पुणे जिल्हा परिषदेकडून गेल्या दीड वर्षांपासून वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला लक्ष्य केल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा राग व्यक्त करीत ग्रामस्थांनी थेट शाळेपुढेच 'पुणे झेड पी गो बॅक' असे लिहिलेला भला मोठा फलक लावून शाळेवरील हक्क सोडून देण्यासाठीची मागणी केली आहे.
'आम्ही आमच्या पद्धतीने आमची मुले शिकवू. आमचा तुम्हाला कोपरापासून नमस्कार!' असा आशय असलेला हा फलक नेमका शाळाप्रवेशद्वाराजवळच लावला आहे.
५ वी व ८ वी शिष्यवृत्ती वेळापत्रक
शाळेची चौकशी करण्याचा अर्ज चौकशी सुरू केल्यानंतर मागावून घेतलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळा बदनामीच्या षडयंत्रानंतर
शाळेला गेल्या दीड वर्षात नियमित मुख्याध्यापकही देता आला नाही. ग्रामस्थांवरच संशय उपस्थित केला गेल्याने शाळेतील अभ्यासक्रमासोबत सुरू केलेले १० उपक्रम पूर्ण बंद झालेत. त्याचाच परिणाम शाळेतील २२० विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. गेल्या नऊ वर्षात ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून कोट्यवधी रुपयांची
कामे केली असताना जिल्हा परिषदेने फक्त शौचालयापलिकडे काहीच योगदान नाही. त्याचाच राग व चिड ग्रामस्थांमध्ये धगधगत असून, त्याचा परिणाम म्हणून सोबतचा फलक ग्रामस्थ व पालकांनी लावल्याची प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सुरेखा वाबळे, सतीश कोठावळे यांनी दिली.
2 Comments:
शासन शिक्षकांना ही व्यवस्थित शिकवू देत नाही, कायम उपक्रमाच्या ओझ्याखाली घालुन कळचेप करतोय, जो अधिकारी आला उठसुट काही तरी उपक्रम राबवण्यास सांगतात
देशाचे पूर्ण वाटोळे करायचे ठरवलेले आहे शासन व्यवस्थांनी याच्यात कोणाच्याही दुमत नाही
टिप्पणी पोस्ट करा