डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन देय लाभा बाबत #retirement


सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन देय लाभा बाबत


नियम 118


नुसार प्रत्येक सहामाहीत (माहे | जानेवारी व 1 जुलै) पुढील 24 ते 30 महिन्यात सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांची यादी तयार करून कार्यालय प्रमुखांकडे सादर करणे आवश्यक राहिल.



नियम 119


शासकिय निवास स्थान नियत केले असल्यास 2 वर्ष आगोदर कार्यालस प्रमुख कार्यकारी अभियंत्याला वाटपप्राप्त कर्मचा-याच्या सेवा निवृत्ती पूर्वीच्या 8 महिण्याच्या कालावधीत त्यांचे बेबाकी प्रमाणपत्र देणे आवश्यक राहिल.


नियम 120 नुसार सेवा निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रके तयार करणे.



सदर नियमानुसार पुढील 2 वर्षात सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांची (इतर प्रकारे सेवा समाप्त झाल्यास तात्काळ) सेवा पुस्तकेतील सेवा विषयक सर्व बाबी तपासून तपासणी सुची प्रमाणे योग्य असल्याची खात्री करून वित्त विभागाकडे सादर करणे आवश्यक राहिल. तसेच नमुना 6 मधिल निवृत्ती वेतन विषयक कागद पत्रे तयार करणे (जसे प्रथम पृष्ठा वरील नोंदीची पुर्तता पडताळणी, स्थायी, अहर्ताकारी सेवा, सेवा विषयक परीक्षा निवृत्ती वेतन लाभाची परीगणना, नामनिर्देशन, कुटुंबाचा तपशील व्यक्तीगत ओळख इ.)


नियम 121 नुसार सेवा निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रके तयार करण्या संबंधिचे टप्पे


निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे 2 वर्षा पूर्वी तयार करणे आवश्यक आहे तसेच या 2 वर्षाच्या कालावधीत कार्यालय प्रमुखानी संबंधित कर्मचा-याचे सेवा पुस्तीका मधिल सर्वनोंदी तपासणी सुची प्रमाणे पडताळुन वित्त विभागाकडे पाठविणे आवश्यक आहे


1 पहिला टप्पा :


कार्यालय प्रमुखानी संबंधित कर्मचा-याचे सेवा पुस्तीका मधिल सर्वनोंदी तपासणी सुची प्रमाणे पडताळुन ते योग्य  असल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन प्रस्ताव वित्तविभागाकडे पाठविणे आवश्यक आहे.


-उदा कार्यमुक्ती उपस्थिती  सेवा खंड शिक्षा इ. बाबीच्या नोंदी.



2 दुसरा टप्पा:


सेवा पुस्तीकेतील उणीवा सर्व नोंदीच्या अनुषंगाने त्या पुराव्या सह पडताळून सेवा निवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन लाभास योग्य असल्या बाबत पात्र ठरवीणे. तसेच म.ना.से. नियम 120 बी 3 नुसार मागिल 24 महिन्यातील वेतनाची तपासणी करणे


3 तिसरा टप्पा:


कार्यालय प्रमुखांनी 8 महिने आगोदर न. 5 मधिल नोदी (अग्रिमे, रजावेतन, वेतनातील कपाती, शासकिय वसुली) इ बाबत कार्यवाही करुन घेणे आवश्यक आहे.


नियम 123


निवृत्ती वेतन विषयक प्रस्ताव किमान 6 महिने अगोदर नमुना 5,6,7 च्या प्रती प्रमाणित करन विभागाकडे सादर कराव्यात.


नियम 124


वित्त विभागात संचिका प्रस्तावित असेल तेंव्हा सदर कालावधीत निवृत्ती वेतनावर परीणाम होणारी घटना पडली असेल तर ती नियम 124 नुसार वित्त विभागास तात्काळ कळविणे आवश्यक राहिल.


नियम 125


सबंधिता कडील वसुलपात्र रक्कमा किमान 2 महिने आगोदर वित्त विभागास कळविणे आवश्यक राहिल.


नियम 130


अन्वये विभागाकडुन प्रस्तावित न्यायालयीन प्रकरणात तात्पुरते निवृत्ती वेतन दुस-या सहामाही नंतरीही ते निकाली निघत नसल्यास विभागाने सदर प्रकरण अंतिम होईपर्यंत समायोजन करण्याची जबाबदारी सह संधिका प्रस्तावित करणे आवश्यक राहिल.

आहरण व संवितरण तथा नियंत्रण अधिकारी यांचे स्तरावर निवृत्ती वेतन प्रकरण तयार करून संबंधित मंजुरीस्तव सादर करतांना समवेत जोडावयाचे 


(सेवानिवृत्ती / कुटुंबनिवृत्ती वेतन देय लाभा बाबत)

   पडताळणी प्रपत्र-1


1) सर्वसाधारण माहिती.


(1)  सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांचे नांव

२) हुद्दा         पदनाम

कार्यालयाचे नांव

3)सेवानिवृत्तीचा दिनांक व प्रकार 


(4)सेवानिवृत्तीचा आदेश जोडला आहे काय?


ब) सेवा पुस्तिकाविषयक माहिती.


5) सेवा पुस्तिकाची पहिल्या पानावरील सर्व माहिती भरली आहे काय? त्यावर खातेप्रमुखाची स्वाक्षरी आहे.

 6) कर्मचाऱ्याची जन्मतारिख पडताळणी आवश्यक त्या प्रमाणपत्रावरून नोंद सांक्षाकित केली आहे काय ?

 7) सेवापुस्तिकेच्या पहिल्या पानावर कर्मचारीची स्वाक्षरी आहे का?

8) रजा वेतनवाढ मंजूरी नोंद घेऊन सांक्षाकित केल्या आहेत का?

