डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
शिक्षक बदली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिक्षक बदली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत | inter district | transfer | ottmaha|

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत...inter district transfer


जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याबाबत सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन दि. २१/०६/ २०२३ च्या शासन निर्णयान्वय तसेच दि. ०३/११/२०२३ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात,
येत आहेत. (31) शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ मधील परिच्छेद क्र.२.१ नुसार जे शिक्षक कर्मचारी दि. ३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असतील, अशा शिक्षकांनाच अर्ज भरण्याची संधी देण्यात यावी..


तसेच सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी त्यांना बदली मिळाली नव्हती. अशा शिक्षकांना सन २०२२ मध्ये भरलेल्यांना अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीट करण्यास संधी देण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.
(क) मा. न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडील अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना संधी देण्यात यावी. तथापि, असे करतांना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन / विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे.

उपरोक्त (अ) मधील नमूद बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिध्द करण्याची व अवलोकनाची कार्यवाही करावी. तसेच बदलीपात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची मुदत दि.०६/१२/२०२३ पर्यंत देण्यांत येत असून तद्नंतर बदलीची कार्यवाही सुरु करण्यात येईल. वरीलप्रमाणे सूचना सर्व संबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी. असे आदेशीत करण्यात आलेले आहे.

पहा ७/०४/२०२१ चे आंतरजिल्हा बदली धोरण....*👇

https://youtu.be/C2Nqoo0wihY




inter district transfer आदेश पहा...👇


आंतरजिल्हा बदली


प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक

 सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

२. शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि.२१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत.

त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते, मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदली प्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने आपल्या जिल्हयातील बिंदुनामावली तयार करण्याची प्रक्रीया पुर्ण करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत दि.०९.१०.२०२३ रोजी झालेल्या Video Confrance मध्ये संचालक शालेय शिक्षण यांनी आदेशीत केले होते.

 त्यानुसार सदर बिंदुनामावली पुर्ण करुन मंजूर करण्यात आलेली बिंदुनामावली बदली पोर्टल वर अपलोड करण्याची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी कोणत्याही परिस्थीतीत दि.२८/१०/२०२३ ते दि.२९/१०/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी. याबाबत काही प्रश्न उदभवल्यास Vinsys IT Services या कंपनीशी संपर्क साधवा ही विनंती.






आंतरजिल्हा बदली महत्त्वाचा आदेश...

 सन २०२२ मध्ये ज्या  शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही


२०२१ चे बदली धोरण पहा....




जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन २०२२ ची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे. तसेच दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.


३. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील दि.२१.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १ मध्ये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे नमूद केले आहे.


सदर मुद्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. असे पत्रात नमूद केलेले आहे.


i) सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळणेसाठी पात्र ठरले होते, तथापि रिक्त जागा नसल्याने ज्यांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची यादी संबंधित जिल्हा परिषदांनी Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Pune कडून प्राप्त करुन घ्यावी.असे पत्रात नमूद केलेले आहे.


ii) सदर यादीमधील शिक्षकांची दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मागदर्शक सूचना व संवर्गनिहाय प्राधान्यक्रमानुसार सुधारित यादी तयार करण्यात यावी. सन २०२२ मधीलशिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण / सक्षम प्राधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत उपलब्ध करून घेण्यात यावी. अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी तयार करावयाच्या यादीमध्ये प्राधाम्न्य देण्यात यावे.असे पत्रात नमूद केलेले आहे.

ii) आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक शिक्षकांनी नमूद केलेल्या पर्यायानुसार संबंधित जिल्हा परिषदांमध्ये रिक्तता असल्यास अशा शिक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांमध्ये सद्यस्थितीत प्रवर्गनिहाय रिक्त पदे नसतील, अशा ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांनी परस्पर समन्वयाने त्या त्या प्रवर्गामध्ये रिक्त पदे उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने संबंधित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करावी.


iv) आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर जिल्ह्यातील रिक्त जागा विचारात घेवून ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि.२३.०५.२०२३ मधील मुद्दा क्र. १३ व १४ नुसार आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी.


(v) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत शा.नि. दि.२३.०५.२०२३ मधील २.८ मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट या वर्षीच्या बदलीकरिता शिथिल करण्यात यावी.असे पत्रात नमूद केलेले आहे.







शिक्षक बदली आता थांबणार .... शिक्षणमंत्री

 दिपक केसरकर यांची शिक्षक बदली संदर्भातील मोठी घोषणा ...

  या वर्षीपासून सर्व शासनाच्या मुलांना आम्ही गणवेश दिले जाणार आहेत. लवकरच स्कूल बुट व इतर साहित्य आम्ही देणार आहोत. हा विषय लवकरच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकित घेतला जाईल.




शिक्षकाच्या बदल्याबाबत ते पुढे  म्हणाले, 

शिक्षकाच्या बदल्या आम्ही रद्द करण्याचा विचार आम्ही करतोय. कारण संबधित शिक्षकांची मुलांना सवय झालेली असते. शिक्षकाला पुरेसा वेळ देता येतो.'


शिक्षणमंत्री म्हणाले की, ''शिक्षकांना बदल्यांसाठी कुणालाही पैसे देऊ नका, असे सांगितलेले आहे. शिक्षकाच्या फक्त विनंतीनंतरच त्यांची बदली होईल. तसेच गैरवर्तवणूक झाल्यास त्याची बदली होतील. लवकरच याबाबत आम्ही शासन निर्णय काढणार आहोत.''



जिल्हातंर्गत बदली अपडेट



 जिल्हाअंतर्गत बदलीबाबत...

            _जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात शासन निर्णय तयार झाला असून उद्या किंवा समोरच्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता आहे...._

 *आंतरजिल्हा बदलीबाबत...*

               _आंतरजिल्हा बदली संदर्भात वेळापत्रक सुद्धा लवकर निर्गमित होऊन बदल्या कार्यान्वित होणार आहेत..._



 माहिती सौजन्य


                       

                *संतोष पिट्टलावाड*

                      राज्यध्यक्ष

      शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य


                  रवी अम्बुले

               विभागीय अध्यक्ष

शिक्षक सहकार संघटना नागपूर विभाग

शिक्षक बदली न होण्याबाबत शिक्षक संघटनांची भुमिका

 शिक्षकांच्या बदल्यांचा मुद्दा फार महत्त्वाचा ठरत आहे, दरवर्षी बदली प्रक्रिया करणे आणि ती 31 मे पूर्वी ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण 7 एप्रिल 2021 च्या जीआरमध्ये नमूद आहे.

    उच्च न्यायालयाने देखील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.



    शिक्षक संघटनांची याविषयी भुमिका  काय?


    शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनानी नाराजी व्यक्त केली आहे, तसेच शिक्षकांच्या बदल्या या तर तीन वर्षांनी झाल्याचं पाहिजे, असं म्हणत शिक्षक संघटनेने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. शासनाने जर हा निर्णयही घेतला नाही तर राज्यभरात रान पेटवू असा इशारा शिक्षक संघटनानी दिला आहे.

    राज्य शासन जर बदल्यांसंदर्भात शिक्षण धोरणानुसार वागत असेल तर हा शिक्षकांवर अन्याय आहे. बदल्याच झाल्या नाही तर शिक्षक एकाच ठिकाणी खितपत पडेल.शिक्षकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाने शिक्षकांच्या बदल्या संदर्भात प्रमाणबद्ध धोरण सुचवावं आणि बदल्यांचा निर्णय बदलावा. शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार नाहीत या धोरणाला शिक्षक संघटनांचा स्पष्ट विरोध आहे. जर शासन या धोरणावरच ठाम असेल तर राज्यभरात रान पेटवू असा इशारा शिक्षक संघटनानी दिला आहे.

आता महिला शिक्षकांना अवघड क्षेत्रात बदली

 ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या ऑनलाईन बदली करिता आता 26 बदल करण्यात आलेले आहे .

