डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदलीबाबत अवघड क्षेत्रा बाबतीत महत्त्वाचा बदल

 अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकाना बदली

 करुन घ्यावयाची आहे त्यांच्या जागा सुद्धा रिक्त जागा म्हणुन दाखवण्यात येणार आहेत.


 हा नविन बदल झालेला आहे.ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकास बदली हवी आहे त्यांनी आपले नाव आगोदरच द्यावयाचे आहे. आपन बदलीसाठी नाव दिल्यास आपले पद रिक्त दाखवण्यात येणार आहे.

(उणीव संवर्ग ०१/०२ मधील एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील जागा मागितली आणि त्या शिक्षकाची बदली पसंतीक्रमात दिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत झाली तर त्या अवघड क्षेत्रातील शाळेतील बदली इछुक शिक्षक बदली अर्ज करण्या आगोदर विस्थापित होइल. आणि बदली इछुक शिक्षकाने बदलीमध्ये पसंतीक्रम देवुन सुद्धा पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाहीतर तो परत विस्थापित होइल. आणि त्याची जागा भरल्यामुळे त्याला प्रशासनामार्फत शाळा द्यावीच लागेल. इथ थोडा गोधळ उडणार आहे. ही या बदली धोरणातील उणिव राहणार आहे. अवघड क्षेत्रातील शिक्षकाने दिलेल्या पसंतीक्रमामधील शाळा मिळेलच असे काही नाही आणि तो बदली इछुक आसल्यामुळे त्याची जागा रिक्त दाखवल्यामुळे तो बदलीच्या आगोदरच विस्थापित होइल हा शिक्षक विस्थापित झाल्यानंतर या विस्थापित शिक्षकास पदस्थापना कशी द्यायची याचा उलगडा कोठेही नाही कारण हा शिक्षक बदलीच्या आगोदरच विस्थापित होणार आहे त्यामुळे बदली इछुक यादीमध्ये नाव द्यावे की नाही याच विचारात तो राहु शकतो.)

१५ टिप्पण्या:

  1. हे बदली धोरण थोतांड होऊन बसलं आहे.पाहिजे तेव्हा शुध्दीपत्र काढून हवे ते बदल करून काय साध्य करतात त्यांना च माहिती

    उत्तर द्याहटवा
  2. बदली प्रक्रियेत अजून ही बदल होत असतील तर संवर्ग ४ साठी पाच वर्षे असलेली अट रद्द करून तीन वर्ष करायला काय हरकत आहे

    उत्तर द्याहटवा
  3. बदली प्रक्रियेत अजून ही बदल होत असतील तर संवर्ग ४ साठी पाच वर्षे असलेली अट रद्द करून तीन वर्ष करायला काय हरकत आहे? आणि तसे होत नसेल तर किमान त्यांना 3 वर्षानंतर विनंती अर्ज भरायला द्यावा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बरोबर ...एकच शाळेत 5/10 वर्षे काढणे म्हणजे विस्थापित च ...आणि शुध्दीपत्रक काढून आता 30 ऐवजी 100 शाळा भरायची मुभा द्या .....खो खो खो खो खेळा .......

      हटवा
  4. परंतु अवघड क्षेत्रातील शिक्षकाला त्याच्या राऊंडमध्ये त्याच्या पसंतीक्रमाची शाळा मिळाली नाही तर त्याला पुन्हा संवर्ग-4 वाल्या बरोबर फॉर्म भरायची संधी द्यायला पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  5. बदली प्रक्रियेत तीन वर्षाची अट करायला के हरकत आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बदलीची अट तीन वर्षेच पाहिजे

      हटवा
    2. बदलीसाठी ३० जूनपर्यंतची सेवाग्राह्य धरण्यात यावी कारण पूर्वी जूनमध्ये विस्थापितांच्या बदल्या झालेल्या आहेत .

      हटवा
  6. बदली प्रक्रियामध्ये एकतर्फी आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांना जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जिल्हातील एकुण सलग 10 वर्ष सेवा अट रद्द व्हायला पाहीजे.

    उत्तर द्याहटवा
  7. काय मागण्या आहेत, नवलंच आहे... अहो दर तीन वर्षाला बदली म्हणजे तो शिक्षक त्या शाळेवर एकजीव होणार कधी... जरा मानसिकतेचा विचार करा .. बदली झाल्यावर त्याला माहिती आहे की आपण अजून फक्त दोनच वर्ष इथे आहोत म्हणून तन-मन-धनाने काम करणारे कमी लोकं आहेत सरजी... मी तर म्हणतो की फक्त विनंती किंवा तक्रारी बदली व्हावी आपल्या शिक्षक संवर्गातील लोकांची,प्रशासकीय बदली नसलीच पाहिजे...

    उत्तर द्याहटवा
  8. फारच अवघड करून ठेवले आहे. रायगड मधील कर्जत तालक्यातील 271 पैकी 186 शाळा अवघड क्षेत्रा आणून ठेवल्या आहेत. आता शोधा सुगम शाळा पूर्ण जिल्हाय मधून.

    उत्तर द्याहटवा
  9. बदलीत संवर्ग एक दोन ते सर्वांनाच शेवटचे पत्रक अधिकार पत्र इ.भरताना नोकरी आरंभ दिनांक च मोजावी.शिक्षणसेवककाळ पेन्शन,सेवेतही सलग मोजतात.तीन लर्षात एकही खंड नसलेल्या मोठ्या प्रयत्नाने नोकरी टिकवलेल्यांची नोकरी आरंभ दिनांक हीच स्थायी दिनांक आहे.शिक्षक पदाऐवजी सर्वांचीच नोकरी आरंभ दिनांक मोजावी.मग या शाळेत उपस्थित दिनांक,इ.घ्यावे,ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  10. बदलीचे पूर्वीचे धोरणच योग्य होते. आवश्यकता असेल तर व रिक्त जागा असेल तरच बदली हेच योग्य आहे. आता तर बदली म्हणजे गंमत होऊन बसली आहै.

    उत्तर द्याहटवा
  11. काय टिपणी द्यायची सरळ चिठठया काढा व त्याव रील गावात बदली दया प्रत्यक्ष समोरा समोर

    उत्तर द्याहटवा

याबाबत आपली काॕमेंट करा.