9) दिनांक 1.1.1986.  1.1.1996  1.1.2006, 2016 व वरिष्ठ वेतनश्रेणी निश्चितीची पडताळणी केली काय? वेतन निश्चितीचे सर्व विकल्प तक्ते पडताळणी करतांना सेवा पुस्तकाला जोडण्यात आले का?


(10) सेवेत वैदयकिय पात्र आसल्या बाबत दाखला सेवा सोबत जोडला आहे काय? 

11)  सेवा पुस्तकात सेवेत कायम झाल्याबाबत नोंद घेतली आहे काय? 

12) सेवा पुस्तिकेत बदली पदोन्नती बाबत, वाटचाल बाबत नियमित नोंद घेतली आहे का?

(13) सेवा पुस्तका सोबत  फॉर्म न 3 व न 5 जोडले आहे काय?

 14) सेवानिवृत्तीच्या आदेशाची क्रंमाकासह सेवा पुस्तकात नोंद घेतली आहे काय? 

15) सेवा आरंभाच्या तारखेपासून सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत सेवा पडताळणी झालेली आहे काय ?


(क) अनियमितता


(16) एखादा कर्मचारी निलंबित असेत तर रूजु झाल्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये केली आहे काय? तसेच निलंबन कालावधी नियमित करुन देय रजा व निलंबीत काळातील सेवा त्याबाबत योग्य  नोंदी सेवा पुस्तिकेस घेतलेल्या आहेत काय? 

(17) विना वेतन रजेमुळे वेतनवाढ पुढे गेली असल्यास तशी नोंदवण्यात आलेली आहे काय?

 (18) सेवा भरतीच्या वेळी वय विहीत मर्यादेपेक्षा जास्त असल्यास नादा वय क्षमापित करणे बाबत परवानगी घेवून तशी सेवा पुस्तिकेत आलेली आहे काय ?


19) दक्षता रोध  पार करण्यास परवानगी देण्यात आली काय? असल्यास कोणत्या दिनांका पासून व कोणत्या कोणत्या आदेशान्वये यांची नोंद सेवा पुस्तिकेत घेण्यात आली काय ?


ड) शिक्षका विषयी (खाजगी शाळेतील सेवा, सेवानिवृत्तीसाठी, वेतनवाढीसाठी धरणे बाबत)

20) मान्यताप्राप्त खाजगी  संस्था  शिक्षकांसह ताब्यात घेतली असेल तर शिक्षक स्वेच्छानुसार सेवानिवृत्त झाला असेल तर त्याची खाजगी शाळेच्या व्यवस्थापनाची खाजगी शाळेतील सेवा बाबतचा दाखला सेवा पुस्तकात जोडला आहे का?

सेवानिवृत्तीच्या लाभाकरिता धरणे बाबत आदेश काढून त्याची नोंद सेवा अशी आहे काय ? 

21) खाजगी शाळेतील सेवा बाबत शिक्षकास भविष्य निर्वाह निधी च्य संस्थेच्या हिस्याची रक्कम अदा केली अशी किती रक्कम व केव्हा मिळाली या बाबतचा दाखला व्याजाचे रकमेसह जोडला आहे काय ?


ई) निवृत्ती वेतन आकारणी बाबत.


22) निवृत्ती वेतनाची आकारणी करताना 10 महिन्याची सरासरी विचारात घेवून निवृत्ती वेतन आकारणी आकारणी बरोबर केलेली आहे काय ? सुधारित शासन निर्णयानुसार शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के या प्रमाणे आकारणी करण्यात आली आहे काय ?


23) मृत्यू-नि-सेवा उपदान आकारणी बरोबर केली आहे काय? व नामनिर्देशन पत्र आकारणी पत्र जोडलेली आहे काय? 

24) प्रकरणा समर्पत निवृत्ती वेतनाचे 40 टक्के भाग अंशराशीकृत करणेबाबतचा प्रस्ताव जोडला आहे काय?


25) प्रकरणी तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन देवून उपदान मंजूर केलेले असल्यास कोणत्या आदेशान्वये व कोणत्या दिनांका पासून व किती रक्कम आदेशाची प्रत जोडली आहे काय ?


ई) संकीर्ण


26) निवृत्ती वेतन प्रकरणात सोबत अंतिम वेतन प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे काय?


27) निवृत्ती वेतन धारकाकडून जादा अदाई (जादा पगार, घरबांधणी कर्म सोसायटी किंवा इतर येणे बाकी असल्यास) यायचे असल्याप्रकरणी स्वतंत्र प्रस्ताव सोबत जोडला आहे काय ?

28) प्रकरणा सोबत निवृत्ती वेतनधारकावर चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसल्याचा दाखला जोडलेला आहे काय?

 29) प्रकरणा समवेत निवृत्ती वेतन धारकांचा सेवा निवृत्ती नंतरचा संपूर्ण पत्ता निवृत्ती वेतनधारकांचे हस्ताक्षरात जोडला आहे काय?


नियंत्रण अधिकाऱ्यांचा  अभिप्राय     

31) शासनाचे निवृत्ती वेतन प्रकरणी वेळोवेची निर्गमित झालेले आदेश व परिपत्रके यांचे अधिनस्त प्रस्तुत प्रकरणी उक्त 1 ते 31 मुखाची माहिती योग्य तो पडताळणी करून कागदपत्रे समवेत सेवा पुस्तिकासह जोडलेले आहेत तसेच प्रकरण कार्यालयात डेवलेल्या नोंदवहीत नोंदवलेले आहे.


(32) सर्व प्रकारच्या वसुलपात्र रक्कमा नमुद करून वसुलो बाबत संबंधिताचे संमतीपत्र घेणे आवश्यक राहिल

     


   विभाग प्रमुख