डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

संजय नागे यांच्या लेखणीतून बदली अपडेट

 ✳️ *बदली अपडेट*

*अवघड क्षेत्र रिक्त जागा भरणे महत्त्वाचे टप्पे*


*संजय नागे दर्यापूर 9767397707*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या या टप्प्या मध्ये बदलीचा संदर्भ दिनांक 30 जून 2022 असेल*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या टप्प्यामध्ये पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या वास्तव सेवा जेष्ठतेने म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा जेष्ठतेने करण्यात येतील*


➡️ *सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची 10 अथवा 10 पेक्षा जास्त वर्षे सेवा झाली आहे या शिक्षकांना शाळेवरील सेवेची अट राहणार नाही अशा शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाईल.*


✳️ *नकाराची सुविधा खालील प्रकारचे शिक्षक घेऊ शकतील* 


➡️ *जे शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असून सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष न झाल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत असे शिक्षक या टप्प्यामध्ये नकार देऊन आपली बदली टाळू शकतात*


➡️ *ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता होकार दिला होता परंतु त्यांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात व ते नकार देऊन बदली टाळू शकतात*


➡️ *तसेच ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांना शाळेवर तीन वर्ष झाले असताना सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये होकार किंवा नकार नोंदवला नव्हता अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात असे शिक्षक सुद्धा या बदली टप्प्यामध्ये नकार नोंदवून बदली टाळू शकतात*


➡️ *विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना  आपण संवर्ग एक मध्ये येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील सादर केलेल्या प्रमाणपत्राची वैधता पडताळण्यासाठी 30 जून 2022 ही तारीख प्रमाणित धरण्यात येईल* 


✳️ *सदर बदली टप्प्यांमध्ये खालील शिक्षकांचा समावेश होणार नाही*


➡️ *जिल्हातर्गत बदली प्रक्रिया 2022 च्या बदली प्रक्रियेमध्ये यापूर्वी कोणत्याही संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही*

➡️ *ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वीच बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता नकार दिलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही* 


➡️ *तसेच याआधी बदलीपात्र शिक्षकाने, विशेष संवर्ग 1 मधून अर्ज भरताना बदलितून सूट हवी आहे का या प्रश्नाला नकार नोंदवला व पसंती क्रम न भरल्यामुळे त्या शिक्षकाची विस्थापित राउंडमध्ये बदली झाली*


➡️ *विशेष संवर्ग भाग एक च्या ज्या शिक्षकांनी बदली करिता होकार नोंदवून बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही*


➡️ *ज्या विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षकांचाही समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही*


✳️ *अत्यंत महत्त्वाचे नकार कसा नोंदवावा*


*ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी असल्यास म्हणजेच नकार द्यावयाचा असल्यास किंवा असलेल्या शाळेवरून बदली नको असल्यास*

*खालील पोर्टल वरील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होय (Yes) नोदवावे*


*माझे नाव अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या यादीत आले असून मला बदलीतून सूट हवी आहे ? --- होय Yes*


*या यादीत समाविष्ट असलेले सर्व संवर्ग एक चे शिक्षक बदली करिता नकार नोंदवणार आहेत म्हणजेच आहे त्या शाळेवरून बदली मागणार नाहीत त्यामुळे होकारासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले नाही*


✳️ *बदली प्रक्रिया खालील प्रमाणे करण्यात येईल*


➡️ *सर्वप्रथम सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांची वास्तव सेवा जेष्ठतेनुसार यादी दिनांक 6 मार्च पूर्वी प्रकाशित करण्यात येईल*


➡️ *प्रकाशित केलेल्या यादी मधील संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकार देण्याची सुविधा दि. 6/03/2023 ते 8/03/2023 दरम्यान  देण्यात येईल यामध्ये शक्यतोवर संवर्ग एक च्या शिक्षकांनी नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली होणार नाही*


➡️ *ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी होकार किंवा नकार नोंदवलेला आहे त्या शिक्षकांच्या संवर्ग एक च्या पुराव्याची व अर्जाची पडताळणी दि. *9/03/2023 ते 11/03/2023 दरम्यान शिक्षणाधिकारी करतील*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी प्रकाशित होईल  तसेच अवघड क्षेत्रात रिक्त पदांच्या संख्येएवढी  सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक ,भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र व मुख्याध्यापक शिक्षकांची यादी संवर्ग एक च्या नकार दिलेल्या शिक्षकांना वगळून दि 13/03/2023 रोजी प्रकाशित करण्यात येईल* 


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून दि.14/03/2023 ते 17/03/2023  दरम्यान प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल* 


➡️ *प्राधान्यक्रम भरल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या  जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया दि.18/03/2023 ते 20/03/2023 दरम्यान चालविली जाईल याच कालावधीत ज्या शिक्षकांना त्यांच्या प्राधान्य क्रमाने बदली देणे शक्य न झाल्यास अशा शिक्षकांची बदली सिस्टीम व्दारे करण्यात येईल*


➡️ *जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2022 या ठिकाणी पूर्ण होत असल्यामुळे या बदली प्रक्रियेतील सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश दिनांक 21 /3/ 2023 ला प्रकाशित करण्यात येतील*



➡️ *या बदली टप्प्यामध्ये आपण पसंती क्रम न दिल्यास आपली बदली सिस्टीम द्वारे करण्यात येईल*


➡️ *पसंतिक्रम देण्यासाठी बंधन नाही. किमान 1 आणि कमाल 30 पर्याय बदली अर्जामध्ये आपण देऊ शकता.*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या बदली टप्प्यामध्ये प्रकाशित झालेल्या यादीतील शिक्षकांनी शक्यतोवर तीस शाळांचा पसंती क्रम भरावा*


➡️ *पसंतीक्रम भरत असताना आपला यादीतील सेवा जेष्ठता व उपलब्ध असलेल्या जागांचा समन्वय साधून प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून याच तीस शाळांपैकी एक शाळा मिळणे सोयीचे होईल*


➡️ *आपण दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जर आपल्याला शाळा न मिळाल्यास आपली बदली सिस्टीम द्वारे करण्यात येईल या ठिकाणी आपणास गैरसोयीच्या शाळा मिळू शकतात*

*काही अडचण आल्यास आपण मला सरळ कॉल करू शकता* 


*धन्यवाद*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: