मुरूमखेडावाडी शाळेत हरित शाळा अभियानांतर्गत मियावाकी घनवन प्रकल्प .... 1 वर्ष पूर्ण...
*लागवड दिनांक:- *29/08/2020*
*स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी, तालुका:-औरंगाबाद,जिल्हा:-औरंगाबाद येथे हरित शाळा अभियान प्रकल्पा अंतर्गत "डेन्स फॉरेस्ट" प्रकल्पाचे उद्घाटन श्रीमती चव्हाण मॅडम यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले होते, 29 आॕगस्ट 2021 ला पहिला वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी वृक्षांचे औक्षण करण्यात आले व केक ही कापण्यात आला.
*जिल्हा परिषद औरंगाबाद, इकोसत्व एनवोरमेंटल सोल्युशन्स औरंगाबाद, वन विभाग औरंगाबाद , ग्राइंड मास्टर औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम जिल्ह्यातील 103 जिल्हा परिषद शाळांत राबविण्यात आला आहे.
*त्या अंतर्गत २००० चौरस फुट जागेत स्थानिक देशी प्रजातींची जास्तीत जास्त अॉक्सिजन देणारी,औषधी तसेच फळे देणारी 605 झाडे लावण्यात आली.* यामध्ये बेल, कडुलिंब,शिरस, मोहावा, आवळा, कदंब,कळंब, शतावरी, शिसम, पिंपळ,आंबा, बेहडा,अर्जुन, बिबा,जांभुळ, हिरडा, खैर, आपटा,पळस, कांचन, तुळस, सिताफळ, उंबर या जातीची झाडे आहेत.या झाडांमुळे अवघ्या तीन वर्षात घन वन तयार होणार आहे.ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण,औषधी वनस्पतींची माहिती ,झाडांच्या प्रजाती यांची माहिती प्रत्यक्ष शाळेतच मिळणार आहे.त्याचबरोबर फुलपाखरे,पक्षी यांना आधिवास तयार होणार आहे.
उदघाटन गटशिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण मॕडम यांच्या हस्ते झालेले आहे , श्री नामदेव वाघसर हे प्रमुख पाहूणे होते.
इकोसत्व ईनवोरमेंटल सोल्युशन्स चे सिद्धार्थ इंगळेसर, यांचे विशेष सोजन्य लाभले. तर आकाश पोतेवार आणि शेख समीर यांनी मियावाकी घनवन वृक्षारोपणा विषयी मार्गदर्शन केलेले आहे .
प्रकाशसिंग राजपूत ,श्री आढेसर , श्री जाधवसर , व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विजयसिंग बालोद, गंगुबाई विष्णू बचाटे, रामकोर बालोद, अरुणाबाई ,काशीनाथ बचाटे, चरणसिंग, परमेश्वर बालोद, अर्जून , जयसिंग महेर
मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....
व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....
Best wishes for bright future
उत्तर द्याहटवा