भुरळ फक्तच सगळी
भरपूर गाणी ऐकण्यासाठी गीत अलंकार या वाहिनीला आपले करा..... सबस्क्राईब करा....
😇भुरळ फक्तच सगळी ......😊
आले कसे दिवस हे न्यारे,
न मिळे भाग्य अशाप्रकारे
तोडून आता अकलेचे तारे ,
पेटवू पहात हे रान सारे.....
फक्तच राहिली चिंता,
न उजळे नशिब हीनता,
वाढेल ताटावर खाऊन ,
भुक न मिटे पोटजरी भरता,
मनात लागेल काजळी,
ओळख स्वतःची आगळी,
गाडा चालण्या चाक उलटा,
फिरुन भुरळ फक्तच सगळी,
हुशारी सारी स्वार्थ साधे,
साधू रुपात डाकू साजे,
सोंग घेत हळू विंचवाचा दंश ,
पुसणार काय कुणा कितीही माजे...😊
✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️
औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.