सोलापूर मधील कोंडी येथील शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग वाढवण्यासाठी हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सुनावली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. लोहार यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे.
कोल्हापूर शिक्षक वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानाची तपासणी झालेली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये ती केली जाणार आहे.