डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सेतूच्या पूर्व चाचणी कालावधी वाढविला

 सेतूच्या पूर्वचाचणी आता पुढे ढकलल्या....


करोना काळातील दोन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून ३० दिवसांचा सेतू अभ्यासक्रम दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी राबविणे बंधनकारक केलेले आहे. 

आता या अभ्यासक्रमासाठी चाचणी घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. १७ आणि १८ जून रोजी घेण्यात येणारी पूर्व चाचणी घेण्यासाठी आता एससीईआरटीकडून २० जून ते २५ जूनपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. 


सेतु अभ्यासक्रम व चाचणीची गरज का?

विद्यार्थ्यांना ऑनलाईन व काही काळ ऑफलाईन अभ्यासाच्या मागील वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत अध्यापनाचे आकलन किती व कसे झाले आहे, याची नोंद पूर्व चाचण्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

सेतू पुर्वचाचणी पेपर डाऊनलोड  करा...

 पूर्व चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नमुनाधारित सर्वेक्षण घेऊन माहितीचे विश्लेषण करून, त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती एससीईआरटीकडून देण्यात आली.

बदली आजचे अपडेट...

 *शिक्षक बदली पोर्टल अपडेट  दि. 18/06/2022* 



1)*शिक्षण सेवक वगळता उर्वरित सर्व शिक्षक यांना बदली हवी असेल अगर नसेल ,  परंतु प्रत्येकाने आपले प्रोफाईल अपडेट आजच करायचे आहे* 


2) ज्यांचे प्रोफाईल BEO लाॕग इन वरुन verify करुन परत पाठवले आहे ,त्यांनी verification accept करा. 

*Accept केलेला screenshot केंद्रप्रमुख यांना शेअर करा* केंद्रप्रमुखांनी प्रत्येक शिक्षकांचा follow up घ्या. 

3) तालुक्यातील सर्व शिक्षकांनी आपले प्रोफाईल अपडेट करुन तो screenshot केंद्रप्रमुख यांना पाठवायचा आहे.




प्रत्येक शिक्षक यांनी प्रथम स्वतःचे  प्रोफाईल खात्रीपूर्वक  update करणे. 


⬇️



पोर्टलवरील सर्व सूचना सतत लाॕग इन करुन तपासणे. 


⬇️


BEO LOG in वरुन आपले प्रोफाईल verify केल्यानंतर आपल्याला text मेसेज / मेल येईल. टेक्स्ट मेसेज /मेल सतत चेक करा. यावेळी तिथे केशरी रंगाचे प्रश्नचिन्ह येईल.


⬇️


कार्यालयाकडून /बदलीचे काम करणाऱ्या शिक्षकांचे फोन रिसिव्ह करावेत. आवश्यक माहिती,आपले अर्ज इ. सूचनांनुसार कार्यालयाकडे तात्काळ सादर करा. 

 सेतू अभ्यासक्रम  पुर्व चाचणी येथून डाऊनलोड करा....

⬇️

 आपल्याला verification   text message /mail  आल्यानंतर आपण पुन्हा पोर्टलवर जाऊन आपले प्रोफाईल accept करा. त्यानंतर आपल्या नावापुढे हिरवी टिक येईल. 

⬇️


आपले प्रोफाईल अपडेशन  हिरवी टिक आल्यानंतर पूर्ण झालेले आहे. 


⬇️

ज्यांनी  लिंकवरुन दुरुस्ती कळवली आहे , त्यांनी आधार नंबर update झाले नसेल तरीही प्रोफाईल update करा. याव्यतिरिक्त (जन्मदिनांक ,mail id दुरुस्ती दिसत नसेल तर पोर्टलवर तपासत रहा. बदल झाल्यानंतर प्रोफाईल update करा) 

⬇️

आता गुगलच्या या सुविधा शासकीय कर्मचाऱ्यांना वापरता येणार नाही

 पारदर्शकता, अचूकतेसाठी सर्वच गोष्टी ऑनलाइन व्हाव्यात, असं सरकारचं धोरण आहे. त्यानुसार शासकीय विभागांमध्येही इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 

इंटरनेट वापरताना गुगलच्या विविध सुविधांचा वापर केला जातो,पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन  या सुविधा वापरता येणार नाहीत. कारण सरकारकडून यासंबंधी नविन आदेश काढण्यात आलेला  आहे.



सुरक्षा स्थिती सुधारणं हा या आदेशामागचा उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. 

 महत्त्वाची शासकीय कागदपत्रं गुगल ड्राइव्हसारख्या प्लॅटफॉर्मवर सेव्ह केल्यास सुरक्षेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण होऊ शकतात. 

ही बाब लक्षात घेऊन इंडियन काॕम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम  आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या वतीनं एक नवा आदेश काढण्यात आला आहे.

या आदेशानुसार, खासकरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स आणि व्हीपीएन या सुविधांचा वापर करता येणार नाही.