जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक ग्रामविकास विभागाने निर्गमीत केले आहे.
सध्या बदलीपात्र शिक्षकांनी बदलीकरिता दिनांक २१.१.२०२३ ते २४.१.२०२३ (४ दिवस) या कालावधीत फॉर्म भरण्याचा टप्पा सुरु आहे.
बदलीपात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्याने सदर शिक्षकांना फॉर्म भरण्यासाठी ४ दिवसांचा अवधी कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संदर्भाधीन दिनांक २०.१२.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित केलेले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे :-