दिवाळी साजरी व्हावी संवेदनशीलतेने....
जवळजवळ २ वर्षे जगभरात थैमान करणारा करोना कित्येक घरात दुःखाचा डोंगर व आसवांचा तलाव करुन गेलाय....😢
मानवी जीवनावर विपरीत परिणाम करुन टाकणारा हा आजार दिवाळीच्या आनंदापेक्षा एक महत्त्वाचा दुवा पहाण्यास मजबूर करतो. तो म्हणजे आपल्या जवळपास जर या दरम्यान कोणी करोनामुळे दुःखद निधन झालेले असेल तर आपली दिवाळी नक्कीच साधेपणाने साजरी व्हावी हीच खरी संवेदनशीलता त्यांच्या दुःखास थोडेसे हलके करेल व मानवतेला ही नवी बाजु मिळेल.....
कुणाचा वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी या नात्यातले दगावले असेल तर ते दुःख आभाळापेक्षा खूपच मोठे आहे......
मानवतेच्या साखळीने पेटवू संवेदनशीलतेचा दीप........
प्रकाशसिंग राजपूत
औरंगाबाद
यावर लिहिलेले एक गीत..... देवाला ही साद घालते.....
अरे.... देवा.....
गायन - श्रीमती सुप्रिया झिंजुर्डे
गीतलेखन - प्रकाशसिंग राजपूत
9960878457
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.