चला सोपा करूया परिपाठ
*दिवस181वा*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख -२७फेब्रुवारी २०२४
वार- सोमवार
तिथी- माघ कृ ३शके १९४५
अयन-उत्तरायण
ऋतू - शिशिर ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान"
भारतीय सौर दि ७फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024
सूर्योदय 07:00,
खगोलीय दुपार: 12:51,
सूर्यास्त: 18:43,
दिवस कालावधी: 11:43,
रात्र कालावधी: 12:17.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सुविचार
*प्रकाश पसरवण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर मेणबत्ती व्हा किंवा तिचे प्रतिबिंब दिसणारा आरसा व्हा. किरण सूर्याचा असो वा आशेचा, तो जीवना तील सर्व अंधार दूर करतो.*
Good Quote
“Many of life’s failures are people who did not realize how ddxr xxx exxx xrxdx d they were to success when they gave up.” – Thomas A. Edisonrddxxxx
Cccc
"आयुष्यातील बरेचसे अपयशी असे लोक आहेत ज्यांना हे समजले नाही की त्यांनी हार पत्करली तेव्हा ते यशाच्या किती d आहेत." – थॉमस ए. एडिसन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
दिनविशेष
मराठी राजभाषा दिवस
Ytc
मdddrdxाठी भाषा दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र आणि गोवा या भारतातील राज्यांमध्ये साजरा xdxxdxrdxxxrdxकेला जातो. हा दिवस राज्य सrxरकारद्वारे नियंत्रित केला जातो. प्रख्यात मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी
१४८५: बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म.
१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)
मृत्यूदिन
१८८७: आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (जन्म: ३१ मार्च १८६५)
special day
Marathi Official Language Day
Marathi Language Day is celebrated every year on February 27 in the Indian states of Maharashtra and Goa. This day is controlled by the state government. It is celebrated on the birth anniversary of famous Marathi poet Kusumagraj.
2001: Successfully test-fired indigenously developed surface-to-air missile 'Akash' at Chandipur base.
1485: Birth of Chaitanya Mahaprabhu, a Vaishnava saint and cult promoter in Bengal.
1899: Birth of Charles Herbert Best, biochemist, inventor of insulin. (Death: 31 March 1978)
death anniversary
1887: Anandibai Gopalrao Joshi – India's first woman doctor (Born: March 31, 1865)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
म्हणी व त्याचा अर्थ
अठरा विश्व दारिद्र्य त्याला छत्तीस कोटी उपाय. – जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक उपाय आहेत, फक्त ते आचरणात आणले पाहिजेत.
English Proverb
Better late than never
It is better to do something late than not do it at all.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कोडे
आजीबाईच्या शेतात
एका सुपात बारा कणसं
त्याचे 30-31 दाणे
अर्धे काळे अर्धे पांढरे
असे हे जीवन गाणे
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर:- एका वर्षातले बारा महिने प्रत्येक महिन्यात असलेले 30 किंवा 31 दिवस आणि काळे पांढरे दाणे म्हणजे दिवस व रात्र
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सामान्य ज्ञान
1) मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा करण्यात येतो?
:- मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो.
2) 27 फेब्रुवारीला कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस असतो?
वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज
3) मराठी राजभाषा दिनाचे दुसरे नाव काय आहे?
:- मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटले जाते.
4) मराठी भाषा कोणत्या राज्यांची अधिकृत राजभाषा आहे?
:- महाराष्ट्र आणि गोवा
5) मराठी ही भारतातील कितव्या क्रमांकाची भाषा आहे?
:- मराठी ही लोकसंख्येनुसार भारतातील तिसऱ्या आणि जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बोधकथा
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मराठी भाषा दिन कविता
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा,
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.