डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

खामनदी गीताला पुरस्कार

 🏆🥇🎼🎧🎤



    गीत पहा  


*खामगीत स्पर्धेत आमच्या  गीताला पुरस्कार मिळाला आहे. गीताची निवड प्रथम क्रमाने  ही झालेली आहे.*


 



*नताशा झरीन मॕडम मॕनेजिंग डायरेक्टर इकोसत्व व ग्राईंड मास्टर कंपनी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे.*


          *गायन - श्री राजेश ढेंगळेसर*

          *गीतलेखन - प्रकाशसिंग राजपूत*

   संगीत- प्रथमेश व राजश्री ढेंगळे वाशिम



खडकी वसले या खाम नदी तीरास...

काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...



रचला इतिहास औरंगाबाद  नगरीचा,

प्रवाह झाला आज जरी दूषित धारेचा,

ओसरत्या काळात रुप जरी बनले कुरूप,

वाहते तिच घेऊन नवा हुरूप,


(खडकी वसले या खाम नदी तीरास...

काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)


साज नवा घडण्यास पुन्हा आतूर,

जल शुद्ध होण्या  जीव हा अधीर,

माणसा सोड रे घाणेरडी प्रथा,

राख  दशा सजेल नगरीची नवी गाथा,


(खडकी वसले या खाम नदी तीरास...

काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)


बादशहा ही अखेर रमून या नगरीत,

तख्त सोडून दिल्लीचे औरंगाबाद  वसवित,

परंपरा होती जुनी राहून गेली ही छाप ,

गोदावरीस मिलाप वाटे आज शाप,


(खडकी वसले या खाम नदी तीरास...

काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)


झाला हा  खेळ खूप जाग नागरिका,

जल होऊन स्वच्छ प्रवाह बनेल का?

माझे हरपले ते वैभव  आता मिळेल का?

नदीमाय माझी ओळख परत होईल का?


(खडकी वसले या खाम नदी तीरास...

काळ सरता तिचे अस्तित्व येई धोक्यात...)


      ✒️प्रकाशसिंग राजपूत ✒️



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: