डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक दिनी शिक्षक विरोधात प्रशांत बंब याचा मोर्चा

 शिक्षकदिनी शिक्षक  मुख्यालय प्रश्न संदर्भात ५ सप्टेंबरला नागरिक व कार्यकर्त्यांसह आमदार प्रशांत बंब जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहेत. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद 'सीईओ'ना स्मरणपत्र दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांचा मुख्यालयी राहण्याचा प्रश्न पेटणार असल्याचे दिसत आहे.

 जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता घरभाडे भत्ता उचलतात, असे आरोप अनेकदा होतात.  मात्र शासन कर्मचारींना सरकारी निवासस्थान उपलब्ध नसल्याने घरभाडे भत्ता स्वरूपात दिल्या जातो. मात्र याच मुद्याचा राजकीय मुद्दा बनवून  आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. एवढेच नाही, तर मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीसुद्धा केली. 

बंब यांच्या मागणीनंतर जि.प.कडून  या नियमाचे पालन होत नसल्याचा आरोप आमदार बंब यांनी केला. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयावर पाच सप्टेंबरला लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आमदार बंब यांनी 'सीईओ' यांना पत्र दिले आहे.

#chandryan3live, #isromoonmission,

2 Comments:

Vitthal Bhagwanrao Solanke,Asst. Teacher,Vidya sagar Vidyalaya,Khanapur(Chitra),Tq.Dist.Hingoli म्हणाले...

बातमी वाचून गप्प बसणाऱ्या सर्व शिक्षकांचा हार्दिक अभिनंदन! मनगट धरणारे हात धरतात आणि शेवटी गळा पकडतात असा अनेक वेळेस सिद्ध झालेला आहे त्यामुळे निषेधार्थ शिक्षकांनी सुद्धा पाच सप्टेंबरला काळ्याफिती लावून आमदार प्रशांत बंब आणि त्यांचे शासनाचा देखील यांचा निषेध करावा.

Adhikrao म्हणाले...

बंब यांचा बोलविता धनी कोण????