डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन | शिक्षक आंदोलन | | teachers |

 छ. संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रविवार, ०३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे आंदोलन....


छत्रपती संभाजीनगर
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या teachers  शाळांवर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांच्या भेटी घेऊन संबंधित शिक्षकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याचे काम दि. १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत करण्याचे नियोजन मान. शिक्षणाधिकारी सो प्राथमिक यांच्या आदेशाने नियोजन करण्यात आले आहे. 

शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतीत वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी,काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांच्याकडून माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून शिक्षकांना वारंवार अपमानित करून समाजासमोर शिक्षकांची प्रतिमा डागाळण्याचा हेतूपूरस्कर प्रयत्न केला जात असल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. 
teachers



काही दिवसांपूर्वी शिक्षक भगिनीला भर चौकात ग्रामसभेत अपशब्द वापरून अपमानित केलेले आहे. इतर विभागाचे कर्मचारी यांना ही अट शिथिल आहे, मात्र शिक्षकांना बंधनकारक का ? या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.


शैक्षणिक वर्षे २०२३ - २४ मध्ये शासनाने गणवेश अनुदान वाटप केले आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पंचायत समितीस्तरावर करण्यात आली आहे. मा. आमदार श्री. प्रशांत बंब साहेब यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शाळांकडून माहिती मागवलेली आहे. 

टेम्पो भरून शाळेची गणवेश बुट माहिती जमा... वाचा...


शिक्षकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे असेही निवेदनात संघटनेने स्पष्ट केले आहे . 
जिल्हा प्रशासनाने पुढीलवर्षी शालेय गणवेश अनुदान मुख्याध्यापकांना न देता जिल्हा प्रशासनाने एजन्सी मार्फत विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावे. जेणेकरून शिक्षकांना वेठीस धरले जाणार नाही, या मानसिक जाचातून सुटका होईल. असे निवेदनात स्पष्ट केलेले आहे.