डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

छत्तीसगड पोलीस विभागात तब्बल 5967 रिक्त पद भरण्यात येणार

 

छत्तीसगड पोलीस विभागानं (सीजी) पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. या पदांसाठी २० ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत या पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी छत्तीसगड पोलिसांची अधिकृत वेबसाईट असलेल्या cgpolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा असं आवाहन पोलीस
खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.




जो उमेदवार दहावी पास आहे, आणि ज्याच वय 1 जानेवारी 2023 पूर्वी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 28 वर्ष आहे, असा कोणताही उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. ज्या उमेदवरांची परीक्षेनंतर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड होईल त्याला 19,500 ते 62,000 रुपये अशा श्रेणीमध्ये पगार दिला जाईल. 

अर्ज करण्यासाठी पुरुष उमेदवारांची उंची कमीत कमी 168 सेमी तर महिला उमेदवारांची उंची 158 सेमी एवढी असंण आवश्यक आहे.

छत्तीसगड पोलीस विभागात तब्बल 5967 रिक्त पद भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये ओपनसाठी 2291 पदं, इतर मागसवर्गासाठी 765 पद, अनुसूचित जातीसाठी 572 पदं, तर ओबीसीसाठी 2349 पदं राखीव आहेत. या पदासाठी उमेदवाराला वीस ऑक्टोबरपासून ते तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: