आरबीआयने आपल्या पतधोरणाची घोषणा केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक सोमवारपासून सुरू होती.
त्यानंतर आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत देसाई यांनी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. त्यांनी म्हटले की, आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत.
सध्या देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. जगातील भूराजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आव्हाने निर्माण झाले असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले.
रिझर्व्ह बँकेने आपल्या मागील तीन पतधोरण बैठकीत रेपो दरात एकूण 1.90 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. जून आणि ऑगस्टमध्ये 50-50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या या बैठकीआधी रेपो रेट 5.90 टक्के इतका होता. आज 0.35 टक्क्यांच्या दरवाढीनंतर रेपो दर 6.25 टक्क्यांवर गेला आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.