सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग २
शासन परिपत्रक वित्त विभाग
क्र. वेपूर १२९९/प्र.क्र.५९९/सेवा-१०, दिनांक २०/०१/२००१
अन्वये खालील विवरणपत्रात दर्शविलेल्या मुद्दांचा तपशिल सेवापुस्तकास जोडून वेतनपडताळणी पथकास सादर करण्यात यावा
१. प्रथम नियुक्ती आदेशाची नोंद
२.महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम २००६ वेतननिश्चिती संदर्भात वेतननिश्चिती पथकांनी आक्षेप नोंदविला असल्यास आक्षेप चिठ्ठीसह त्याची केलेली पूर्तता.
३. दिनांक ०१/०४/१९६६ आणि ०१/०४/१९७६ च्या वेतननिश्चितीची पडताळणी झालेली नसल्यास वित्त विभागाच्या दिनांक ११ जून, १९७९ आणि २० ऑगस्ट, १९८६ च्या आदेशान्वये सेवापुस्तकामध्ये नोंदविलेले प्रमाणपत्र आवश्यक राहील.
४. वेतन पडताळणी पथकाकडून पडताळणी झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने वेतनश्रेण्या सुधारीत झालेल्या असतील. तर त्या अनुषंगाने केलेल्या वेतननिश्चितीची विवरणपत्रे आणि विकल्प
५.कर्मचाऱ्याने पदोन्नती प्रसंगी / कालबध्द पदोन्नती प्रसंगी दिलेला विकल्प (दिलेला असल्यास)
६.एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सूट दिल्याची नोंद
७. राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत महालेखापालाकडून/ अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई
यांचेकडून प्राप्त झालेले २५ अ / २५ ब ची विवरणपत्रे
८. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा दिनांक अभिवृध्दी करुन वरिष्ठास मंजूर केलेला असल्यास किंवा कनिष्ठाच्या वेतन एवढे वेतन वाढवून दिलेले असल्यास त्याबाबतच्याआदेशाची प्रत
९. पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यात आलेला असल्यास असा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या आदेशाची प्रत
१०. कर्मचारी गैरहजर असेल / असाधारण रजेवर असेल / निलंबित असेल तर त्यापुढील वेतनवाढी नियमित केल्याचे आदेश.
११. सेवा प्रवेशोत्तर परीक्षा / विभागीय परीक्षा व पर्यवेक्षिय परीक्षा विहित कालावधीमध्ये उत्तीर्ण झाल्याची नोंद
१२. संगणक अर्हता परीक्षा किंवा (MSCIT) उत्तीर्ण असल्याची नोंद
१३. वेतननिश्चितीच्या नोंदी/वेतननिश्चिती विवरणपत्रे व विकल्प
१४. भोळे आयोग (०१/०४/१९७६)
१५.चौथा वेतन आयोग (०१/०१/१९८६)
१६. पाचवा वेतन आयोग (०१/०१/१९९६)
१७. सहावा वेतन आयोग
१८. सातवा वेतन आयोग
१९.पद्मनाभ आयोग
२१. आदेशाची नोंद
२२. निवडश्रेणी अकार्यात्मक वेतनश्रेणी मंजूर आदेशाची नोंद
२३. नियमित वेतनवाढी दिल्याची नोंद
२४. कालबध्द पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना लाभ मंजूरी नाँद/ वेतन निश्चिती नोंद व विवरणपत्र
२५.रजा मंजूर केल्याच्या नोंदी / संपूर्ण रजा लेख्यातील नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत का ?
भाग-२ वेतननिश्चितीचे प्रसंग-(अ)
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१
वेतन निश्चितीचे प्रसंग
शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याची ज्या पदावर प्रथम नियुक्ती होते तेव्हापासून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेळोवेळी वेतननिश्चितीचे प्रसंग येतात. थोडक्यात खालीलप्रमाणे :
१. प्रथम नियुक्ती
२. उच्च पदावर पदोन्नती
३. अधिक जबाबदारी नसलेल्या दुसऱ्या पदावर नियुक्ती
४.म.ना.सेवा (सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम २७ नुसार कमी वेतन असलेल्या पदावर नियुक्ती
५. निवडश्रेणीच्या पदावर नियुक्ती
६. एका संवर्गबाह्य पदावरून दुसऱ्या संवर्गबाह्य पदावर नियुक्ती
७. संवर्गबाह्य / स्वीयेत्तर सेवा/ प्रतिनियुक्तीच्या पदावरुन प्रत्यावर्तन
८. प्रशासकीय कारणास्तव उच्च पदावरुन खालच्या पदावर प्रत्यावर्तन/पदावनत
९. खंडानंतरची नियुक्ती
१०. वेतन श्रेणीत बदल झाल्यास
११. वेतनात कपात / वेतन वाढ रोखून धरणे १२. माजी सैनिकांची पुनर्नियुक्ती नंतरची वेतननिश्चिती
१३. निवृत्ती वेतनधारकांची पुनर्नियुक्ती
१४. वेतनश्रेणीत सुधारणा
१५. पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यात आलेला असल्यास
१६. सुधारित वेतन आयोग
यापुर्वीचा भाग पहाण्यासाठी
संकलन
प्रकाशसिंग राजपूत
औरंगाबाद
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा