डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सांज.... नविन कविता कवी प्रकाशसिंग राजपूत

मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे.


मराठी कविता मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ 
               


 

  सांज...


दिवसा थांबे धावपळ ती झांज 

शांत शांत किती रे होत सांज

रंगछट्टा पसरुनी या आसमानी

पक्ष्यांची धाव घरटीच्या दिशेनी


भास्करा लृप्त होणार तळपते राज्य

पुन्हा पसरण्या सोनेरी साम्राज्य

जगास धावण्या तुझ्यापरी लावितो

कष्टानंतर विराम तुच दावितो


प्रकृती हा खेळ तुझा अजब

वर्णन करण्या न शब्द रे गजब

जसा जीवनी रेशमाचा धागा

चाली वाट सुखाची शोधून जागा    प्रकाशसिंग राजपूत

        छ.संभाजीनगर 


 


आता Flipkart वर माझे पुस्तक खरेदी करा... आपल्या प्रियजनास भेट देण्यास उत्तम...खास १०%सवलती दरात