संवर्ग 1 व 2 बदली साठी नोंदणी प्रक्रिया
*संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*
👇🏼
*Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*
*आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*
*मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील.*
*त्यापैकी आपण Intra District (जिल्हाअतंर्गत) या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील Application (अर्ज) हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*
*Open होणाऱ्या पेजवर आपणास*
*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा*
(Apply Cadre 1)
*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा*
(Apply Cadre 2)
*असे दोन टॅब दिसतील*
*ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी 👉🏼संवर्ग भाग 1 अर्ज करा त्यावर क्लिक करा*
*अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा*
*त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल*
*त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा*
*क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील*
*जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे*
*(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)*
*त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)*
*(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)*
*आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा*
*Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल*
*अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म नोंदणी मोबाईल वरून करू शकतात*