डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

कमी पटाच्या शाळा बंदबाबत शिक्षणमंत्रीचा खुलासा

 महाराष्ट्र शासनाने वाड्या-वस्तीवरील कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.


मा.कॉ. संपत देसाई व इतर

शाळा बचाव आंदोलन, आजरा जि. कोल्हापुर, यांना लिहिलेल्या पत्रात शिक्षणमंत्री यांचा मोठा खुलासा...

विषय :- शाळा बचाव आंदोलन मागे घेण्याबाबत.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्या हे कारण सांगून २० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या आणि राज्य शासनाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या शाळा बंद करुन त्या समुह शाळेत समायोजित करण्याच्या निर्णया विरोधात आजरा येथुन शिक्षण हक्क यात्रा' अर्थात लॉग मार्च आंदोलन आयोजित केले आहे.

या अनुषंगाने मा. ना. श्री. दिपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक २९/१०/२०२३ रोजी रात्रौ ११.०० वा. आंबोली येथे आपली समक्ष भेट घेवुन चर्चा केली व आपले या विषयाबाबतचे शंका समाधान केले आहे. समक्ष झालेल्या चर्चेनुसार व मला दिलेल्या निर्देशानुसार खालील प्रमाणे विनंती करण्यात येत आहे.

. शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या पत्रामधील मजकुरामध्ये सुध्दा समुह शाळानिर्मीतीचा हेतू हा विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे व गुणवत्तापुर्ण शिक्षण उपलब्ध करुन देणे हा आहे. तसेच सदर पत्रामध्ये शाळा बंद करण्याचा हेतू नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. तरी कृपया सदरचे आंदोलन मागे घेण्यात यावे ही नम्र विनंती.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: