डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

आमदार शिक्षकांच्या समर्थनात

औरंगाबाद जिल्ह्यात सुरू झालेले मुख्यालय संबंधित विषयावर कन्नड सोयगांव चे आमदार आदरणीय उदयसिंग राजपूत यांनी  शिक्षकांच्या समर्थनार्थ पत्र दिलेले आहे .

त्यांच्या या कार्याबद्दल पैठणच्या एका शिक्षिकेने त्यांना फोनवर आभार मानलेले आहे आपण खाली दिलेली व्हिडिओ क्लिप ऐकू शकतात अशा प्रकारे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून शिक्षकांचा सन्मान राखण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.

 डिजिटल समूह चॕनलला सबस्क्राईब करा...




आपल्या विचारांना हक्काचे व्यासपीठ

 डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र आपणासाठी या जागतिक विश्वावर आपल्या विचारांचा प्रभाव पाडण्याची संधी घेऊन येत आहे .



डिजिटल स्कूल समोर महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर आपले विचार , कल्पकता प्रकाशित करण्याची ही नामी संधी आपणासाठी घेऊन येत आहे.

 आपला आपणास आवश्यक वाटलेला एखादा शैक्षणिक विचारावर आपण लेख लिहायचा आहे .500 ते 700 शब्द मर्यादा असलेल्या या लेखांमध्ये आपण नाविन्यपूर्ण उपक्रम नाविन्यपूर्ण शाळेतील बदल तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक विचारांचा लेखाजोखा यामधून मांडू शकतात .

यामुळे अनेक शिक्षकांना आपल्या विचारांचा ,नवीन नवीन कल्पकतेचा उपयोग होत प्रगत महाराष्ट्र घडण्यामध्ये आपले हातभार लागू शकतो.  

 आपणास आपला लेख प्रकाशित करण्यासाठी आपण संपर्क करावा

 प्रकाशसिंग राजपूत 

समूहनिर्माता 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

व्हाट्सअप क्रमांक 9960878457 

या नंबरवर आपण आपला लेख व त्या संबंधित फोटो पाठवू शकतात जर  आपणास व्हिडिओ पाठवायचा असेल तर वैयक्तिक व्हाट्सअप वर पाठवण्यात यावा ...

आपल्या शैक्षणिक विचारांची ताकद,

 ही बनेल प्रगत महाराष्ट्राची रसद...








नागपूर जिल्ह्यातील शाळा बंद होणार

 राज्य सरकारने  वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या लगतच्या शाळेत समायोजित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

तसे झाल्यास जिल्ह्यातील सुमारे 447 मराठी शाळांवर संकट येण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या  सुमारे 1516 शाळा असून त्यापैकी 447 शाळांमध्ये 20 व त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे.



जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी, यासाठी शासनस्तरावरुन विविध कार्यक्रम राबवण्यात येते. यासोबतच शाळांमध्ये विद्यार्थी टिकून राहावा, यासाठी विद्यार्थ्यांना गणवेशापासून ते पाठ्यपुस्तक व माध्यान्ह भोजन आदी पुरवण्यात येते. मात्र, यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्याचे नाव घेत नाही. सध्या असलेली पटसंख्याही दिवसेंदिवस घसरत चालली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी राज्यातील कमी विद्यार्थी पटसंख्या  असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता.

शून्य ते वीस पटाच्या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, अशी विचारणा शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निर्गमित केलेल्या पत्रात केली आहे.

घरभाडे कपाती विरोधात मुप्टा चे तीव्र निदर्शने

 *संवैधानिक इशारा व मुप्टा चे  तीव्र निदर्शने*

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

💫💫💫💫💫💫💫💫💫


प्रति,

मा.मुख्य कार्यकारी साहेब,

मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक,प्राथमिक)

मा.गटशिक्षणाधिकारी (सर्व)

*विषय- कोणत्याही शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात न करता वेतन अदा करणेबाबत*

महोदय,

वरील विषयी आपणास निवेदन देण्यात येते की, माहे -सप्टेंबर 2022 ची बिले बनवताना कोणत्याही शिक्षकांचे घरभाडे भत्ता कपात करण्यात येऊ नये. सर्व शिक्षक शाळेवर वेळेत ये-जा करतात. प्रशासनाकडून मुख्यालयी राहण्याबाबत पुरावे गोळा केलेत.तरीही पुन्हा पुन्हा ग्रामसभेचा ठराव,स्वयंघोषित प्रमाणपत्र, भाडेकरारनामा इ. लेखी पुरावे मागवून शिक्षकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी सोबतच प्रशासनाकडूनही होत आहे. असे दिसतेय.आम्ही मुख्यालयी राहतच आहोत. तरीही आपण हे पुरावे वारंवार मागणी करून लोकप्रतिनिधीस मदत करत आहात की काय? असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पण हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे.यात गंगापूर / खुल्ताबाद/वैजापूर/.....फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके येता कामा नये.राज्यातील इतर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात अशा माहितीच्या आधारे घरभाडे कपात केलेले नाही.त्यामुळे मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घरभाडे कपात करणे अनुचित ठरेल. एका लोकप्रतिनिधीमुळे आपण हा निर्णय घेत असाल तर हे आम्हाला मान्य होणार नाही.कोर्टाने निर्णय देऊनही आपण कपात करण्याचे आदेश काढले आहेत.मुद्दामहून शिक्षकांना या माध्यमातून भडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कदापिही सहन केले जाणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात घरभाडे कपात केल्यास *शिक्षक असंतोषास* आपण जबाबदार असाल.दबावतंत्राचा वापर जर आपणाकडून होत असेल तर सर्व शिक्षकबंधुभगिनी प्रशासनाच्या विरोधात जाऊन निदर्शने करतील.असा विनयपूर्वक संवैधानिक इशारा याद्वारे देण्यात येत आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*मुप्टा ची जाहीर निदर्शने*

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

जि.प.कार्यालय औरंगाबाद यांच्या वतीने प्रशासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक बंधुभगिनींना घरभाडे बाबत पुरावे मागणी व पुरावे नसेल तर घरभाडे कपातीचे आदेश काढण्यात आले.अशा दबावतंत्राचा वापर करणा-या  प्रशासनाच्या विरोधात *मुप्टाच्या वतीने तीव्र निदर्शने उद्या सोमवार दि.26/09/2022 रोजी ठिक दुपारी 4:30 वाजता मा.प्रा.सुनिलजी मगरे सरांच्या नेतृत्वाखाली* करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकबंधूभगिनींनी या अस्तित्वाच्या लढाईत सामील व्हावे.असे आवाहन मुप्टाच्या वतीने करण्यात येत आहे.ही विनंती.

👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻

*आवाहनकर्ते*

*प्रा.सुनिलजी मगरे*

*संस्थापक सचिव* 

*मुप्टा शिक्षक संघटना, मराठवाडा विभाग, औरंगाबाद*

*संपर्क*- 

*संपत साबळे - 9422350416*

*विलास त्रिभुवन*-

*9673568068*



लवकरच 30 % केंद्रप्रमुखाची पदे भरण्यात येणार


शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....


जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....


डिजिटल समूहासोबत सदैव राहण्यासाठी सबस्क्राईब करा.... 


🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

लवकरच जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया

  शिक्षक ऑनलाईन बंदी प्रक्रिया गेल्या दोन वर्षापासून कोविड बंद झालेली होती,

 परंतु आता नवीन प्रणाली द्वारे यावर्षी जिल्हातंर्गत बदली लवकरच सुरू होणार आहे ,आंतरजिल्हा बदली  यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया काही दिवसातच सुरू होत आहे.

 बदली अभ्यास गटावरील प्रमुख असलेले माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी एका कार्यक्रमांमध्ये बदली प्रक्रिया संबंधित एक निश्चित कालावधी दरवर्षी साठी लागू करण्यात येणार असल्याचे म्हटलेले आहे.

 ज्यामुळे बदल्यांचे यापुढे नियमित अशा प्रकारे करता येणार आहे. त्यांनी कार्यक्रमात मांडलेल्या विचारांमध्ये आपण ऐकू शकतात की बदल्यांविषयी शासनाने ठरवलेली नेमके धोरण कसे असणार आहे.

 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनेलला सबस्क्राईब करा...