डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 183/school assembly/

 चला सोपा करूया परिपाठ

*दिवस183वा*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२९फेब्रुवारी २०२४

वार- गुरूवार

तिथी- माघ कृ ५ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि ९ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024

सूर्योदय 06:59,

 खगोलीय दुपार: 12:51, 

सूर्यास्त: 18:44, 

दिवस कालावधी: 11:45, 

रात्र कालावधी: 12:15.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सुविचार

ज्ञान तिथे मान.


Good thought

Courage to continue matters more than success or failure.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

दिनविशेष

जन्म:

१८९६ - मोरारजी देसाई (चित्रीत), भारताचे माजी पंतप्रधान.

१९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

२०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.

२०१२: ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.

special day

 Born:

 1896 – Morarji Desai (pictured), former Prime Minister of India.

 1996: The Kenyan team, known as a new and underdog team in the cricket world, recorded a historic victory by defeating the two-time world champions West Indies by 73 runs in the Cricket World Cup.

 2000: Sasikiran becomes India's 5th Grandmaster.

 2012: Construction of the world's tallest tower (not a building), the Tokyo Sky Tree at 634 meters, is completed.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

म्हणी/proverb

The wearer best knows where the shoe pinches -ज्याचे जळते त्यालाच कळते/जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोडे

पिवळसर चॉकलेटी रंग

मी आहे एक अद्भुत कडधान्य

अन्नधान्यात पूरक मी

तेलही माझे उपयोगी

रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो

आरोग्य चांगले राखायला मदत करतो


सोयाबिन

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

सामान्य ज्ञान

०१) भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

- श्रीमती प्रतिभाताई पाटील.


०२) भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

- श्रीमती इंदिरा गांधी.


०३) भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष (स्पीकर) कोण ?

- मीरा कुमार.


०४) भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण ?

- सरोजिनी नायडू.


०५) भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?

- सुचिता कृपलानी.(उत्तर प्रदेश)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

general knowledge

 01) Who is the first woman President of India?

 - Mrs. Pratibhatai Patil.


 02) Who was the first woman Prime Minister of India?

 - Mrs. Indira Gandhi.


 03) Who is India's first woman Lok Sabha Speaker (Speaker)?

 - Meera Kumar.


 04) Who was the first woman Governor of India?

 - Sarojini Naidu.


 05) Who was the first woman Chief Minister of India?

 - Suchita Kripalani.(Uttar Pradesh)

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

बोधकथा

*गर्विष्ठ मेणबत्ती*

एकदा एका माणसाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते. ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला. आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्यावेळी व ज्या ठिकाणी चंद्र सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही, त्यावेळी व त्या ठिकाणी माझा प्रकाश पडू शकतो. चंद्रसूर्य ही माझ्यापुढे शूद्र वाटतात." तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली.त्यातला एकजण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली आणि मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटवली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, "अग वेडे आता तरी प्रकाश दे. एवढ्या झुळकेने विझतेस? चंद्र सूर्याला शूद्र समजतेस?त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस? चंद्र सूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने भिजून गेले आहेत का?"

तात्पर्य:- आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: