डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 170 वा

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस170 वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -१२ फेब्रुवारी २०२४

वार- सोमवार

तिथी- शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि २३, माघ शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

सूर्योदय 07:04, 

खगोलीय दुपार: 12:49, 

सूर्यास्त: 18:34, 

दिवस कालावधी: 11:30, 

रात्र कालावधी: 12:30.

🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙

सुविचार

जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


Good Thought

No one can stop a man who is not ashamed of hard work from succeeding.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१८४७: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९३१)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ

आईजीच्या जिवावर बाईजी उदार दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे.


Proverb with its meaning

A bird in the hand is worth two in the bush

Meaning: What you have is better than what you might get

Example: I think I’ll sell my car at the offered price instead of waiting for something higher. After all, a bird in hand is worth two in the bush.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे

काळा घोडा पांढरी स्वारी, एक उतरवला तर दुसऱ्याची पाळी.

उत्तर: तवा आणि पोळी


माझा भाऊ मोठा शैतान, बसतो नाकावर पकडून कान. ओळख पाहू कोण?

उत्तर: चष्मा


Riddles


I shave every day, but my beard stays the same. What am I?

Answer: A barber

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान


1 महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?


उत्तर : 720 किमी


2  महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

उत्तर : मुंबई


3 महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?


उत्तर : नागपूर


4 महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?


उत्तर : कळसुबाई (1646 मी.)


5 महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?


उत्तर : तिसरा


general knowledge


 1 What is the length of Arabian sea coast enjoyed by Maharashtra?


 Answer : 720 km


 2 Which is the capital of Maharashtra?

 Answer: Mumbai


 3 Which is the vice-capital of Maharashtra?


 Answer: Nagpur


 4 Which is the highest peak in Maharashtra?


 Answer : Kalsubai (1646 m.)


 5 What is the number of Maharashtra in terms of area in India?


 Answer: Third

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा

घामाचा पैसा


धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: