शासन निर्णय अधिक्रमित करुन पदभरतीबाबत खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत.
(१) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
(२) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत, त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर किमान एक पद भरता येईल.
शासन निर्णय क्रमांका पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क.
(३) कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत दि.०४.०५.२०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२२१००३११०३१९१७०५ असा आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बाबत नविन धोरण
शिक्षकांची अशैक्षणिक कामे थांबणार....
जिल्हातंर्गत बदली संदर्भात महत्त्वाचे ....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.