डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

स्पोकन इंग्लिश शाळेबद्दल बोलणे.... Talk about school

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥


भाषांतरातून इंग्रजी  संभाषण शिका.....
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे..... श्री नितिन गबालेसर इंग्लिश टिचर यांची निर्मिती असलेला  नाविण्यपुर्ण उपक्रम ....


       संकलन व प्रकाशन

        प्रकाशसिंग राजपूत 

       (समूहनिर्माता) 

(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र  )

दिवस ३ रा



शाळेबद्दल व अभ्यासाबद्दल बोलणे 
(Speaking about school and study)


शाळा ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची असते.
School is very important in our life.


मी दररोज शाळेत जातो.
I go to school every day.

मी शाळेत शिकतो, खेळतो आणि तेथे मज्जा करतो
I learn play at school and I have fun there. 

मी माझ्या मित्रांसोबत मैदानावर कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन खेळतो.
I play Kabaddi, Kho-kho, Cricket and Badminton with my friends on the ground.


माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा गारखेडा नं. एक आहे.
My school name is zilla parishad central upper primary school Garkheda no.1


मला माझी शाळा खूप आवडते कारण तेथे मला आनंद मिळतो.

 I love my school very much because I get joy there.



माझ्या शाळेत एकुण सात वर्ग आहेत.
There are seven classes in my school.


माझ्या शाळेत पहिलीपासून सातवीपर्यंत वर्ग आहेत.
There are seven classes from class one to Seven in my school. 


माझ्या शाळेत सात शिक्षक व दोनशे विद्यार्थी आहेत.
There are seven teachers and two hundred students in my school.


श्री. किरण पाटील माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
Mr. Kiran Patil sir is the headmaster of our school 


माझे सर्व शिक्षक खूप हुशार आहेत ते आम्हाला खुप छान शिकवता 
My all teachers are very clever. They teach us very nicely.


आमचे शिक्षक खुप दयाळू आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. 
Our teachers are very kind. They are our good friends. 


श्री. सचिन पाटील हे आमचे वर्गशिक्षक असुन ते आम्हाला इंग्रजी व मराठी खूप छान शिकवतात.
Mr. Sachin Patil sir is our class teacher. He teaches us English, and Marathi very nicely.


आम्ही सर्व मुलं व शिक्षक आमच्या शाळेची काळजी घेतो.
We all children and teachers take care of our school.



खेळाचे साहित्य संगणक आणि मोठे मैदान.
माझ्या शाळेत अनेक सुविधा आहेत. जशा की ग्रंथालय प्रयोगशाळा कक्ष बाग 
There are many facilities in my school; such as: library, laboratory, garden, playing aids, computer lab and big ground.


आम्ही दर शनिवारी ग्रंथालयात जातो आणि गोष्टींची पुस्तक वाचतो. 
We do experiments on every Friday in laboratory. 

आम्ही मैदानावर अनेक खेळ खेळतो जसे की क्रिकेट, फुटबॉल बॅडमिंटन, इत्यादी.
We play many games on ground such as: cricket,football, badminton etc. 


आमच्या शाळेच्या बागेत आम्ही दुपारचं जेवण एकत्र करतो.
We have our lunch together in our school garden.


आम्ही आमची बाग स्वच्छ ठेवतो. झाडांना पाणी देतो We clean our garden. We water the trees.

आम्ही संगणक कक्षात दर बुधवारी संगणक शिकतो.
We learn computer on every Wednesday in our computer lab.


आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषेत घेतो. 
We conduct our assembly in Marathi, English and Hindi.



आमच्या शाळेत अनेक उपक्रम घेतले जातात जसे की कथा सांगणे, कविता गायन, स्पोकन इंग्लिश, गणित उपक्रम, पेपर वाचन, सामान्य ज्ञान स्पर्धा, आनंदनगरी विज्ञान प्रदर्शन, सहल, क्षेत्रभेट व सांस्कृतिक कार्यक्रम. There are many activities conducted at our school; such as telling stories singing poems, spoken English, Maths activities, reading newspaper, quiz, Anand nagari, science exhibition, spot visit and gathering.


माझी शाळा माझे मंदिर आहे.
My school is my temple.


जरी माझी शाळा खेड्यात असली तरी तेथे खूप उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते.

Tough my school is in village; but there is high quality education is given in my school. 

मी माझी शाळा कधीच विसरू शकत नाही कारण ती माझं जीवन आहे. 
I can never forget my school because it is my life. 

आपण दररोज शाळेत जायला हवं. दररोज अभ्यास व गृहपाठ पूर्ण केला पाहिजे. शाळा बूडवायला नाही पाहिजे.
We should go to school every day. We should study and complete our homework every day. We should not bunk or miss our school.



आपली शाळा स्वच्छ ठेवणे व शिक्षकांचा आदर करणं हे आपल कर्तव्य आहे.
It is our duty to keep our school clean and respect our teachers. 


आपण आपल्या मित्रांना अभ्यासात व त्यांच्या अडचणीत मदत केली पाहिजे.
We should help our friends in their studies and problems. 

माझी शाळा ही माझ्यासाठी खूप आनंददायक जागा आहे
My school is my delightful place for me.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: