे, बदली पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नसेल अशा शिक्षकांचा सध्या विकसीत केलेल्या सॉफ्टवेअरच्या सिस्टीममध्ये समावेश होऊ शकणार नाही. याकरिता सिस्टीममध्ये सुधारणा करण्यासाठी २-३ आठवड्यांचा आणखी कालावधी लागेल असे सॉफ्टवेअर कंपनीने स्पष्ट केले आहे.
सन २०२२ या वर्षातील बदल्या करण्यास आधीच विलय झालेला असुन मुलांच्या शाळाही सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे आणखी विलंब करता येणार नाही. त्यामुळे बदलीस पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नाही मात्र, मा. न्यायालयाने बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी प्रकरणे असल्यास, अशा शिक्षकांच्या बदल्या संबधीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शेवटच्या टण्यात ऑफलाईनद्वारे कराव्यात असे स्पष्ट केले आहे .
३. अवघड क्षेत्र घोषित करणे
आतापर्यंत दिनांक २७.२.२०१७ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार घोषीत केलेल्या अवघड क्षेत्रानुसार बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत / असाव्यात. कोरोना-१९ च्या महामारीमुळे मागील २०२१ या वर्षी बदल्या होऊ शकल्या नाहीत. दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या सुधारित शासन निर्णयातील तरतूदीनुसार अवघड क्षेत्र घोषित करण्यात आले नसावे. तसेच याच शासन निर्णयातील तरतुदीनुसार दर ०३ वर्षांनी अवघड क्षेत्राचे पुनर्विलोकन करणे आवश्यक असल्यामुळे दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सुधारित अवघड क्षेत्र घोषित करुन यापूर्वीची अवघड क्षेत्राची यादी व सुधारित यादी अपलोड करावी. जेणेकरुन या वर्षीच्या बदल्या करतांना. पुर्वी अवघड क्षेत्रात ०३ वर्षे काम केलेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करतांना पूर्वीची यादी सहज उपलब्ध होईल. मात्र, सध्या सुगम क्षेत्रात असलेली शाळा, दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र म्हणून घोषित झाल्यास अशा शाळेतील शिक्षकाची सेवा ही अवघड क्षेत्र घोषित केल्यापासून किंवा त्या शाळेत नियुक्ती स्विकारल्याच्या दिनांकापासून यापैकी जे नंतरचे असेल तेव्हापासून अवघड क्षेत्रातील सेवा असल्याचे गणण्यात येईल. त्यामुळे असा शिक्षक अवघड क्षेत्र घोषित केल्याबरोबर बदली अधिकार पात्र शिक्षक होणार नाही, याची नोंद घ्यावी असे सुचित केलेले आहे.
४. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरु असून त्याअंतर्गत शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याच्या कार्यवाहीची (टप्पा-१) मुदत आज दिनांक २०.६.२०२२ रोजी संपुष्टात येत आहे. तथापि, सदर प्रणालीमध्ये आणखी बऱ्याच शिक्षकांची माहिती अद्ययावत करावयाची असल्याची बाब मे विन्सीस आयटी कंपनीने निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे सदर कार्यवाहीस दिनांक २७.६.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.
1)*शिक्षण सेवक वगळता उर्वरित सर्व शिक्षक यांना बदली हवी असेल अगर नसेल , परंतु प्रत्येकाने आपले प्रोफाईल अपडेट आजच करायचे आहे*
2) ज्यांचे प्रोफाईल BEO लाॕग इन वरुन verify करुन परत पाठवले आहे ,त्यांनी verification accept करा.
*Accept केलेला screenshot केंद्रप्रमुख यांना शेअर करा* केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शिक्षकांचा follow up घ्या.
3) तालुक्यातील सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल अपडेट करुन तो screenshot केंद्रप्रमुख यांना पाठवायचा आहे.
प्रत्येक शिक्षक यांनी प्रथम स्वतःचे प्रोफाईल खात्रीपूर्वक update करणे.
⬇️
पोर्टलवरील सर्व सूचना सतत लाॕग इन करुन तपासणे.
⬇️
BEO LOG in वरुन आपले प्रोफाईल verify केल्यानंतर आपल्याला text मेसेज / मेल येईल. टेक्स्ट मेसेज /मेल सतत चेक करा. यावेळी तिथे केशरी रंगाचे प्रश्नचिन्ह येईल.
⬇️
कार्यालयाकडून /बदलीचे काम करणाऱ्या शिक्षकांचे फोन रिसिव्ह करावेत. आवश्यक माहिती,आपले अर्ज इ. सूचनांनुसार कार्यालयाकडे तात्काळ सादर करा.
आपल्याला verification text message /mail आल्यानंतर आपण पुन्हा पोर्टलवर जाऊन आपले प्रोफाईल accept करा. त्यानंतर आपल्या नावापुढे हिरवी टिक येईल.
⬇️
आपले प्रोफाईल अपडेशन हिरवी टिक आल्यानंतर पूर्ण झालेले आहे.
⬇️
ज्यांनी लिंकवरुन दुरुस्ती कळवली आहे , त्यांनी आधार नंबर update झाले नसेल तरीही प्रोफाईल update करा. याव्यतिरिक्त (जन्मदिनांक ,mail id दुरुस्ती दिसत नसेल तर पोर्टलवर तपासत रहा. बदल झाल्यानंतर प्रोफाईल update करा)
*📌 ऑनलाईन बदली प्रक्रियेतील काही महत्वाचे आजचे अपडेट :-*
1) बदली पोर्टलवर कोणत्याही शिक्षकाने आज सायंकाळपर्यंत आपली बदली माहिती फायनल सबमिट करु नये .
२) प्रत्येकाने पोर्टलवर लॉगिन करुन पान क्रमांक ०१ वरील माहिती बरोबर आहे का पाहुन घ्यावी व काही तफावत असेल तर तालुका बदली कक्षाला आपली योग्य माहिती द्यावी .