डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शैक्षणिक कर्ज काढले तर हे वाचा....

 अलीकडच्या काळात फक्त गुणवत्तेच्या आधारावर पैशाअभावी शिक्षण घेणे कठीण झाले आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या महागड्या अभ्यासाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. 



त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही यापासून दूर राहावे लागते. मात्र शैक्षणिक कर्ज हा यावरचा एक एकमेव  उपाय आहे. शैक्षणिक कर्ज घेऊन तुमचे चांगल्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे या कर्जामध्ये प्राप्तिकरात विशेष सूट देण्याची तरतूद आहे. बरेच लोक त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतात मात्र हे त्यांना माहिती नसते की शैक्षणिक कर्जाद्वारे ते प्राप्तिकरातदेखील सूट किंवा वजावट मिळवू शकतात. 


प्राप्तिकरात सूट कशी मिळवायची?

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80E आणि 80C अंतर्गत शैक्षणिक कर्जाला सूट मिळू शकते. या नियमानुसार जे लोक प्राप्तिकर भरतात, त्यांनी जर आपल्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर अशांना प्राप्तिकरात सूट मिळते. आयटीआर भरताना प्राप्तिकर भरणारे यामध्ये सूट मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच, जर तुम्ही शैक्षणिक कर्ज किंवा एज्युकेशन लोनवर व्याज देण्यासाठी पैसे खर्च केले असतील तर तुम्हाला कमी प्राप्तिकर भरावा लागेल.


कोणाला मिळतो या सवलतीचा लाभ

ज्यांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज घेतले आहे ते पालक शिक्षण कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्ही प्राप्तिकरदाता असणे आवश्यक आहे. कारण ही सूट तुम्हाला थेट प्राप्तिकरात मिळणार नाही.

किती रुपयांची वजावट मिळते

प्राप्तिकर कायद्यानुसार शैक्षणिक कर्ज घेऊन वर्षभरात दीड लाखांपर्यंतचा लाभ घेता येतो. जर पती आणि पत्नी दोघेही प्राप्तिकर भरणारे असतील तर दोघेही स्वतंत्र परताव्यासाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त मुले असतील आणि तुम्ही दोन मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर असे होऊ शकते.

खेळ जुना युग नवा... पहा...

शैक्षणिक कर्जावरील वजावटीसाठीटा अर्ज

यासाठी तुम्हाला प्राप्तिकर विवरणपत्र किंवा आयटीआर साठी अर्ज करावा लागेल. तुम्ही व्याज जमा करता तेव्हा तुमची बँक तुम्ही भरलेल्या रकमेचे प्रमाणपत्र देते. हे प्रमाणपत्र ITR सोबत जोडावे. जर तुमच्या पगारातून कर्जाचे व्याज (TDS) कापले गेले असेल तर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र किंवा आयटीआरसाठी अर्ज करताना परतावा म्हणजे रिफंड मागू शकता. पण टीडीएस कापला जाऊ नये म्हणून आधी तुम्ही ज्या कंपनीत काम करत असाल तिथल्या एचआरला याबद्दल सांगणे जास्त योग्य ठरेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: