डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हातंर्गत बदली बाबत महत्त्वाचे

 

✳️  *जिल्हा अंतर्गत बदली अपडेट,सर्व संवर्गाच्या याद्या प्रसिद्ध*

(मार्गदर्शक पोष्ट आहे...!)

(बंधू -भगिनी यांना मदत व्हावी या हेतूने..)

✳️ *जिल्हा अंतर्गत बदली 2022 प्रक्रियेचे वेळापत्रक गेल्या काही दिवसात तीन वेळा बदललेले आहे आताच नुकते संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना सहमती अर्ज भरून झालेले आहेत*




✳️ *सदर बदली पोर्टल हे बदली आदेश 7 एप्रिल 2021 तथा त्या अनुषंगाने निर्गमित केलेली विविध परिपत्रके यांच्या माध्यमातून अपडेट केले असले तरीही बऱ्याच मुद्द्यांवर विसंगती आढळते परंतु आज आपणास बदली पोर्टलच्या अनुषंगाने बदली प्रक्रिया कोणत्या मुद्याचे आधारे राबवली जाईल त्यातील महत्त्वाचे मुद्द्यांचे विश्लेषण खाली दिलेले आहे*


✳️ *सर्व संवर्गातील शिक्षकांना महत्त्वाचे*


➡️ *दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ला संवर्ग एक व संवर्ग दोन यांच्या याद्या आज पुन्हा प्रकाशित झाल्यात. तसेच बदली अधिकार पात्र शिक्षक व बदली पात्र शिक्षकांच्या पुन्हा याद्या आज जाहीर होणार आहेत या याद्यातील बदली पात्र शिक्षकांच्या याद्यांचा संवर्ग एक च्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत भाग घेताना महत्त्वाच्या ठरतील*


➡️ *दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ते 3 डिसेंबर 2022* 

*दरम्यान यापूर्वी संवर्ग एक व  संवर्ग दोनच्या शिक्षकांनी अर्ज भरल्यानंतर संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना कोणतेही प्रकारचा आक्षेप असल्यास पोर्टलवर आपला आक्षेप नोंदवून शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करू शकतात*


*ऑनलाइन पोर्टलवर अपील कसे नोंदवावे यासंदर्भातील व्हिडिओ पाहू शकता*


➡️ *दिनांक 5 डिसेंबर 2022 ते दिनांक 10 डिसेंबर 2022*  

*दरम्यान शिक्षकांकडून आलेले अपील शिक्षणाधिकारी  स्विकारतील किंवा नाकारतील*


➡️ *11 डिसेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022* 

*दरम्यान आपण केलेले अपिला संदर्भात आपले समाधान नसल्यास आपण वरील तारखांमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुन्हा अपील करू शकता*


➡️ *14 डिसेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022*

*दरम्यान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे शिक्षकांकडून आलेल्या अपील संदर्भात निर्णय घेतील*


➡️ *19 डिसेंबर 2022 ला पुन्हा संवर्ग एक, संवर्ग दोन, बदली अधिकार पात्र शिक्षक व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील*


➡️ *20 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022*

*दरम्यान संवर्ग एक च्या शिक्षकांना पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल*


➡️ *एखाद्या शिक्षकाचे निलंबन झालेले असेल तर त्याचा निलंबनाचा कालावधी संवर्ग निहाय निश्चित केलेल्या कालावधीतून वगळला जाणार नाही कारण अशा शिक्षकांचे मुख्यालय हे त्यांचे नियुक्तीचे ठिकाणच असते* 

 

➡️ *ज्या शिक्षकांना कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्षे पूर्ण झालेले नसतील तर अशा शिक्षकांचा या बदली प्रक्रियेमध्ये  समावेश होणार नाही*


➡️ *परंतु संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष पूर्ण  झाल्यास विनंती बदली मागू शकतो*


✳️ *समानीकरण महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *समानीकरणांतर्गत ठेवावयाच्या जागांच्या संदर्भात ज्या शाळेवर समानीकरणातंर्गत ठेवलेली जागा असेल व त्या शाळेवर कोणतेही संवर्गातील बदली करणारा शिक्षक नसेल तर त्या शाळेवरून कोणाचीही बदली होणार नाही*


➡️ *समानीकरणाअंतर्गत एखाद्या शाळेवर एक पद रिक्त ठेवायचे आहे व त्या शाळेवरून एक शिक्षक बदली पात्र असेल तर त्या शिक्षकाची बदली करण्यात येईल त्याचे बदलीने रिक्त होणाऱ्या जागेवर कोणताही शिक्षक बदलीने दिला जाणार नाही* 


➡️ *व तसेच समानीकरणाअंतर्गत एखाद्या शाळेवर एक रिक्त पद ठेवायचे असेल व त्या शाळेवर संवर्ग एकचा शिक्षक असेल व त्यांनी आपला नकार नोंदवलेला असेल तर त्याची बदली होणार नाहीं*


➡️ *परंतु जर त्या शिक्षकाने होकार नोंदवलेला असेल तर त्यांची बदली होईल व त्या जागेवर कोणीही बदलीने पदस्थापित केले जाणार नाही*


✳️ *विशेष संवर्ग भाग 1 महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांच्या व्याख्येतील क्रमवारीमधील प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात येतील*


➡️ *संवर्ग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली मागता येईल*


➡️ *संवर्ग एक च्या शिक्षकांना जर त्यांना शाळेवर तीन वर्ष झालेले असतील व त्यांना बदली नको असेल तर नकाराचा फॉर्म भरणे आवश्यक होते  नको म्हटल्यामुळे बदलीच्या प्रक्रियेत गणले जाणार नाही.  बदली नको असेल तर बदली नको असल्याची नोंद करावी असे सांगण्यात आले होते. जर अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या तर शासन निर्णयातील दहा वर्ष सर्वसाधारण क्षेत्रात सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना शाळेतील सेवेची अट गृहीत न धरता अवघड क्षेत्रातील शाळांचे पदे भरावी लागणार या  बदली प्रक्रियेत येऊ नये यासाठी बदली नकार दिला तर ते अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या बदली प्रक्रियेतही येणार नाहीत असे सांगण्यात आले.*


➡️ *अर्थातच संवर्ग एक च्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष झालेले असतील व त्यांनी बदली पोर्टलवर नकार नोंदवलेला असेल तर ते शिक्षक पुढील कोणत्याही बदली प्रक्रियेत येणार नाहीत*  


➡️ *परंतु अद्यापही बऱ्याच वरील प्रकारात येणारे शिक्षक नकार द्यायचे वंचित राहिलेले आहेत त्यामुळे पुढील प्रक्रिया राबवितांना शक्यतो त्यांना संवर्ग 1 चे पुरावे मागून त्यांचे नाव यादीतून कमी केले जाऊ शकते*


➡️ *संवर्ग एक मधील शिक्षकांनी जर ते बदली पात्र असतील व त्यांनी आपल्या अर्जामध्ये नकार नोंदवलेला असेल तर त्यांची बदली होणार नाही*


➡️ *परंतु विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी  क्षेत्रनिहाय सलग सेवा दहा वर्ष केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना बदली मिळेल व त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल परंतु त्यांची आहेत त्या शाळेवरून बदली होईल हे निश्चित*


➡️ *परंतु संवर्ग एक मधील शिक्षक ज्या शिक्षकांना जिल्ह्यामध्ये क्षेत्रनिहाय दहा वर्षे सलग सेवा  झालेली नाही अशा शिक्षकांनी संवर्ग एक मधून बदली मागितली असेल तर अशा शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमाने बदली मिळेल परंतु त्यांच्या पसंती क्रमाने त्यांना शाळा न मिळाल्यास त्यांची बदली होणार नाही ते आहेत त्याच शाळेवर राहतील*


✳️ *विशेष संवर्ग भाग दोन महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या  व्याख्येतील क्रमवारी मधील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येतील*


➡️ *ज्या शिक्षकांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांचा समावेश विशेष संवर्ग भाग दोन मध्ये होतो अशा शिक्षकांपैकी जर एक शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असेल व त्या शिक्षकांनी संवर्ग एक मधून अर्ज करून बदली मिळाली असेल तर अशा शिक्षकांचा जोडीदार संवर्ग दोन मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऊ शकतात कारण संवर्ग एकच्या शिक्षकांनी घेतलेल्या बदलीमध्ये सदृश्यता नसल्यामुळे व अद्याप आदेश प्रकाशित न झाल्यामुळे बदलीचा लाभ घेऊ शकता*


➡️ *परंतु अशा स्थितीमध्ये संवर्ग एक शिक्षकाची बदली रद्द होऊन जोडीदाराला लाभ देण्यात येईल*


➡️ *तसेच दोघेही पती-पत्नी बदली प्रक्रियेमध्ये येत असतील व त्यापैकी एका शिक्षकांनी संवर्ग एकचा लाभ घेतलेला असेल व दुसरा जोडीदार हा बदलीस पात्र असेल तर त्यांना एक युनिटचा लाभ दिला जाणार नाही*


➡️ *ज्या दोन शिक्षकांच्या शाळेमधील अंतर हे 30 किलोमीटरच्या बाहेर असेल व त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व  कदाचित त्या शिक्षकाला  पती-पत्नी अंतर्गत  बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली  टप्प्यामध्ये बदली होईल*


➡️ *विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना एक वेळा संवर्ग भाग दोन नुसार बदली झाली असल्यास त्यांना पुढील तीन वर्षे विनंतीने बदली मागता येणार नाही परंतु प्रशासकीय कारणास्तव आपली बदली होऊ शकते जसे दोघांपैकी एक शिक्षक जर बदली पात्र झाला असेल तर दोघांचीही एक युनिट म्हणून बदली होऊ शकते*


✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या अवघड क्षेत्रातील सेवाजेष्ठतेने  करण्यात येतील* *GR परिच्छेद 4.4.3 नुसार*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकाला जर कार्यरत शाळेवर सलग पाच वर्ष पूर्ण झालेत व त्याच अवघड क्षेत्रामध्ये दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झाली असेल व त्या शिक्षकांनी जर पोर्टलवर बदली अर्ज भरलेला नसेल तर अशा शिक्षकांना रँडम राऊंडमध्ये बदली केली जाईल*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात एका किंवा एकापेक्षा जास्त शाळेवर सलग तीन वर्ष सेवा केलेले शिक्षक अशा शिक्षकांनी बदली प्रक्रियेमध्ये आपला बदलीचा फॉर्म भरलेला नाही व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये सुद्धा नाही तर त्यांची बदली होणार नाही*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षक जर बदली पात्र शिक्षक असेल तर त्यांची बदली निश्चित होईल*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकाचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा शिक्षकांना बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली न मिळाल्यास ते बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली मागू शकतात*


✳️ *बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे*


➡️ *बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील*


➡️ *ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षाकांमध्ये करण्यात येतो*


➡️ *पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात इतर  कोणतेही सवर्गातील बदली टप्प्यांमध्ये घेऊ शकणार नाहीत*


➡️ *पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर  त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना 30 किलो मीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही*


➡️ *बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही*


➡️ *या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत  अशा शिक्षकांनी बदली घेताना आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना  निर्णय घ्यावा*


➡️ *बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरते वेळी त्यांच्या अर्जामध्ये अ व आ असे दोन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अ हा पर्याय बदली पात्र शिक्षकांनी निवडल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमांकाप्रमाणे बदली मिळेलच हे सांगता येणार नाही कारण हा पर्याय प्रशासकीय बदली संदर्भात येत असल्यामुळे शक्यतो राउंड मध्ये त्यांची शाळा कुणी न घेतल्यास त्यांची बदली होणार नाही परंतु कोणी त्यांची जागा घेतल्यास त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे बदली मिळेलच असे सांगता येणार नाही व सद्यस्थितीमध्ये बदली पात्र शिक्षकांची जागा कोणी घेणार नाही असेही होऊ शकणार नाही त्यामुळे बदली मात्र शिक्षकांनी आ हा पर्याय निवडणे सोयीचे होईल कारण त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणेच शाळा मिळतील*


➡️ *सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही!!

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