डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

डिजिटल द्विभाषिक परिपाठ

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

द्विभाषिक परिपाठ


 चला सोपा करूया परिपाठ...


*संकल्पना व लेखक*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046

आजचे पंचांग

तारीख - २३ जानेवारी २०२३

वार- सोमवार

तिथी-माघ शुक्ल २ शके १९४४

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू


Today's almanac

 Date - 23 January 2023

 Monday

 Tithi-Magh shukla 02 Shaka 1944 

 Ayana-Uttarayana

 Ritu - Shishir Ritu

सूर्योदय: सकाळी ७.०६

सूर्यास्त: सायं. ६.१४,


चंद्रोदय: ८.२८(सकाळी)

चंद्रास्त: ६.०१(संध्याकाळी)

आकार  चंद्रकोर

प्रदीपन 3.6%   


आजचा चंद्र क्षितिजा खाली असेल.


Sunrise: 7.06 am

 Sunset: Evening  6.14,


 Moonrise: 8.28 (am)

 Moonset: 6.01 (evening)

 waxing crescent

 Today's moon will be below the horizon.

Illumination 3.6%


सुविचार

धैर्य धरणार्‍याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.


Good Thought

A person having courage always hears good news.


दिनविशेष


जागतिक दिवस:

राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.


१८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.


१९६६: आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

२००२: ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.


special day


 World Day:

 National Leprosy Prevention Campaign Day.


 1849: Dr.  Elizabeth Blackwell became the first female graduate in medicine.


 1966: On this day, Indira Gandhi became the country's first woman Prime Minister.

 2002: Indian satellite INSET-3C was launched.


जन्मदिवस

१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)


बाळासाहेब ठाकरे

१९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)


१९३०: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.


१९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)


Birthday

 1897: Netaji Subhash Chandra Bose (died: 18 August 1945 – Formosa, Taiwan)


 Balasaheb Thackeray

 1926: Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray (died: 17 November 2012)


 1930: Birth of Derek Walcott, Nobel prize winner in literature.


 1934: Sir William Hardy – British biochemist (died: 6 April 1864)


स्मृतिदिन:


१६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन (जन्म: १८ मार्च १५९४)


१९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (जन्म: २६ मे १८८५)


Memorial Day:


 1664: Shahaji Raje Bhosale accidentally dies after his horse stumbles while hunting in Hodegiri forest in Karnataka (Born: 18 March 1594)


 1919: Ram Ganesh Gadkari – Playwright, poet and humorist.  He wrote stories under the pseudonym 'Govindagraj' and wrote comedy under the name 'Balakram'.  His plays like 'Premsannyas', 'Punyaprabhava', 'Ekch Pyala', 'Bhavbandhan', 'Rajsannyas' were very popular.  His poems have been collected under the name 'Vagvaijayanti'.  (Born: 26 May 1885)


आजची म्हण व अर्थ


उंदराला मांजर साक्ष - वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साक्ष देणे.


Today's proverb and meaning


 Cat Witness to Mouse  - Witnessing each other while doing evil.


कोडे

साखर खवा सुगंधासाठी 

विलायची टाका जपुन

फळाफुलांच्या नावानेच

  उर येतो भरुन....


उत्तर गुलाबजामून


सामान्य ज्ञान

1)भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?

उत्तर : इंदिरा गांधी (1971)


2) भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?

उत्तर : लार्ड विलियम बैंटिक


3) चंद्रावर मानवाला पाठवणारा पहिला देश कोणता होता?

उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)


4) रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?

उत्तर : व्हिटॅमिन A


5) सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?

उत्तर : कोपर्निकस


General knowledge

 1) Who was the first Indian woman to be awarded Bharat Ratna?

 Answer : Indira Gandhi (1971)


 2) Who was the first Governor of India?

 Answer: Lord William Baintick


 3) Which was the first country to send a man to the moon?

 Answer: United States of America (USA)


 4) Night blindness is caused by deficiency of which vitamin?

 Answer: Vitamin A


 5) Which scientist discovered solar energy?

 Answer: Copernicus


बोधकथा

एकदा एक किड्याचे पोर त्याच्या आईला म्हणाले," आई मला आता दिसू लागले आहे."

तेव्हा परीक्षा पाहण्यासाठी त्याच्यासमोर एक जायफळ ठेवून त्याची आई त्याला म्हणाली," अरे, हे काय आहे बरं?"

पोर म्हणाले,"आई हा वाटोळा दगड आहे."

हे ऐकून त्याचे आई म्हणाली,"बाळा तुला दिसू तर लागले नाहीच, पण तुला अजून वासही समजत नाहीये."


तात्पर्य

माणूस आपले एक व्यंग लपून पाहतो पण अशावेळी त्याचे दुसरे व्यंगही उघडकीस येते.


Moral story

Once a baby insect said to his mother, "Mother I can see now."

 Then his mother placed a nutmeg in front of him for examination and said to him, "Oh dear baby, what is this?"

 Baby insect said, "Mother this is an ovel shape stone."

 Hearing this, his mother said, "Baby you can't see, but you don't even smell yet."


 Moral

 A man hides one of his sarcasm, but then his other sarcasm also comes out.


Names of trees around us

Guava Tree ग्वावा ट्री  पेरुचे झाड


Mahogany Tree   महोगनी ट्री   महोगनी झाड


Sal Tree      साल ट्री       साल वृक्ष



Pine Tree  पाईन ट्री      पाईन वृक्ष


Peepal Tree     पीपल ट्री  पिंपळाचे झाड


विद्यार्थ्यांना या झाडांबद्दल एक एक वाक्य बोलण्यास प्रेरित करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: