डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

केंद्रप्रमुखपदी विषयनिहाय पदोन्नती देण्याच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या धोरणाला अंतरिम स्थगिती...

 राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांना उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. 

न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनावाला यांच्या खंडपीठाने केंद्रप्रमुख पदी पदोन्नती देताना त्या शिक्षकाच्या सेवाज्येष्ठतेचाच विचारात घेतला पाहिजे. विषयनिहाय पदोन्नती देणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करताना केंद्रप्रमुखपदी विषयनिहाय पदोन्नती देण्याच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या धोरणाला अंतरिम स्थगिती दिली. तसेच राज्याच्या नगरविकास विभागासह जिल्हा परिषदेचे सीईओ व शिक्षण उपसंचालकांना नोटीस बजावून १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

सोलापूर जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने १ डिसेंबर २०२२ आणि २७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयांचे पालन केले नाही. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीपणे पदोन्नतीची तशी यादी प्रसिद्ध केली. या यादीविरोधात बबन पातुळे यांच्यासह अन्य १६ शिक्षकांच्या वतीने अॅड. निरंजन भावके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.



या याचिकेवर पद न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. निरंजन भावके यांनी राज्य सरकारच्या निर्णयाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्य सरकारने घेतलेला निर्णय बेकायदा असल्याचा दावा करत पदोन्नतीची यादी रद्द करा आणि सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याबाबत जिल्हा परिषद सीईओंना निर्देश द्या, अशी विनंती केली.

खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेतली. सोलापूर जिल्हा परिषदेने दोन शासन निर्णय का डावलले ? विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. असे देव असताना सेवाज्येष्ठतेनुसार त्यां पदोन्नती देण्याच्या सरकारी धोरणाचे पालन का केले नाही? याबाबत १ नोव्हेंबरपर्यंत लेखी उत्तर सादर करा, असे आदेश देत जिल्हा परिषदेचे सीईओ, नगरविकास विभाग, पुणे येथील शिक्षण उपसंचालकांना नोटीस जारी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: