डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
teacher लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आमदार शिक्षकांच्या समर्थनात

औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झालेले मुख्यालय संबंधित विषयावर कन्नड सोयगांव चे आमदार आदरणीय उदयसिंग राजपूत यांनी  शिक्षकांच्या समर्थनार्थ पत्र दिलेले आहे .

त्यांच्या या कार्याबद्दल पैठणच्या एका शिक्षिकेने त्यांना फोनवर आभार मानलेले आहे आपण खाली दिलेली व्हिडिओ क्लिप ऐकू शकतात अशा प्रकारे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून शिक्षकांचा सन्मान राखण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.

 डिजिटल समूह चॕनलला सबस्क्राईब करा...
घरभाडे कपाती विरोधात मुप्टा चे तीव्र निदर्शने

 *संवैधानिक इशारा व मुप्टा चे  तीव्र निदर्शने*

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

💫💫💫💫💫💫💫💫💫


प्रति,

मा.मुख्य कार्यकारी साहेब,

मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक,प्राथमिक)

मा.गटशिक्षणाधिकारी (सर्व)

*विषय- कोणत्याही शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात न करता वेतन अदा करणेबाबत*

महोदय,

वरील विषयी आपणास निवेदन देण्यात येते की, माहे -सप्टेंबर 2022 ची बिले बनवताना कोणत्याही शिक्षकांचे घरभाडे भत्ता कपात करण्यात येऊ नये. सर्व शिक्षक शाळेवर वेळेत ये-जा करतात. प्रशासनाकडून मुख्यालयी राहण्याबाबत पुरावे गोळा केलेत.तरीही पुन्हा पुन्हा ग्रामसभेचा ठराव,स्वयंघोषित प्रमाणपत्र, भाडेकरारनामा इ. लेखी पुरावे मागवून शिक्षकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी सोबतच प्रशासनाकडूनही होत आहे. असे दिसतेय.आम्ही मुख्यालयी राहतच आहोत. तरीही आपण हे पुरावे वारंवार मागणी करून लोकप्रतिनिधीस मदत करत आहात की काय? असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पण हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे.यात गंगापूर / खुल्ताबाद/वैजापूर/.....फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके येता कामा नये.राज्यातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात अशा माहितीच्या आधारे घरभाडे कपात केलेले नाही.त्यामुळे मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घरभाडे कपात करणे अनुचित ठरेल. एका लोकप्रतिनिधीमुळे आपण हा निर्णय घेत असाल तर हे आम्हाला मान्य होणार नाही.कोर्टाने निर्णय देऊनही आपण कपात करण्याचे आदेश काढले आहेत.मुद्दामहून शिक्षकांना या माध्यमातून भडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कदापिही सहन केले जाणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात घरभाडे कपात केल्यास *शिक्षक असंतोषास* आपण जबाबदार असाल.दबावतंत्राचा वापर जर आपणाकडून होत असेल तर सर्व शिक्षकबंधुभगिनी प्रशासनाच्या विरोधात जाऊन निदर्शने करतील.असा विनयपूर्वक संवैधानिक इशारा याद्वारे देण्यात येत आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*मुप्टा ची जाहीर निदर्शने*

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

जि.प.कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने प्रशासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक बंधुभगिनींना घरभाडे बाबत पुरावे मागणी व पुरावे नसेल तर घरभाडे कपातीचे आदेश काढण्यात आले.अशा दबावतंत्राचा वापर करणा-या  प्रशासनाच्या विरोधात *मुप्टाच्या वतीने तीव्र निदर्शने उद्या सोमवार दि.26/09/2022 रोजी ठिक दुपारी 4:30 वाजता मा.प्रा.सुनिलजी मगरे सरांच्या नेतृत्वाखाली* करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकबंधूभगिनींनी या अस्तित्वाच्या लढाईत सामील व्हावे.असे आवाहन मुप्टाच्या वतीने करण्यात येत आहे.ही विनंती.

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

*आवाहनकर्ते*

*प्रा.सुनिलजी मगरे*

*संस्थापक सचिव* 

*मुप्टा शिक्षक संघटना, मराठवाडा विभाग, औरंगाबाद*

*संपर्क*- 

*संपत साबळे - 9422350416*

*विलास त्रिभुवन*-

*9673568068*लवकरच 30 % केंद्रप्रमुखाची पदे भरण्यात येणार


शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....


जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....


डिजिटल समूहासोबत सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा.... 


🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाविरुद्ध शिक्षक समितीने मागितली औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद....

 मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नासंदर्भात शिक्षकांच्या हितासाठी शिक्षक समिती मैदानात...


 मुख्यालयी राहण्याच्या  आदेशाविरुद्ध  शिक्षक समितीने मागितली   औरंगाबाद उच्च न्यायालयात  दाद------- (जिल्हाध्यक्ष विजय साळकर.)     


        

शिक्षकांनी मुख्यालयी राहिलेच पाहिजे अन्यथा त्यांच्याविरुद्धही शिस्तभंगाची कारवाई करू असे नुकतेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक आदेश निर्गमित केला *

१)ग्रामीण भागात वाडी-वस्ती तांड्यावर राहण्यासाठी निवासस्थान नाहीत. 


२)महिला कर्मचाऱ्यांना  वाडी-वस्ती तांड्यावर निवासासाठी संरक्षण व सुरक्षितता  नाही..

 ३)कर्मचाऱ्यांच्या मुलांना  चौथीनंतर /आठवी नंतर शिक्षणाची व्यवस्था नाही शिक्षणासाठी ,महाविद्यालय,काँलेज, इ.ची सोयी-सुविधांची उपलब्धता नाही .


४) 2018 च्या बदली प्रक्रियेत पती-पत्नी प्रचंड प्रमाणात विस्थापित झाले त्यांची मुख्यालय वेगवेगळे आहे त्यांच्या दोन शाळेमधील शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे त्यांनी कोणत्या ठिकाणी राहायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे .


५) आजही ग्रामीण भागामध्ये उच्चनीचतेचा भेदभाव केला जातो त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना  गावातील लोक घर देत नाही.


 ६) बऱ्याच कर्मचाऱ्यांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे त्यांना वेळप्रसंगी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ग्रामीण भागात व्यवस्था नाही .


७) बहुतांशी कर्मचाऱ्यांना वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करावा लागतो त्यांच्या औषध /हॉस्पिटल याची व्यवस्था त्या ठिकाणी नसते.


 ८) शासनाने  ग्रामीण भागात राहण्यासाठी निवासस्थाने अद्यापही बांधून दिलेले नाही ** म्हणून काही कर्मचारी मुख्यालयापासून जेथे सोयीस्कर वाटते तिथे वास्तव्य करून आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मेहनती घेत असताना... प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मुख्यालयी न राहिल्यास वेतन मिळणार नाही, शिस्तभंगाची कारवाई करू अशी तंबी देणारे पत्र  पारित करण्यात आले आहे...

शासकीय कर्मचाऱ्यांनी *मुख्यालयी राहण्या संदर्भात* महाराष्ट्र शासनाने  *वेळोवेळी काढलेले आदेश रद्द करून कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व वेतनाला व कर्तव्याला  संरक्षण द्यावे* व वरील अटी रद्द करण्यात याव्यात यासाठी               

  *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* ने  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.1 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली होती. शिक्षक समितीच्या वतीने आज मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात आज *दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी याचिका क्रमांक WPST/4317/2022 BOMBHC-Bombay High Court दाखल करण्यात आली*. म.रा.प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अँड. संभाजी मुंडे हे शिक्षकांची बाजू मांडणार आहेत. शिक्षकांची मानसिकता खराब करुन गुणवत्तेत अडथळा निर्माण करणाऱ्या आदेशाविरुद्ध शिक्षक समिती न्यायाची अपेक्षा करणार आहे.

शिक्षक बदली 2022 विशेष बैठक #teacers transfer

 *शिक्षक बदली 2022 ठळक घडामोडी*आज महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती आणि बदली अभ्यास गट महाराष्ट्र राज्य यांच्यात ऑनलाईन 3 तास बदली 2022 या विषयावर चर्चा झाली.

*सदर बैठकीस मा. आयुष प्रसाद साहेब मा. ओंबासे साहेब मा. कर्डीले साहेब उपस्थित होते.तसेच मा. संभाजीराव थोरात तात्या मा. मधुकर काठोळे मा.काळुजी बोरसे मा. अंबादास वाजे मा. चिंतामण वेखंडे मा. नवनाथ गेंड मा. साजिद निसार मा. संजय जाधव मा.देविदास बसवदे मा. यादव पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.*खालील मुद्यावर चर्चा झाली.*1) 30 जून 3 वर्ष, अनफिट फॉर लेडीज*

2) आंतर जिल्हा बदली बाबत काही विषय*

3) प्रमोशन, संच मान्यता आदी**मा. काठोळे साहेब, मा. अंबादासजी वाजे साहेब मा. चिंतामण वेखंडे साहेब, देविदास बसवदे साहेब यांनी 3 वर्ष 30 जून आणि अनफिट फॉर लेडीज याबद्दल संघटनेची भूमिका मांडली.याबाबत मा. आयुष प्रसाद साहेबांनी सकारात्मक भूमिका घेत ह्यावर्षी पारदर्शक बदल्या होतील तशी कार्यवाही सुरु असून संघटनेच्या पाठपुराव्यामुळे विशेष बदली म्हणून 3 वर्षात विनंती बदली साठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू असे सांगितले*.


*मा. संभाजीराव थोरात तात्या यांच्या पाठपुराव्याकडे आता अन्यायग्रस्त शिक्षकांचे लक्ष लागले आहे. कारण मा. मुश्रीफ साहेब यांच्याकडेही पाठपुरावा करणे आवश्यक आहे.**परंतु आजच्या मिटिंगमुळे पोर्टल मध्ये बदलाबाबत प्रशासन सकारात्मक असून शासनाकडून येणाऱ्या सूचनेनुसार अपेक्षित बदल करू असे सांगितले आहे.*


रखडलेल्या शिक्षक बदल्या आता मार्चनंतर.... #Teacher #transfer

 शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.
शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.