यामध्ये आता प्रामुख्याने महत्त्वाचा बदल असा करण्यात आलेला आहे की , दुर्गम क्षेत्रातील शाळेवर आता महिला शिक्षकांची बदली ही करण्यात येणार आहे येणार आहे ग्रामसेवक तथा तलाठी यांच्या प्रमाणे आता महिला शिक्षिकांनाही आवड क्षेत्रामध्ये सेवा बजवावी लागणार आहे.

अवघड क्षेत्रातील सुंदर अशी मुरूमखेडावाडी ची शाळा


 हा फार मोठा बदल बदल्यांमध्ये करण्यात आलेला असून 2023 च्या बदल्यांमध्ये हा नियम लागू होणार आहे.  अवघड क्षेत्रातील शाळेवर आता महिला शिक्षिका़ंना बदली देण्यात येणार आहे. 2017 च्या बदली धोरण नंतर अनेक बदली बदल निर्माण झालेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अवघड क्षेत्रात  महिलांसाठी बदली देण्यात येऊ नये असे निश्चित झालेले होते .परंतु या वेळेस केलेल्या 26 बदलांमध्ये आता महिलांना अवघड क्षेत्रात नोकरी करावी लागणार आहे.

जिल्हातर्गत बदलीचा ६वा टप्पा रद्द होणार नाही...!

 बदलु संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न 

मा. मंत्री, ग्राम विकास मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दालन क्र. १२३. पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे गुरुवार, १६.०३.२०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरहू बैठकीचे इतिवृत्त सोबत दिलेले आहे.  






शिक्षक बदली साॕफ्टवेअर संदर्भात मार्गदर्शक व्हिडीओ पहा....#teachertransfer,#online,

 शिक्षक आॕनलाईन  बदली संदर्भात साॕफ्टवेअर तयार झाले असून त्याबाबतचा मार्गदर्शक व्हिडीओ देण्यात आलेला आहे. 




बदली प्रक्रिया ही नव्या साॕफ्टवेअर द्वारे पार पडणार असून याबाबतीत शिक्षकांना व्यवस्थित माहिती व्हावी  यासंदर्भात हा व्हिडीओ सादर झालेला आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक  करा....






शिक्षक बदलीबाबत महत्त्वाची माहिती #teachertransfer,

 बदली अपडेट ....


शिक्षक बदली सॉफ्टवेअरसाठी* विकास पथक (https://www.vinsys.com) आणि सातारा आणि पुणे जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात आज पुण्यातील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात बैठक झाली. 



सॉफ्टवेअर प्रणालीच्या विकासात झालेल्या प्रगतीचा आढावा पुणे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला.

  • सॉफ्टवेअर सुरक्षा, उपयोगिता आणि जबाबदारी यावर लक्ष केंद्रित करेल.
  •  सॉफ्टवेअर वापरकर्त्यांना एकावेळी एका उपकरणावरून लॉग इन करण्यास अनुमती देईल आणि प्रत्येक लॉगिनमध्ये IP पत्ता आणि लॉग संग्रहित असेल. 
  • ब्लॉकचेनची संकल्पना लागू करताना, ऑडिट लॉग एकमेकांशी जोडले जातील, ज्यामुळे एकल एंट्री सुधारणे अशक्य होईल. 
  • डेटामधील प्रत्येक बदल ट्रेस करता येण्याजोगा असेल आणि ज्या व्यक्तीच्या डेटामध्ये बदल केला गेला आहे त्या व्यक्तीला दृश्यमान असेल, जरी एखाद्या प्राधिकरणाने त्यात बदल केला असेल. 
  • प्रत्येक सबमिशनसाठी *6 अंकी OTP* द्वारे अधिकृतता आवश्यक असेल. सॉफ्टवेअर वापरात आणण्यापूर्वी, सॉफ्टवेअरचे सुरक्षा ऑडिट करण्यासाठी मान्यताप्राप्त तृतीय-पक्ष एजन्सीद्वारे *सुरक्षा ऑडिट* केले जाऊ शकते.



सॉफ्टवेअर हे शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि राज्य सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक व्यासपीठ आहे - कोणत्याही प्राधिकरण किंवा व्यक्तीच्या हस्तक्षेपास वाव नाही. कार्यपद्धतीमध्ये *भूमिका-आधारित विभाजन* असेल, त्यामुळे प्रत्येक अधिकारी फक्त त्याची भूमिका बजावू शकतो आणि त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही.



