जिल्हांतर्गत बदली 2022 प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीची कार्यवाही...
बदली पात्र शिक्षक TBR चा टप्पा पार पडल्यानंतर सुधारीत रिक्त जागांपैकी अवघड किंवा सर्वसाधारण कोणतीही शाळा 30 पसंतीक्रम मध्ये मागू शकतात.
जिल्हांतर्गत बदली 2022 प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीची कार्यवाही...
बदली पात्र शिक्षक TBR चा टप्पा पार पडल्यानंतर सुधारीत रिक्त जागांपैकी अवघड किंवा सर्वसाधारण कोणतीही शाळा 30 पसंतीक्रम मध्ये मागू शकतात.
माझ्या मामाचं मोबाईल हरवलं....
जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी औरंगाबाद (aurangabad) या शाळेत आम्ही एक नवीन खेळ घेतला विद्यार्थ्यांनी पत्रव्यवहार आता काही पाहिलेलं नाही.
नवीन युगात आता मोबाईल वरील व्हाट्सअप संदेश आणि मोबाईल कॉल हे नवीन संदेशवनाचे प्रमुख साधन झालेलं आहे,
म्हणूनच आम्ही माझ्या मामाचं पत्र हरवलं या ऐवजी आम्ही खेळामध्ये माझ्या मामाचा मोबाईल हरवला हा खेळ घेतलेला आहे. मुलांनी फार आनंदाने हा खेळ खेळून आनंद घेतलेला आहे.
प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे
सहशिक्षक
व्हिडीओ पाहण्यासाठी 👇
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये शिक्षकांचे घर भाडे भत्ता कपात करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले असून सप्टेंबर 2022 पासूनच्या वेतनात शालार्थ प्रणालीतून मुख्यालय राहत नसलेल्या शिक्षकांचे घर भाडे भत्ता कपात करण्याचे आदेश नुकतेच निर्गमित केलेले आहे .
यामध्ये शिक्षकांवर शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचेही आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.
एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या या कारवाईमुळे सर्व शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबतीत योग्य तो निर्णय शासनाने घेऊन शिक्षकांवरील अन्याय दूर करावा अशी अनेक शिक्षकांची मागणी होत आहे .
गटशिक्षणाधिकारी यांनी काढलेले आदेश खालील प्रमाणे आहेत
मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे.
मराठी कविता मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ
सांज...
दिवसा थांबे धावपळ ती झांज
शांत शांत किती रे होत सांज
रंगछट्टा पसरुनी या आसमानी
पक्ष्यांची धाव घरटीच्या दिशेनी
भास्करा लृप्त होणार तळपते राज्य
पुन्हा पसरण्या सोनेरी साम्राज्य
जगास धावण्या तुझ्यापरी लावितो
कष्टानंतर विराम तुच दावितो
प्रकृती हा खेळ तुझा अजब
वर्णन करण्या न शब्द रे गजब
जसा जीवनी रेशमाचा धागा
चाली वाट सुखाची शोधून जागा
प्रकाशसिंग राजपूत
छ.संभाजीनगर
राज्यातील शिक्षकांना दिलासा देणारी बाब .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले यावेळी त्यांनी यापुढे शिक्षकांना शिकवणीशिवाय इतर कोणतीही काम देऊ नयेत .
अशा सूचना दिलेल्या आहेत शिक्षकाची जागा कोणत्याही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही .शिक्षकांना सोपवण्यात येणारी अन्य शाळाबाह्य जी कामं आहेत हे देखील एक मोठा आव्हाने आपल्यापुढे आहे.
त्यांनी अनेक वेळा मला त्या सूचना आलेले आहेत राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारीचे काम सोडलं तर इतर शैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही,
याची काळजी देखील घेण्याच्या सूचना या ठिकाणी विभागाला देण्यात नक्की येतील .शाळाबाह्य मुलांच्या समस्या आहेत गांभीर्याने विचार करण्याचा विषय असून त्यावर देखील मार्ग काढला जाईल .
शिक्षकांना सोपविण्यात येणारी अन्य शाळाबाह्य जी कामं आहेत हे देखील एक मोठं आव्हाने आपल्यापुढे आहे ,त्यांनी यावेळेस सांगितले अनेक वेळा मला त्या सूचना आलेले आहेत राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारीचे काम सोडलं तर इतर शैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही.
याची काळजी देखील घेण्याच्या सूचना या ठिकाणी विभागाला देण्यात येतील. शाळाबाह्य मुलांच्या समस्या आहे गांभीर्याने विचार करण्याचा विषय असून त्यावर देखील मार्ग काढला जाईल.
💥जिल्हांतर्गत बदली... विशेष
Ott पोर्टलवर Personal लॉगिन केल्यानंतर जे शिक्षक बदली पात्र आहेत,त्यांच्या नावापुढे-Eligible (बदलीपात्र) असे दिसेल.
जे शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांच्या नावापुढे-Entitled (बदली अधिकार प्राप्त) असे दिसुन येईल.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ११ सप्टेंबर पासून
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया रविवारपासून म्हणजेच ११सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
राज्यात जिल्हा परिषदांतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया नुकतीच झाली. त्यात जवळपास ४००० शिक्षक हे इतर जिल्ह्यांत बदलून गेले आहेत.
त्यानंतर आता जिल्हांतर्गत बदल्यांना सुरुवात होणार आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी रविवारपासून ऑनलाईन माहिती भरण्यास सुरुवात होईल .
आंतरजिल्हा बदली होऊन जिल्ह्यात आलेल्या अनेक जणांना अद्याप शाळा देण्यात आलेल्या नाहीत. त्यांचे समुपदेशन होईल त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी वेळापत्रक निश्चित केले जाणार असून त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.