डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

India vs Australia | live match on disney plus hotstar |

India  Vs Australia  आज रंगणार वर्ल्डकपचा महाअंतिम सामना; जाणून घ्या हायव्होल्टेज सामन्याची A टू Z माहिती live match on disney plus hotstar


🏏 एकदिवसीय विश्वचषक 2023 आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात चुरशीची स्पर्धा होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

ind vs aus


🏟️ *कुठे रंगणार अंतिम सामना :* अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 


⏱️ *किती वाजता सामना रंगणार :* दुपारी 2 वाजता


📺 *कुठे पाहता येणार :* Star Sports Network


🤳 *मोबाईलवर कुठं पाहता येणार :* Disney+Hotstar


🎇 *1 वाजून 35 मिनिटांनी :* 10 मिनिटांचा एअर शो 


🎖️ *5 वाजून 30 मिनिटांनी :* वर्ल्ड कप जिंकणाऱ्या माजी कर्णधारांचा गौरव 


🎆 *8 वाजून 30 मिनिटांनी :* लाइट आणि लेझर शो होईल.


🏆 *सामना संपल्यानंतर :* जिंकणाऱ्या संघाला वर्ल्ड कप ट्रॉफी दिली जाईल. तसेच आकाशात 1200 ड्रोन स्टंट करणार आह. 

 Live match on disney plus hotstar 👇




English Special | learning english| spoken english |

 दिवाळी सुट्टी इंग्रजी स्पेशल डिजिटल स्मार्ट शिक्षण ....

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र खास विद्यार्थ्यांना सुट्टीत आनंददायी शिक्षण घेऊन आला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे उपलब्ध करून द्यावे. यासाठी शेअर अवश्य करा व युटुब चॕनलला सब्सक्राईब करा.... Learning english

खालील पीडीएफ मधील नावावर क्लिक करा व्हिडीओ प्ले होईल....  

learning english







गणवेश, बुट योजना माहिती अधिकार | rti | |school uniform |

गणवेश, बुटांचे टेम्पो भरून दस्तऐवज प्राथमिक शिक्षण विभागाला कागदपत्रे



विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेश व बुटांच्या खर्चाचा तपशील जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागितला. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुका, केंद्रनिहाय शाळेकडून गणवेश, बूट school uniform खर्चाच्या तपशिलाची कागदपत्रे मागविली आहेत. सध्या शिक्षण विभागात एक टेम्पो भरून दस्तऐवज जमा झाले. ते सर्व आमदार बंब यांना पाठवले जाणार आहेत.
school uniform



काही महिन्यांपासून आमदार बंब शिक्षण विभागाला वेगवेगळ्या प्रकारची निवेदने देऊन माहिती घेत आहेत. मागील महिन्यात त्यांनी शासकीय शाळेत नोकरी करत असताना जोड व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविली होती. 

 त्यानंतर पुन्हा श्री. बंब यांनी शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात आलेल्या गणवेश व बुटांच्या निधीची माहिती मागवली आहे. त्यामध्ये गणवेश योजनेसाठी शाळानिहाय झालेला निधी वाटप व निधी वाटप करतानाचे निकष, गणवेश, बुटांची शाळास्तरावर झालेल्या खरेदीची सर्व देयके, लाभधारक विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी, शाळानिहाय पुरवठादारांची यादी, तसेच पुरवठादाराने दाखल केलेल्या दरपत्रकांच्या प्रती यासह सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट वाटप करण्यात आले का, याबाबतची माहिती मागवली आहे. जिल्हा परिषद समग्र शिक्षा विभागाकडून या सर्व कागदपत्रांचा तपशील मागवून घेतला जात आहे. जमा करण्यात आलेल्या या कागदपत्रांनी शिक्षण विभागातील संपूर्ण एक खोली भरली आहे. साधारणतः ५० पोती दस्तावेज जमा झाले आहे. ही सर्व कागदपत्रे आमदार बंब यांच्या मागणीनुसार पाठवले जाणार आहेत.

शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन | शिक्षक आंदोलन | | teachers |

 छ. संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रविवार, ०३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे आंदोलन....


छत्रपती संभाजीनगर
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या teachers  शाळांवर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांच्या भेटी घेऊन संबंधित शिक्षकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम दि. १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत करण्याचे नियोजन मान. शिक्षणाधिकारी सो प्राथमिक यांच्या आदेशाने नियोजन करण्यात आले आहे. 

शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतीत वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी,काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांच्याकडून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकांना वारंवार अपमानित करून समाजासमोर शिक्षकांची प्रतिमा डागाळण्याचा हेतूपूरस्कर प्रयत्न केला जात असल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. 
teachers



काही दिवसांपूर्वी शिक्षक भगिनीला भर चौकात ग्रामसभेत अपशब्द वापरून अपमानित केलेले आहे. इतर विभागाचे कर्मचारी यांना ही अट शिथिल आहे, मात्र शिक्षकांना बंधनकारक का ? या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.


शैक्षणिक वर्षे २०२३ - २४ मध्ये शासनाने गणवेश अनुदान वाटप केले आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पंचायत समितीस्तरावर करण्यात आली आहे. मा. आमदार श्री. प्रशांत बंब साहेब यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शाळांकडून माहिती मागवलेली आहे. 

टेम्पो भरून शाळेची गणवेश बुट माहिती जमा... वाचा...


शिक्षकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे असेही निवेदनात संघटनेने स्पष्ट केले आहे . 
जिल्हा प्रशासनाने पुढीलवर्षी शालेय गणवेश अनुदान मुख्याध्यापकांना न देता जिल्हा प्रशासनाने एजन्सी मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे. जेणेकरून शिक्षकांना वेठीस धरले जाणार नाही, या मानसिक जाचातून सुटका होईल. असे निवेदनात स्पष्ट केलेले आहे.

शाळा बंद वरील गीत | new marathi song |

 सरकारी शाळा बंद !!         

स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम स्वर तांबे याने गायलेले हे अप्रतिम गीत....! new marathi song

सहभागी कलाकार:- त्रिग्या मांजलकर,अमोल देसाई,मुकेश जाधव,किरण तांबे,निकेत हळवे आणि सुनिल जाधव आणि संदेश जाधव

नक्की बघा..

सरकारी शाळा टीकू दया,गरीबांचे शिक्षण वाचवा ...

या चळवळीत सहभागी व्हा !  किमान १० जणांना ही पोस्ट शेअर करा....






मनोज जरांगे पाटील यांच्यावरील गीत ....👇









महावितरण कडून रजिस्ट्री होताच मीटर नावावर | meter transfer | | mseb meter transfer |


घर,सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी स्वतःच्या नावावर(meter transfer) करून घेण्याची सोय खरेदीदारांना 'महावितरण' कडून उपलब्ध झाली आहे.

meter transfer


त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली 'महावितरण'शी जोडण्यात आली असून, जुनी मालमत्ता घेताना दस्तनोंदणीपूर्वी पब्लिक डेटा एन्ट्री करताना वीजबिलाच्या नावात बदल करण्याचा पर्याय निवडल्यास 'इज ऑफ लिव्हिंग'नुसार पुढील प्रक्रिया 'महावितरण'कडून स्वयंचलित पद्धतीने करण्यात येत आहे.

महावितरण' आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संयुक्त सहकार्यातून वीजबिलात नावात बदल करण्याची स्वयंचलित प्रक्रिया सुरू केली आहे.

यापूर्वी वीजजोडणी किंवा बिलावरील नाव बदलण्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना ओळखपत्र, इंडेक्स दोन व इतर कागदपत्रे अपलोड करण्याची स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत होती; पण आता दस्तनोंदणीच्या वेळीच वीजबिल नावावर करून

(meter transfer)

 घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

दस्तावेज अपलोडची आता गरज राहणार नाही....

एकाच नावाने मालमत्तेची खरेदी झाली असल्यास अर्जदाराने कोणतेही दस्तावेज अपलोड करण्याची गरज राहणार नाही.

एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे खरेदी असल्यास ज्या व्यक्तीच्या नावे वीजजोडणी करायची, त्यासाठीची संमती व ना हरकत प्रमाणपत्र मागविण्यात येईल.

याबाबत संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 'महावितरण'कडून 'एसएमएस'द्वारे संदेश व वेबलिंक पाठविली जात आहे.

तथापि, 'एसएमएस' पाठविल्यावर ६० दिवसांच्या आत प्रक्रिया शुल्काचा भरणा केला नाही किंवा आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र वेबलिंकद्वारे अपलोड केले नाही, तर नावात बदल करण्याची प्रक्रिया आपोआप रद्द होईल. वीजजोडणीच्या नावात बदल करण्यासाठी ग्राहकांनी सध्याच्या पद्धतीनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.



राज्यातील शाळांना 20, 40 व 60 टक्के अनुदान लवकरच | Grant |

 

राज्यात अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव पुढील टप्पा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने माहिती मागवली आहे.

school grant


ही माहिती देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे.


आता वाढीव टप्पा मिळणार या भावनेने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अनुदानासाठी पात्र ठरलेल्या काही शाळांना अद्यापही अनुदान देण्याची कार्यवाही सुरुच आहे. 

ती कार्यवाही वेळीच पूर्ण करण्याच्या सूचनाही या आदेशान्वये दिल्या आहेत. राज्यातील शाळांना 20, 40 व 60 टक्के अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. त्यासाठी 1100 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय केसरकर यांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे.