केंद्रप्रमुख भरती थोडक्यात महत्त्वाचे
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीवर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.
अंदाजे खात्रीशीर माहितीनुसार परीक्षा 25 जून 2023 किंवा 2 जुलै 2023 रोजी होऊ शकते.*
परीक्षा योजना :
५.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा
५.२ परीक्षेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
५.३ प्रश्नपत्रिका एक
५.४ एकूण गुण २००
५.५ लेखी परीक्षे योजना व सविस्तर अभ्यासक्रम :
परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील. यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.
सौजन्य DDC learning |
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा