डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हा व तालुका मुख्यालय येथे येण्यास निर्बंध


 जिल्हा किंवा तालुका मुख्यालयामध्ये फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलाय.अनेक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामूळे विविध देयके, जी.पी.एफ प्रकरणे हस्तक्षेप न होता नियमाने निघणार आहे.


 या संदर्भात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी याबाबत पत्र काढलेले आहे.

  जिल्हा मुख्यालयातील दैनंदिन कामकाजासाठी एका कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी असे या पत्रामध्ये म्हटलेले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं असेल तर मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्वपरवानगी घ्यावी आणि जिल्हा परिषदेच्या किंवा तालुक्याच्या मुख्यालयात 

आल्यानंतर परवानगीच पत्र दाखवून विजिट बुकला नोंद करावी लागणार आहे.



अनेक  मंडळी ही फाईल काढण्याची  कामे करण्याची जबाबदारी स्वीकारत ते विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून बऱ्याच वेळेला पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेला फेऱ्या मारत असतात .

बऱ्याच वेळेला स्वतःची काम करून घेत असतात आणि त्यामुळे हे असे निर्बंध शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्यालय किंवा पंचायत समिती मुख्यालयात विनापरवानगी फिरू नये अशा स्वरूपाचे पत्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी एक ऑगस्ट रोजी निर्गमित केलं. 

अनेक शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामूळे विविध देयके, जी.पी.एफ प्रकरणे हस्तक्षेप न होता नियमाने निघणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: