📣📣
राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नावरील कार्यवाहीबाबत आमदार कपिल पाटील यांचं शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र.*
➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रति,
मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड,
शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय - राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नावरील कार्यवाहीबाबत.....
महोदया,
सहाव्या वेतन आयोगामध्ये नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर ५२००-२०२०० (ग्रेड पे २८००) वेतनश्रेणी मिळाल्यानंतर चटोपाध्याय समितीने केलेल्या शिफारशीनुसार १२ वर्षानंतर मूळ वेतनात वाढ होऊन ग्रेड पे ४२०० रु. होत असे. अशी वेतनश्रेणी मिळत असून मूळ वेतनात ग्रेड पेमध्ये १४००/- रुपयांची वाढ होते. ही वाढ वार्षिक वेतनवाढीच्या सुमारे साडेतीनपट होती. मात्र १ जानेवारी, २००४ नंतर सेवेत आलेल्या म्हणजेच दिनांक १ जानेवारी, २०१६ नंतर १२ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करताना Pay Matrix ही संकल्पना आणल्यामुळे चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ नष्ट झाला असून या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ मिळत नाही. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी मी विचारलेल्या तारांकीत प्रश्न क्र.६५ ला उत्तर देताना आपणही हा आर्थिक अन्याय होत असलेबाबत मान्य केलेले आहे.
शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ नष्ट झाला आहे. पर्यायाने १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ न मिळता नियुक्तीच्यावेळी जी वेतनश्रेणी मिळाली त्याच वेतनश्रेणीत सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे. याबाबत शासन स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
तरी सदर शिक्षकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी खंड २ ची प्रसिद्धी करताना चटोपाध्याय वेतनश्रेणींची पूर्ववत रचना करून, दोन वेतनवाढीची तूट दूर या शिक्षकांना न्याय दयावा, ही विनंती. धन्यवाद!
आधीच जुन्या पेन्शनला हे शिक्षक मुकले आहेत. तसेच शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ही एकमेव वेतनातील वाढ आहे जी सेवेत एकदाच तीही एकाच पदावर एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे राहिल्यावर मिळते. निवडश्रेणी २४ वर्षानंतर मिळत असली तरी ती लाभार्थ्यांपैकी फक्त २०% शिक्षकांनाच मिळत असल्याने, कित्येक शिक्षक ती घेण्याआधी मयतही झालेले आहेत. तरी सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणी मध्ये बदल करून ती सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळून दोन वेतनवाढीची तूट भरून काढेल अशी रचना करण्यास विनंती आहे.
वास्तव परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल पाटील साहेबांचे आभार. मागणी पूर्ण होइपर्यंत पाठपुरावा करावा ही विनंती.
उत्तर द्याहटवादोन वेतनवाढ ऐवजी किमान तीन वेतनवाढ आवश्यक आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद पाटील साहेब..!
उत्तर द्याहटवामागणी पुर्ण होईपर्यंत पाठपुरावा करावा, ही विनंती.. 🙏🙏
धन्यवाद पाटील साहेब,शिक्षकांच्या प्रश्नाला आपण वाचा फोडली.असे पत्र देऊन पाठपुरावा केल्यास नक्कीच प्रश्न सुटेल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद साहेब
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब. आपण नेहमीच शिक्षकांचे प्रश्न समजून घेता . हा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा व्हावा ही विनंती
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद साहेब आपणच या अन्यायाला वाचा फोडू शकता
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब 👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब!!शिक्षकामागे वस्तुनिष्ठपणे उभे राहून न्याय मिळेपर्यंत यशस्वी पाठलाग करणारे एकमेव शिक्षक आमदार विधिमंडळरत्न ,महाराष्ट्राची बुलंद तोफ,प्रशासनातील शुक्राचार्यांना सळो कि पळो करुन सोडणारे,कणखर नेतृत्व ,आमचे आधारस्तंभ ,सरकार कोणतेही असो शिक्षक आमदार म्हणून विधानभवनात समोरच्याचे डिपाॕजिट जप्त करून निवडून येणारे ,एकमेवाद्वीतीय,शिक्षक मतदारांना हक्काने मत मागू शकणारे, भावी कॕबिनेट(शिक्षण) मंत्री तुमचे शतशः आभार !!
उत्तर द्याहटवाआभार पाटील साहेब.अगदी योग्य मुद्दा उपस्थित केला .खूप खूप धन्यवाद.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद साहेब! जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवा. खूप अन्याय झाला आहे 2004 नंतरच्या कर्मचाऱ्यांवर. 👍👍
उत्तर द्याहटवाखुपच छान सर
उत्तर द्याहटवाGreat work thanks for your efforts
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद.
उत्तर द्याहटवायाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवावा.
शिककेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासीत प्रगतीचा लाभ मिळेल का
उत्तर द्याहटवाधन्यवाद साहेब,प्रश्न निकाली काढण्यासाठी पाठपुरावा कराल अशी अपेक्षा आहे
उत्तर द्याहटवाहा अन्याय पत्रा पुरता मर्यादीत राहू नये इतकीच अपेक्षा
उत्तर द्याहटवाहा प्रश्न सोडवाच साहेब खूप लोकांच्या आशा आहेत आपणाकडून