डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही

 पवित्र (pavita)प्रणालीद्वारे झालेल्या/होणाऱ्या 

शिक्षक, शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. तसेच ही प्रक्रिया विहित मुदतीत पार पाडणे बंधनकारक असणार आहे.


याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला असून त्याचा लाभ राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालये,अध्यापक विद्यालये आणि विद्यानिकेतन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.(सविस्तर माहितीसाठी निर्णयाची प्रत जोडली आहे). 

जुलैमध्ये ४ % महागाई भत्ता वाढणार ?

शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती सुस्पष्ट, पारदर्शक, सोपी व सुटसुटीत व्हावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. या सुधारणेमुळे प्रक्रियेसाठी लागणारा एकूण वेळ आणि कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन ती अधिक शिक्षकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यास मदत होईल.


आदेश पहा













बदली बाबत १०/०६ चे परिपत्रक

 संवर्ग १ व संवर्ग दोन बाबतीत करावयाच्या कार्यवाही व पुढील प्रक्रिया राबविणेबाबत. सुचना देण्यात आलेल्या आहेत.

 बदली परिपत्रक पहा....






जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मा. मंत्री ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मा. मंत्री (ग्राम विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि. १४ जून २०२२ रोजी आयोजित बैठकीस उपस्थित राहणेबाबत पत्र काढण्यात आलेले आहे.




बदली पोर्टलवर असे तयार करा प्रोफाईल...


जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या  विविध प्रश्नांबाबत मा. मंत्री ग्राम विकास यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १४ जून २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मंत्रालयातील दालनात दालन क्र. ३०२, ३रा मजला मुख्य इमारत बैठक आयोजित करण्यात आलेली  आहे. तरी सदर बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती आहे. 

पोर्टलवर माहिती कशी भरावी....

 पोर्टल वरील प्रोफाईल कसे अद्ययावत करायचे ते पहाण्यासाठी.... 








शिक्षक बदली पोर्टल सुरु...

आनंदाची बातमी...

शिक्षक बदली पोर्टल सुरू झाले आहे....




आपला मोबाईल टाकून लॉगिन करून पाहावे





पोर्टलवर माहिती कशी भरावी ते पाहण्यासाठी ...





बदली संदर्भात अपडेट मिळण्यासाठी डिजिटल चॕनल सबस्क्राईब करा...

 




बदली प्रक्रियेचा होणार श्रीगणेशा...

 जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया गेल्या २ वर्षापासून स्थगित होत यावर्षीच्या ही बदल्या होतील की नाही याची शाश्वती शिक्षकांना वाटत नव्हती पण यावर पुर्ण विराम आता लागणार आहे.



वरीलप्रमाणे आज बदली प्रक्रियेला श्रीगणेश होत आहे.

 शाळा पुर्व तयारी अभियान मेळावा दुसरा...

बदल्यांना आता वेग येणार

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. 

सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. 


सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने बुधवार दि.०८.०६.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी, सदर प्रशिक्षणासउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), जिल्हा परिषद यांच्यासह उपस्थित रहावे,  असे कळविण्यात आलेले आहे.

वैद्यकिय बिल मंजुरीचे शिक्षणाधिकारी यांना आदेश

सदर प्रशिक्षणाची V.C. लिंक यथावकास कळविण्यात येणार आहे.



आजचे पत्र पहा....