✍🏻✍🏻✍🏻✍🏻माननीय आयुष प्रसाद साहेब यांच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
✍🏻✍🏻✍🏻✍🏻
👉🏼 1)शिक्षक संवर्ग चार 4 साठी त्यांच्या बदल्या करत असताना कुठचीही जागा समानीकरणामध्ये ठेवू नये. अर्थातच सर्व रिक्त व बदली पात्र शिक्षकांच्या जागा त्या संवर्ग चार 4 साठी खुल्या करण्यात याव्यात.
संवर्ग दोन 2
👉🏼2) संवर्ग 2 मध्ये या वर्षी बदली झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत
या वर्षी ज्यांची संवर्ग 2 मध्ये बदली झालेली आहे अशा पती व पत्नी यांना इथून पुढे किमान 5 वर्षे बदलीपात्र धरण्यात येऊ नये.
आयुष प्रसाद साहेब यांनी ही मागणी अमान्य केली आहे.
संवर्ग तीन 3
👉🏼3)विषय - संवर्ग 3 मधील अवघड मधून सुगम मध्ये आलेल्या शाळेतील शिक्षकांना येत्या बदली प्रक्रियेत एक संधी मिळणेबाबत मागणी करण्यात आली होती
2019 च्या यादीनुसार ज्या शाळा अवघड मध्ये होत्या परंतु 2022 च्या यादीत त्या सुगम मध्ये आल्या आहेत. अशा शाळेतील शिक्षकांना येत्या जिल्हा अंतर्गत बदलीत संधी मिळावी कारण फेब्रुवारी 2023 मधील प्रक्रियेत राज्यातील अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना रिक्त पदे न दाखवल्याने शिक्षकांनी बदली प्रक्रियेत सहभाग घेतला नाही आणि आज त्यांच्या शाळा सुगम मध्ये आल्यामुळे त्यांना त्याच शाळेत 10 वर्ष काढावे लागणार आहेत. त्यामुळे अशा अवघड मधून सुगम मध्ये आलेल्या शाळेतील शिक्षकांना ज्यांनी यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही अशा शिक्षकांना पुन्हा एक संधी बदली प्रक्रियेत मिळावी ही विनंती माननीय साहेबांनी मान्य केलेली आहे.
👉🏼4) सामाजिक शास्त्र, भाषा व विज्ञान या प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या बदल्या करत असताना त्याची एकही जागा समानीकरणांमध्ये ठेवू नये. या जागा समानीकरणांमध्ये ठेवून खाजगी शाळेतील पदवीधर शिक्षकांना समायोजनामध्ये पदस्थापना देण्यात आलेली आहे ही बाब जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधर शिक्षकांसाठी अतिशय अन्यकारक आहे. यावर माननीय आयुष प्रसाद साहेब यांनी याबाबत ज्या जिल्ह्यांमध्ये खाजगी प्राथमिक पदवीधर शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली या जागावर पदस्थापना देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवणार व जागा ह्या समानीकरणांमध्ये टाकण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे आश्वासन माननीय साहेबांनी शिष्टमंडळास दिले आहे. व तसेच मला अध्यक्ष या नात्याने पुढच्या जिल्हा परिषद मध्ये किती खाजगी शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली पदस्थापना देण्यात आलेली आहे याचा आकडा माहित करण्याचे सुचविले आहे.
👉🏼 5)संवर्ग एक च्या बाबतीमध्ये "एन्जोप्लास्टी चा"शासन निर्णयामध्ये समावेश करण्यात यावा अशा प्रकारचे मागणी करण्यात आली होती. अशा अनेक आजारांना संवर्ग एक मध्ये टाकू टाकण्याची मागणी येईल व त्यामुळे संवर्ग 1 एक च्या बदलीचा आकडा फुगलेला दिसेल व त्याचा परिणाम हा संवर्ग एक, दोन,तीन आणि चार वर होणार. यामुळे या आजाराला शासन निर्णयाच्या बदली प्रक्रियेत समावेश करता येणार नाही. असे स्पष्ट सांगितले
👉🏼6) सेवाजेष्ठतेची निश्चित तारीख ही 31 मे ऐवजी आता 30 जून ही धरण्यात येणार आहे. ही अनेक शिक्षकांच्या मागणी होती आणि या मागणीला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य करत न्याय दिला आहे.
याबरोबर अनेक विषयावर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्यातून शिक्षक संघटना समन्वय समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
🌹🌹🌹🌹🌹
आंतर जिल्हा बदली संदर्भात काही चर्चा झाली का नाही
उत्तर द्याहटवा६वा टप्पा रद्द बाबत काय चर्चा झाली?
उत्तर द्याहटवाटप्पा ६ हा अन्याय कारक आहे आणि तो रद्द व्हायला पाहिजे
उत्तर द्याहटवाआपसी आंतरजिल्हा बदली करून आलेल्यांना न्याय मिळाला नाही अजून. ज्युनिअर ची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरायला हवी
उत्तर द्याहटवासंवर्ग 3 ला रिक्त पदे दाखवावीत व दुर्गम सेवा ज्येष्ठ ता ग्राह्य धरावी हा मुद्दा घेतला कि नाही. संवर्ग 3 साठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा ❓️
उत्तर द्याहटवाज्या ज्या जिल्ह्यात दुर्गम क्षेत्र आहे ,त्या त्या जिल्यात ज्यांच्यासाठी बदली प्रक्रिया राबवली जाते ,त्या दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्याच बदल्या झालेल्या नाहीत म्हणून सर्व प्रथम 2023 घ्या बदल्या तातडीने सुरू व्हाव्यात.
हटवाविनंती बदलीसाठी कार्यरत जिल्ह्यातील सेवाही पाच वर्षे सेवेची अट असावी किंवा अंतर जिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांना सध्याच्या मध्ये बदलीसाठी पाच वर्षे सेवा ही अट असावी
उत्तर द्याहटवा