संयुक्त राष्ट्र महासभेने 24 जानेवारी 2018 रोजी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 50 पेक्षा अधिक देशांनी या निर्णयाचे स्वागत केले.
आणि आज सर्व देशभरात आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केल्या जातो.
शिक्षण हे सर्व समस्यांवर उपाय आहे, असे म्हणटले जाते. मग ती गरिबी-अशांतता असो किंवा विकासाचा अभाव असो. या सर्व समस्या सोडवण्याचा मार्ग जिथे जातो, ते शिक्षण आहे. 24 जानेवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणुन साजरा केला जातो. संपूर्ण जगाच्या दृष्टीने हा दिवस फार महत्वाचा आहे.
2018 मध्ये घेतला 'हा' निर्णय : संयुक्त राष्ट्र महासभेने 2018 मध्ये दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 50 हून अधिक देशांनी हा निर्णयाचे स्वागत केले. तेव्हापासून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व : जगातील प्रत्येक घराघरात शिक्षण पोहोचवण्याचे ध्येय अजूनही दूरचे वाटते. दर्जेदार शिक्षण अजूनही करोडो मुलांपर्यंत पोहोचलेले नाही. ऑनलाइन माध्यमाने या क्षेत्रात काही प्रमाणात प्रगती केली आहे. परंतु तरीही अनेक ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही. विविध आकडेवारीनुसार, जगभरातील लाखो मुले अजूनही शाळेत जात नाहीत. शाळेत जाणारी करोडो मुले आहेत, पण दर्जेदार शिक्षणाचा मोठा अभाव आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच हुकले आहे. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी उपाय शोधणे हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आयोजित करण्याचा मुख्य हेतू आहे.
यामागचा उद्देश : 'आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश, जगामध्ये शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हा आहे. मानवी जीवनात शांतता आणि विकास या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ते साध्य करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असू शकतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हा आहे की, प्रत्येक व्यक्ती आणि मुलाला लवकरात लवकर मोफत आणि मूलभूत शिक्षण मिळावे. जगभरात या दिवशी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. त्याची मुख्य थीम शिकणे, नवकल्पना आणि वित्तपुरवठा या विषयांशी संबंधित असते. वर्ष 2023 च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम अद्याप ठरलेली नाही.
डिजिटल परिवर्तन : युनेस्कोच्या मते, सर्वांसाठी आजिवन, सर्वसमावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण मिळाल्याशिवाय कोणताही देश लैंगिक समानता मिळवू शकत नाही. शिक्षण नसेल तर, लाखो गरिबीचे चक्र खंडित होणार नाही. गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनामध्ये सर्वांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार स्थापित करु शकतील, अशा महत्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला आहे. या बदलांमध्ये तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाचा देखील समावेश आहे. यामुळे जगातील २५८ दशलक्ष शाळेत न गेलेल्या मुले आणि तरुणांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.