डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?


 

तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोणी वाचत तर नाही ना?

 संदेशवहन  गतिमान करणारे ॲप म्हणजे व्हाट्सअप आणि या व्हाट्सअप मध्ये नवीन नवीन फीचर्स येत आहे. आत्ताच व्हाट्सअप  नवीन फिचर  दिलेले आहे की आता 32 जणांना आपण ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकतो यासाठी तुम्हाला तुमचं व्हाट्सअपचे  वर्जन अपडेट करून घ्यावे लागणार आहे .

याचबरोबर ग्रुपची सदस्य संख्या वाढली असून 1024 सदस्य आता ग्रुप मध्ये ऍड करता येणार आहे हे सर्व वापरत असताना तुमचा अकाउंट जर कोणी त्यांच्या डिवाइसला जोडून घेतला आहे का हे पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे.


व्हॉट्सॲपवेब आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट यासारख्या व्हॉट्सॲप फीचर्सचे नावे तुम्ही ऐकली असतील. तुम्ही त्याचा वापरही करत असाल. या ॲपच्या मदतीने, तुम्ही एकाच वेळी दोनपेक्षा अधिक डिव्हाइसवर  एकच व्हॉट्सॲप वापरू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन घेऊन दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन केले तर तो तुमचे संदेश सहजपणे वाचू शकेल. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर काही सेटींग्स करू शकता. ज्यामुळे तुमचे मॅसेज प्रायव्हेट राहतील.

तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?

एखाद्याने तूमच्या व्हॉट्सॲपवर लॉगइन केले होता का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला लिंक्ड डिव्हाइस Linked Deviceचा पर्याय मिळेल.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तूमचे व्हॉट्सॲप कोण कोणत्या डिव्हाइसला लॉग-इन केले आहे याचे डिटेल्स मिळतील. जर ऑनलाईन नसूनही तूमचे व्हॉट्सॲप लॉग इन दिसत असेल.तर,तूम्ही त्यातून लॉग आउट होऊ शकता.आजच्या युगात सावधगिरी बाळगणे यास शाहनपण म्हणता येईल...


   प्रकाशसिंग राजपूत 

   औरंगाबाद 


    


बदलीचे संदर्भात महत्त्वाचा आदेश

 

बदली संदर्भात आज मुख्यकार्यकारी अधिकारी Ceo सर्व यांना आज आदेश प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकाची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


२. शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच त्याकरिता दि.३१/०८/२०२२ पर्यंत सेवानिवृत्त / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे, त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा झालेल्या रिक्त जागा, तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर अद्ययावत करण्याचे संदर्भीय दि. १९/०९/२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे.

३. आता संदर्भीय दि. २१/१०/२०२२ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही माहे जानेवारी, २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी दि. ३१/१२/२०२२ पर्यंत सेवानिवृत्ती / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली / रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन, ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर रिक्त पदांचा तपशील अद्ययावत करावा. तसेच, डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावीत असे आदेशित करण्यात आलेले आहे. 


आजचे बदली आदेश पहा






शिक्षणाधिकारी लोहार यांना कोठडी

 

सोलापूर मधील  कोंडी येथील शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग वाढवण्यासाठी हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सुनावली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. लोहार यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर शिक्षक वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानाची तपासणी झालेली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये ती केली जाणार आहे.

केंद्रप्रमुख पदभरतीबाबत आदेश

 केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत पत्र .

रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास सादर करणेबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०: ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदरील कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल सदर पत्रासोबत जोडलेल्या विहित नमुन्यांत Excel शिट मध्ये उक्त माहिती संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावी जेणेकरून केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे संचालनालयास सुलभ होईल..






बदली अपडेट

 📣📣📢📮📮📮📢📣📣

*जिल्हा अंतर्गत बदली बाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी चे काही महत्त्वपूर्ण VC updates*



*दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेळेत होणार*

*संवर्ग १/२ बदली हवी की नको ते बदली फॉर्म भरतानाच  (दि ५/११/२०२२ ते  ७/११/२०२२) जाहीर करावे लागणार.*



*बदली प्रक्रिया टप्प्या-टप्प्यानुसार राबवली जाणार.*


*प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार.*


*संवर्ग १ ला फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*


*संवर्ग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येणार.*


*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*


*बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त व बदलीपात्र अशा सर्व जागा मागता येणार.*


*वरील सर्व संवर्गांना वर नमुद केल्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्याच जागा बदली विकल्प भरताना दिसणार आहेत.*


*केवळ माहितीस्तव..* 


*बदली पोर्टल जरी सुरू असले तरी बदली पोर्टलवर फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन होत आहे.*


*शिक्षकांची लॉगिन सध्या होत नाही. शिक्षकांनी सध्या पोर्टलवर कोणतीही प्रक्रिया करायची नाही. दिनांक पाच नोव्हेंबर 2022 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांनी बदली हवी किंवा नको एवढेच नोंदवायचे आहे.*

*सस्नेह धन्यवाद*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