डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बारावीचा निकाल 10 जून तर दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता

 राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांनी दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी स्वीकारलेच नाहीत. काहींनी तर हे गठ्ठे बोर्डाकडे परत पाठवून दिले. त्यामुळे दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर परिणाम होऊन निकाल वेळेत जाहीर होईल का, असा प्रश्न बोर्डासमोर उभा राहिला होता, मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या अचूक नियोजनामुळे पेपर तपासणीचे काम विनाअडथळा सुरू आहे.

तपासलेल्या उत्तरपत्रिका राज्य शिक्षण मंडळात जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता या उत्तरपत्रिकांच्या पहिल्या पानाचे बारकोडनुसार काऊंटर स्पॅनिंग करून एकूण गुण गोळा करण्यात येत आहे. त्यानंतर निकाल तयार केला जाणार आहे, असेही बोर्डाच्या  वतीने सांगण्यात आले.मुंबई विभागात  उत्तरपत्रिकांची तपासणी स्थिती

मुंबई विभागीय शिक्षण मंडळांतर्गत बारावीच्या एकूण 18 लाख 92 हजार 929 उत्तरपत्रिका तपासणीसाठी आहेत.

 या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी एकूण 1651 मॉडरेट्स असून यापैकी 1157 मॉडरेटर्सनी तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे जमा केल्या आहेत, तर दहावीच्या 33 लाख 20 हजार 207 एकूण उत्तरपत्रिका असून 2605 मॉडरेट्सवर तपासणीची जबाबदारी आहे. त्यापैकी 2067 जणांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका जमा केल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: