🌷 *मुरूमखेडावाडी शाळेला विप्रो केअर बॕगलरु टिमची विशेष भेट*🌷💐
*छ. संभाजीनगर तालुक्यात दुर्गम क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणारी शाळा व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त मुरूमखेडावाडी शाळेला बॕगलरू(बंगलोर) टीमने शाळेस भेट दिली या टीमच्या मुख्य HR मॕनेजर तसेच प्रोजेक्ट लिडर सोबत होत्या.*
*मुरूमखेडावाडी शाळेतील विद्यार्थींनींचे इंग्रजी वाचन करतांना त्यांनी ही इंग्रजी माध्यम शाळा आहे का? विचारणा केली तर १ ली २ री च्या विद्यार्थ्यांचे अक्षर व प्रगती पाहून त्या त्यांच्याजवळ जाऊन बसल्या .*
*शाळेच्या सुंदर वातावरणातील बाग व घनवन हे सामर्थ्य क्षेत्र पाहून शाळा खूपच आनंददायी वातावरण देणारी आहे ही प्रशंसा ही त्यांनी केली.*
*येणाऱ्या काळात एका विशेष प्रोजेक्ट साठी मुरूमखेडावाडी ही शाळा आम्ही निश्चित करत आहोत. याबाबतीत बंगलरू येथे बैठक घेऊन आपणांस कळवू असेही टीमने म्हटले.*
*प्रकाशसिंग राजपूत व दिलीप आढे*
*सहशिक्षक*
जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, केंद्र करमाड , ता/ जि. छ. संभाजीनगर
Great sir...
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा