डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मंत्रालयीन पाठपुरावा..

 "थकना हमे चलेगा,_
मगर रुकना हमे गवारा नहीं.."


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मंत्रालयीन पाठपुरावा..


कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचा सतत 2 दिवस  ( 31 जुलै व 1 ऑगस्ट 2024) मंत्रालयीन पाठपुरावा सुरू होता, संघटनेची राज्य टीम , राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,राज्य सचिव गोविंद उगले, राज्य कोषाध्यक्ष प्रविण बडे, मिलिंद सोळंखी ,राज्य सोशल मीडिया प्रमुख विनायक चौथे यांनी मंत्रालय येथे विविध प्रश्ना संदर्भात संबधीत सचिव, अधिकारी यांच्या भेटी घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.

या साठी विशेष सहकार्य राज्य कार्यध्यक्ष आशुतोष चौधरी,राज्य सल्लागार सुनील दुधे व राज्य सहसचिव अरविंद पुलगुर्ले यांचे सहकार्य लाभले.


■ *नगर विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या राज्यातील नगरपरिषद, नगरपालिका,महानगरपालिका इत्यादी मधील 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त NPS/DCPS योजनेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना31 मार्च 2023 वित्त विभाग शासन निर्णयानुसार सेवेत मृत्यु किंवा रुग्णता मुळे सेवासमाप्ती प्रसंगी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत फॅमिली पेन्शन रुग्णाता निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान व सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा उत्पादनाचा लाभ लागू करणेबाबत.*


- या संदर्भात अपर सचिव उगले साहेब यांची भेट घेतली व त्यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ यावर कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधितास आदेशीत केले.



*■ 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात / अधिसूचना प्रकरणी शासन सेवेत दि. 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीत विद्यापीठे, व तत्सम अनुदानित संस्थेमधील कर्मचाऱ्यांना  वित्त विभागाचा दि 2 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू करणे बाबत.*


-काल आणि आज ग्रामविकास विभागात आणि वित्त विभागात इतर निमशासकीय कर्मचाऱ्यांना सदर वित्त विभागाच्या शासन निर्णाया नुसार शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी पाठपुरावा व भेटी घेण्यात आल्या.. 

*ग्रामविकास चा शासन निर्णय अंतिम टप्प्यात आहे,* संघटनेच्या निवेदनानंतर ग्रामविकास ने कालच याबाबत ची आकडेवारी सर्व जिल्हा परिषदांकडून मागवली आहे..

 त्यानंतर लवकरच *ग्रामविकास चा शासन निर्णय निघेल.. आणि तिथून पुढील 6 महिने one time पर्याय देण्यासाठी कालावधी संबंधित पात्रता धारक कर्मचाऱ्यांना मिळतील* असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..

2 ऑगस्ट ही तारीख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अंतिम तारीख आहे.. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी याबाबत चिंता करण्याचे कारण नाही, जे पात्र आहेत त्यांना नंतर आपापल्या विभागाचा शासन निर्णय आल्यावर पुरेसा वेळ ( 6 महिने ) मिळेल. 


*◆सन 2006, 2007, 2008-09 च्या बॅच मधील शिक्षणसेवकांना (आत्ताचे नियमित शिक्षक) 2 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार लाभ लागू आहे किंवा कसे.?* याबाबत राज्यभर जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्याबाबत संघटनेद्वारे *ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांना निवेदन देऊन यावर मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करण्यात आली , व जे शिक्षक / कर्मचारी पात्र असतील , त्यांना वरील शासन निर्णयानुसार लाभ देण्यात यावा ही विनंती देखील करण्यात आली..*


*त्यावर ग्रामविकास विभागा कडून लवकरच वित्त विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात येणार आहे, कारण सर्व मूळ विषय वित्त विभागाशी असल्याचे संबंधित कक्ष अधिकारी यांनी सांगितले ..*


*■ शिक्षकांच्या नवीन संचमान्यता धोरण रद्द करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे व शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी लागू करणे, शिक्षकांना सुधारित वेतन लाभाची 10,20,30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे,प्रलंबित केंद्रप्रमुख भरती परीक्षा लवकर आयोजित करणे, वैद्यकीय बिले,  शिक्षकांचे कोविड 19 चे प्रलंबित प्रस्ताव ,अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील नैसर्गिक अनुदान वेतन वाढ करणे बाबत* इत्यादि विषयांवर शिक्षणमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते मुंबई बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, मात्र त्यांचे स्वीय सचिव शिंदे यांची भेट घेऊन सदर निवेदन त्यांच्या कार्यालयात नोंदणी शाखेत जमा करण्यात आले, लवकरच शिक्षणमंत्री महोदयांची भेट घेऊन पुन्हा याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.. 


*मयत कोविड योद्धा शिक्षक कै.अनिल लिलाधर नेहते याच्या प्रस्ताव बाबत स्मरणपत्र*



-संबंधित शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांची भेट घेऊन कोविड मध्ये झालेले मयत  शिक्षक कै. अनिल नेहते सर, रावेर (जि.जळगाव) यांच्या प्रस्तावा बाबत पाठपुरावा करण्यात आला, संबंधित टेबल वर गेल्या 4 महिन्यापासून फाईल धूळ खात पडून असल्याचे आज निदर्शनास आले, त्यामुळे संबंधित विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना कडक शब्दात समज देण्यात आली व 15 दिवसात प्रस्ताव मंजूर केला नाही तर कुटुंबा सोबत संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसतील असा इशाराच देण्यात आला.. आणि याबाबत शालेय शिक्षण च्या प्रधान सचिवांच्या नावे ही एक स्मरणपत्र देण्यात आले..


*◆वित्त विभागातील भेटी-*


*- वित्त विभागाचा 2 फेब्रुवारी चा जाहिरात नुसार जुनी पेन्शन चा शासन निर्णय इतर विभागात लागू व्हावा* यासाठी इतर विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली त्यावर ग्रामविकास व इतर डिपार्टमेंट चे शासन निर्णय निघण्यासाठी वित्त विभाग आवश्यक ते कार्यवाही लवकर करणार आहे..


*- मयत राज्य कर्मचारी कुटुंबास उच्च दराने अर्थात 50% फॅमिली पेन्शन मिळण्यासाठी सलग 7 वर्ष सेवेची जी अट आहे, ती अट केंद्राच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर वगळण्यात यावी,*  या अटीमुळे आजरोजी कमी सेवा असलेल्या मयत DCPS/NPS धारक कर्मचारी कुटूंबास केवळ 30% च फॅमिली पेन्शन मिळत आहे, जी ही अट रद्द केल्यावर फॅमिली पेन्शन 50% होईल..  त्यावर वित्त उपसचिव मॅडम यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले.. 


*- ग्रॅच्युटी (उपदान) रकमेची कमाल मर्यादा केंद्रा प्रमाणे 25 लाख रु करण्यात यावी*, याबाबत 20 लाख रु ची फाईल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले मात्र आता पुन्हा 25 लाख नुसार फाईल सादर करण्याचे त्यांनी आश्वस्त केले.. 


*- सन 2021 नंतर च्या DCPS रकमेवर ती रक्कम NPS मध्ये वर्ग होईल पर्यंत चे व्याज मिळावे* ही मागणी संघटनेने लावून धरली , कारण DCPS योजनेत जमा रकमेवर 2021 नंतर व्याज आकारणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे शिक्षकांचे व्याजाचे लाखों रुपये नुकसान झाले असल्याचे संबंधित उपसचिव मॅडम याच्या लक्षात आणून दिले, त्यावर यात जिल्हा प्रशासनाची चूक असल्याचे त्यांनी सांगितले, तरीपण माहिती मागवून व्याज आकारणी बाबत कार्यवाही करू असे आश्वासन देण्यात आले..


*◆HRA दरात वाढ-*

सदर विषयी पाठपुरावा केला असता संघटनेने यापूर्वी दिलेले निवेदन आपल्यापर्यंत आल्याचे संबंधित वित्त च्या व्यय डिपार्टमेंट च्या अवर सचिव मॅडम यांनी सांगितले, पण केंद्राच्या वित्त विभागाचे स्पष्ट लाभ दिल्याचे पुरावे मिळेपर्यंत हा विषय सध्या पुढे नेता येत नसल्याचे त्यांनी सांगितले, वास्तविक या विषयावर संघटनेने केंद्राच्या विविध विभागाचे HRA दर वाढीचे पुरावे दिलेले आहे, पण ते पुरेसे नसल्याचे संबंधित मंत्रालय वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे, त्यावर संघटनेद्वारे आता केंद्रीय मंत्रालयाकडे माहिती मागवली आहे, ती मिळाल्यावर राज्य वित्त विभागास ती पुरवण्यात येईल.. 


*आदिवासी विकास विभाग-*


आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी निर्णय निर्गमित व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले..


◆ मुख्यमंत्री महोदयांनी निर्देशित केल्याप्रमाणे त्यांच्या प्रधान सचिवांसोबत ( मुख्यमंत्री कार्यालय)  जुन्या पेन्शन संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी बैठकीसाठी ही निवेदन देण्यात आले..  

राज्य कार्यकारणी सोबत संघटनेचे मुंबई चे नवनियुक्त महानगर अध्यक्ष श्री भाऊसाहेब घाडगे हे देखील उपस्थित होते..


मित्रांनो अश्या प्रकारे गेले 2 दिवस सतत कर्मचाऱ्यांच्या वरील विविध विषयांवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारे मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आला.. 


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सतत कर्मचाऱ्यांच्या सेवेत कार्यतत्पर होती , आहे व राहील.. धन्यवाद!


       गोविंद उगले,राज्य सचिव 

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