डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदल्यांना आता वेग येणार

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. 

सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. 


सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने बुधवार दि.०८.०६.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी, सदर प्रशिक्षणासउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), जिल्हा परिषद यांच्यासह उपस्थित रहावे,  असे कळविण्यात आलेले आहे.

वैद्यकिय बिल मंजुरीचे शिक्षणाधिकारी यांना आदेश

सदर प्रशिक्षणाची V.C. लिंक यथावकास कळविण्यात येणार आहे.आजचे पत्र पहा....
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: