डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वरिष्ठ वेतन श्रेणीवर झालेला अन्याय दूर होणेबाबत

 ७ व्या वेतन आयोगाचा लाभ सन २०१६नंतर वरिष्ठ वेतनक्षेणी लागु होणाऱ्या शिक्षकांना मिळावा याबाबत सरचिटणीस यांना महत्त्वाचे पत्र ...




प्रति,

सरचिटणीस,

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

मंत्रालय,

मुंबई- ४०० ०३२

दि. २३/०३/२०२३


संदर्भ :- महाराष्ट्र राज्य राजपत्र, असाधारण भाग IV -B दिनांक 03 मार्च २०२३,

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, अधिसूचना, दि. ३ मार्च २०२३ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २२/०२/२०१९ नुसार विषय:- वरील संदर्भाने प्राथमिक शिक्षक पदाबाबत हरकती नोंदवण्याबाबत


7 व्या वेतन आयोगाच्या प्राथमिक शिक्षक (HSC, Ded) संरचनेमध्ये १ जानेवारी २०१६ नंतर वरिष्ठ श्रेणी / चटोपाध्याय (Senior acale) लागू होत करतांना प्राथमिक शिक्षकांचे वेतन निश्चिती करतांना नुकसान होत असल्याबाबत हरकत नोंदवण्या बाबत.


सर,

उपरोक्त विषयी विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की, महाराष्ट्र

शासनाने बक्षी समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार व दि ०३/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार प्राथमिक शिक्षक (HSC, D ed.) यांना 12 वर्ष सलग पदोन्नती न घेता एकाच वेतनश्रेणीत सेवा केल्याने सदरील कर्मचाऱ्यांस वरिष्ठ वेतनश्रेणी (senior scale) प्रदान करण्यात येवून मूळ वेतनात वाढ करण्यात येते. 6 व्या वेतन आयोगामध्ये प्राथमिक शिक्षकाला ही चटोपाध्याय वेतनश्रेणी / वरिष्ठ वेतनश्रेणी (seniour scale) देतांना असुधारीत वेतनश्रेणी PB1 ( 5200-20200) Grade Pay 2800 सुधारित वेतन श्रेणी PB2 (9300-34800) Grade Pay 4200 या वेतनश्रेणीत वेतन निश्चिती करण्यात येत होती. यामुळे प्राथमिक शिक्षकाचे मुळवेतन PB1 ते PB2 मध्ये जाताना GP च्या वाढीमुळे 1400 रुपयांनी वाढत होते. डिसें 15 च्या अनुषंगाने महागाई भत्ता (DA) 142% व घरभाडे भत्ता (HRA) 10% विचारात घेतल्यास एकूण वेतनात 3528 रु ची वाढ 6 व्या वेतन आयोगात होत होती. परंतू दिनांक 14 मार्च 2023 च्या शासन राजपत्रानुसार व शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २२/०२/२०१९ नुसार प्राथमिक शिक्षकांची 12 वर्षा नंतर मिळणारी चटोपाध्याय वेतनश्रेणी/ वरिष्ठ वेतनश्रेणी (senior scale) ही 7 व्या वेतन आयोगात म्हणजेच दि ०१/०१/२०१६ नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होतांना S10 हा मेट्रिक्स सेल मधून S13 या मेट्रिक्स सेल मध्ये मुळवेतन (Basic) स्थानांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ वेतनात कोणत्याही प्रकारची वरिष्ठ वेतनश्रेणी म्हणून अपेक्षित असलेली वाढ होतांना दिसून येत नाही फक्त S10 मेट्रिक्स सेल मधील मुळवेतनाचा आकडा हा S13 त तंतोतंत न जुळल्याने अपघाताने 700 किंवा 600 रु ची नगण्य वाढ दिसते. ही मुळवेतनातील वाढ ही वरिष्ठ वेतनश्रेणी ची नसून S10 मधील मुळवेतन S13 या मेट्रिक्स टेबल मध्ये शोधतांना मिळालेली वाढ आहे. 7 व्या वेतन आयोगात वार्षिक वेतनवाढ ही सुमारे 1200 रु ची आहे, त्या तुलनेत 12 वर्षानंतरची वाढ ही 700 रु कशी असू शकते?

6 व्या वेतन आयोगात वरिष्ठ वेतनश्रेणीत मुळवेतन PB1 ते PB2 असे स्थानांतर होत असतांना 2800 रु grade pay मुळवेतनात वाढत होते, 7 व्या आयोगात ही वाढ 600/700 ची कशी असेल?

31 डिसेंबर 2015 ला 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या प्राथमिक शिक्षकाचा ग्रेड पे 2800 हुन हा 4200 रु झाल्याने 1 जाने 2016 ला 7 वा वेतन आयोगात 2.57 ने मुळवेतनास गुणतांना त्याची 1400 रु ची वरिष्ठ वेतनश्रेणी वाढ देखील 2.57 पट होते, त्यामुळे सदरील शिक्षकाची S13 मधील वेतन निश्चिती उच्च स्तरावर (level वर) होते. तर 01 जाने 2016 नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकाची मुळवेतना तील वाढ 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या दिनांकास 1400 रु च्या 2.57 पट होत नाही. व त्यांची वेतन निश्चिती त्यांच्यापेक्षा 1 वर्ष सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांपेक्षा 3 स्तर (level) निम्न असणाऱ्या मुळवेतनावर होते.

ही 7 व्या वेतन आयोगातील त्रुटी असून या त्रुटींमुळे 6 व्या वेतन आयोगात 31 डिसेंबर 2015 ला वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त शिक्षक व 2 जाने 2016 ला वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त शिक्षक यांच्यात 1 वेतनवाढी ची तफावत असणे अपेक्षित असतांना तब्बल 3 वेतनवाढी ची तफावत निर्माण झाली आहे.


उदाहरणांसह वेतन निश्चिती. फरक खालीलप्रमाणे

| सहावा वेतन- वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ

| वरिष्ठ वेतनश्रेणी पूर्वीचे मुळवेतन=१५६८०

सातवा वेतन वरिष्ठ वेतनश्रेणीलाभ

वरिष्ठ वेतनश्रेणी पूर्वीचे मुळवेतन = ४०४०० (१५६८०४२. ५० ने गुणून S-10 मध्ये

निश्चिती)

| वरिष्ठ वेतनश्रेणी नंतरचे

| मुळवेतन = १७०८०

वरिष्ठ वेतनश्रेणी नंतरचे

| मुळवेतन = ४११०० (४०४०० ही रक्कम S-13 मध्ये ४११०० निश्चिती) | वरील मूळवेतनात वाढ १४००रु. म्हणजेच वरील मूळवेतनात वाढ ७००रु. म्हणजेच ८.९२% इतकी.

१.६८% इतकी.

असे नुकसान ०१ जानेवारी २०१६ नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे होणार आहे.

५ टिप्पण्या:

प्रदीप पाटील म्हणाले...

सचिव चे सरचिटणीस केले वाटते.

zpmsslatur49@gmail.com म्हणाले...

अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आपण केलेली दिसते. ज्या प्राथमिक शिक्षकांनी प्राथमिक पदवीधर पदोन्नती घेतली त्या शिक्षकांचे वेतन त्याच नियुक्ती दिनांकावरील प्राथमिक शिक्षकांपेक्षा कमी आहे ही अनियमितता आहे. त्यामुळे आता प्राथमिक शिक्षक पदोन्नती साठी नकार देत आहेत हे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी लक्षात घ्यायला हवे. ही अनियमितता दूर करायला हवी.

zpmsslatur49@gmail.com म्हणाले...

प्रति,
माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई -32.
विषय :वेतन त्रुटी बाबत माहिती सविनय सादर करून दुरुस्ती करिता निवेदन .
संदर्भ :1) पे स्लिप श्री मोहन शिवराज पाटील नियुक्ती दिनांक 22 /07/ 1992 .
2) पे स्लिप श्री बालाजी विठ्ठलराव उचेकर नियुक्ती दिनांक 29/07 /1992. 3)नोटिफिकेशन दिनांक 03/03/2023

महोदय,
वरील संदर्भीय विषयी विनंती की, मी आणि बालाजी उचेकर दोघेही एकाच जुलै 1992 मध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर रुजू झालो त्यावेळी दोघांनाही समान वेतन होते. दोघेही चटोपाध्याय नंतर 4200 ग्रेड पेवर फिक्स झालो, त्यानंतर दिनांक 29/08 /2009 रोजी मी प्राथमिक पदवीधर पदी पदोन्नतीने रुजू झालो. त्यावेळी मला सहाव्या वेतन आयोगानुसार 4300 ग्रेड पे वर वेतन निश्चित झाले आणि माझे वेतन प्राथमिक शिक्षक पदी असलेल्या बालाजी उचेकर या माझ्या सहकाऱ्यापेक्षा जास्त झाले. परंतु सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती झाली तेव्हा माझे वेतन सहाव्या वेतन आयोगात उचेकर पेक्षा जास्त असून सुद्धा सातव्या वेतन आयोगात माझे वेतन उचेकर पेक्षा कमी झाले ही बाब अत्यंत खेदजनक आहे . त्या - त्या प्रमाणानुसार मला वेतन वाढ मिळालेली नाही. बालाजी उचेकर प्राथमिक शिक्षक हे एस-13 मध्ये आहेत आणि मी एस -14 मध्ये आहे .मला पदोन्नती मिळूनही माझे वेतन त्यांच्यापेक्षा 147 रुपयांनी कमी आहे .त्यामुळे वेतन निश्चितीमध्ये सातव्या वेतन आयोगाकडून अनिमितता झाली आहे असे माझे म्हणणे आहे .
तरी मा.साहेबांनी सदरील बाबींची पडताळणी करून प्राथमिक शिक्षक आणि पदोन्नत प्राथमिक शिक्षक(म्हणजे प्रा.प.) यांच्या वेतनाचा तुलनात्मक अभ्यास करून पदोन्नत प्राथमिक शिक्षक म्हणजे प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे वेतन पूर्वलक्षी प्रभावाने प्राथमिक शिक्षकांपेक्षा जास्तीचे राहील याप्रमाणे वेतन संरचनेत दुरुस्ती करावी ही नम्र विनंती.
सोबत/अ-
1) वेतन पत्रक श्री मोहन पाटील .
2) वेतन पत्रक श्री बालाजी उचेकर.

आपला विश्वासू
स्वाक्षरीने
श्री मोहन पाटील
प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला मुलांची अहमदपूर, जिल्हा लातूर.

zpmsslatur49@gmail.com म्हणाले...

प्रति,
मा.प्रधान सचिव साहेब,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई -३२

संदर्भ: राजपत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मंत्रालय मुंबई -32 दि.3 मार्च 2023 चे नोटीफीकेशन (schedule C)

महोदय,
वरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने विनंती करण्यात येते की, माध्यमिक शिक्षक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी 4300 वरून 4400 दिली जाते .प्रत्यक्षात ही चटोपाध्याय वेतनश्रेणी 32% ते 50% वाढ होणे अपेक्षित आहे इतर सर्व पदासाठी अशीच वाढ दिली आहे. मग माध्यमिक शिक्षक यांच्या वर फक्त 100 रू.वाढ देऊन हा अन्याय होत आहे, असमानता होत आहे.
सविस्तर वर्णन पुढीलप्रमाणे;
माध्यमिक शिक्षकांना वरीष्ठ वेतन श्रेणी मध्ये 4300/- वरुन 4400/- मिळते म्हणजे फक्त 100/- रू वाढ होते, प्राथमिक शिक्षकांना 2800/- वरुन 4200/- म्हणजे 1400/- रुपये वाढ होते , कनिष्ठ व्याख्याता 4600/- वरुन 5400/- म्हणजे 800/- रू.वाढ होते ,मुख्याध्यापक 4800/- वरुन 5700/- म्हणजे 900/-रू. वाढ होते. परंतु इतरांचे तुलनेत माध्यमिक शिक्षकांना फक्त 100/-रू. वाढ ही असमानता नाही काय? ती दुर करण्यासाठी माध्यमिक शिक्षकांना सुद्धा 4300/-रू. वरुन 4800/-रू. ग्रेड पे वाढ देण्यात यावी. म्हणजेच माध्यमिक शिक्षकांना pay matrix S14 वरुन S15 दिल्या जाते. त्या ऐवजी pay matrix S 14 वरून S17 ची मागणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी माननीय साहेबांनी वेतनातील तफावत आणि असमानता यांचा अभ्यास करून माध्यमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करताना pay matrix S14 वरून S 17 मधील वेतनश्रेणी देण्यात यावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
श्री माधव गुंडरे जिल्हा सचिव, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूर
9766669211

zpmsslatur49@gmail.com म्हणाले...

प्रति,
मा.प्रधान सचिव साहेब,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई -३२

संदर्भ: राजपत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मंत्रालय मुंबई -32 दि.3 मार्च 2023 चे नोटीफीकेशन (schedule C)

महोदय,
वरील संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने विनंती करण्यात येते की, माध्यमिक शिक्षक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी 4300 वरून 4400 दिली जाते .प्रत्यक्षात ही चटोपाध्याय वेतनश्रेणी 32% ते 50% वाढ होणे अपेक्षित आहे इतर सर्व पदासाठी अशीच वाढ दिली आहे. मग माध्यमिक शिक्षक यांच्या वर फक्त 100 रू.वाढ देऊन हा अन्याय होत आहे, असमानता होत आहे.
सविस्तर वर्णन पुढीलप्रमाणे;
माध्यमिक शिक्षकांना वरीष्ठ वेतन श्रेणी मध्ये 4300/- वरुन 4400/- मिळते म्हणजे फक्त 100/- रू वाढ होते, प्राथमिक शिक्षकांना 2800/- वरुन 4200/- म्हणजे 1400/- रुपये वाढ होते , कनिष्ठ व्याख्याता 4600/- वरुन 5400/- म्हणजे 800/- रू.वाढ होते ,मुख्याध्यापक 4800/- वरुन 5700/- म्हणजे 900/-रू. वाढ होते. परंतु इतरांचे तुलनेत माध्यमिक शिक्षकांना फक्त 100/-रू. वाढ ही असमानता नाही काय? ती दुर करण्यासाठी माध्यमिक शिक्षकांना सुद्धा 4300/-रू. वरुन 4800/-रू. ग्रेड पे वाढ देण्यात यावी. म्हणजेच माध्यमिक शिक्षकांना pay matrix S14 वरुन S15 दिल्या जाते. त्या ऐवजी pay matrix S 14 वरून S17 ची मागणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी माननीय साहेबांनी वेतनातील तफावत आणि असमानता यांचा अभ्यास करून माध्यमिक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करताना pay matrix S14 वरून S 17 मधील वेतनश्रेणी देण्यात यावी ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
श्री माधव गुंडरे जिल्हा सचिव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा लातूर