हे सॉफ्टवेअर *मराठी आणि इंग्रजी* भाषांमध्ये उपलब्ध असेल. *संगणक किंवा मोबाईल* फोन वापरून सॉफ्टवेअरमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. *कार्यक्षम प्रवेश* आणि *सुलभ नेव्हिगेशन* ला अनुमती देण्यासाठी प्रत्येक स्क्रीनवर मर्यादित माहिती असेल. *वेबसाईट अपंग व्यक्तींसाठी अनुकूल बनवण्यासाठी देखील पावले उचलली जात आहेत.* सर्व्हरची रचना अशा प्रकारे केली जात आहे की प्रतिसाद वेळ तीन सेकंदात असेल.


बदली प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा डेटा *इतर प्रत्येक शिक्षकाला* दिसेल. शिक्षक *प्रणालीमध्ये त्यांचा डेटा बदलण्याची* विनंती करू शकतात आणि इतर शिक्षकांनी चुकीची माहिती प्रविष्ट केली असल्यास आक्षेप देखील नोंदवू शकतात. सर्व शिक्षक आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट *डॅशबोर्ड* दाखवले जातील; सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती असलेला एक स्पष्ट *सूचना फलक* आहे.


असा अंदाज आहे की हस्तांतरण सूची अंतिम करण्यासाठी सॉफ्टवेअर किमान 2.5 दिवसांसाठी *एकाधिक पुनरावृत्ती* आयोजित करेल.


सर्व सहभागींचा डेटा *शालार्थ आणि सरल* पोर्टलवरून प्राप्त केला जाईल. म्हणून, सर्व शिक्षकांना विनंती आहे की ताबडतोब *डेटा अपडेट करा* - विशेषतः त्यांचे आधार क्रमांक, नवीनतम फोन नंबर आणि सेवा रेकॉर्ड सत्यापित करा. सॉफ्टवेअर लाइव्ह होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांना *कठीण किंवा अवघड नसलेल्या* भागातील शाळा कार्यान्वित करण्यासाठी घोषित करण्याची विनंती केली जाते.




7 एप्रिल 2021 च्या सरकारी ठरावानुसार सॉफ्टवेअर विकसित केले आहे की नाही याची *तपासणी* करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या *3 व्यक्तींना* आमंत्रित करण्याची समितीची योजना आहे? एक हॅकाथॉन आयोजित केली जाईल ज्याद्वारे आम्ही सिस्टममधील कोणत्याही सुरक्षा त्रुटी ओळखण्यात आणि त्या दुरुस्त करण्यात सक्षम होऊ. सॉफ्टवेअरच्या वापराबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म तयार केला जाईल.


हे सॉफ्टवेअर *अत्यंत खबरदारी* आणि *वेगवान गतीने* विकसित केले जात आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच वेबसाइट सुरू होईल आणि वेळापत्रकानुसार शिक्षक बदल धोरण लागू केले जाईल.

                           


रखडलेल्या शिक्षक बदल्या आता मार्चनंतर.... #Teacher #transfer

 शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर कराव्यात, असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. 



यावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी, बदल्या सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल व मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी ग्वाही दिली.




शिष्टमंडळात शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, रवी अंबुले, जयप्रकाश हेडाऊ, शत्रुघ्न मरस्कोल्हे, असलम शेख, अमीर अली सिद्दिकी उपस्थित होते. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करावी, पोकळ बिंदू नामावलीनुसार आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या करणे, राज्य रोष्टर, विभाग रोष्टर एक करणे, 10 टक्केची अट रद्द करावी तसेच आदिवासी, नक्षलग्रस्त भागात सेवा करणाऱ्या शिक्षकांचा वेगळा संवर्ग निर्माण करणे, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या बदल्या विनाअट करणे, शिक्षणसेवक मानधन वाढवून 20 हजार करणे, पदोन्नतीची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा पाचवा टप्पा राबवावा, सर्व मुलांना मोफत गणवेश देण्यात यावेत.