Header add

आंतरजिल्हा बदली पदस्थापना जिल्हातंर्गत नंतर देणेबाबत

 विषय : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.

संदर्भ : १) ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिप ४८२०/प्र.क्र.२९० / आस्था. १४,

दिनांक ७.४.२०२१.

१२) क्रमांक. आजिव- २०२२/प्र.क्र. ३४ /आस्था-१४, दिनांक ७.४.२०२१ चा शासन निर्णय व दिनांक ३०.८.२०२२ चे पत्र.

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णय व शासनपत्राचे कृपया अवलोकन व्हावे. २. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे आंतरजिल्हा बदल्यांबाबत दिनांक

२२.८.२०२२ रोजी आदेश निर्गमीत झाल्याने प्रथम टप्पा पुर्ण झाला आहे. सदर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक ५.९.२०२२ पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ३०.८.२०२२ च्या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरून आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरुन सुरु असेलच.

आता, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करावयाची आहे. त्याकरिता दिनांक ३१.८. २०२२ पर्यंत सेवानिवृत्त / निधन किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपुर्ण तपशील ऑनलाईन बदली प्रणालीवर अद्ययावत करण्यात यावा.

३. दिनांक ३१.८.२०२२ पर्यंतची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर अद्ययावत केल्यानंतर, आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर शासन निर्णयातील तरतुदीनुसार समायोजनाने पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन एकाच जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती होणार नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही विनाव्यत्यय पार पाडली जाईल, याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.


पत्र सविस्तर वाचा....शेती विषय ५ वी पासूनच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.