डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

चलो आझाद मैदान .... आदर्श समितीचे आंदोलन

 राज्यव्यापी लक्षवेधी धरणे आंदोलन'


प्रमुख मागण्या : 

दि. १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये. राज्यातील शिक्षकांना मुख्यालय वास्तव्याची अट रद करावी. 



राज्यातील उपशिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक रिक्त पदे पदोतीने तात्काळ भरावे. 

राज्यातील डी. एड., बी. एड्.. उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी संधी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी.

 राज्यातील सर्व इयतेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात याव्यात. 

वस्तीशाळा शिक्षकांची मुळे नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा. 

सर्व प्रकारच्या विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. 

सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी.

 शिक्षकांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( १०:२०:३० ) लागू करावी. 

विहित मुदतीत MSCIT उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांकडून होत असलेल्या वसुली थांबवावी.

वसुलीस तात्पुरती स्थगिती न देता MSCIT चा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावी व विनाविलंब पद निर्मिती करून सर्व पात्र शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी. 

सर्व प्रकारचे अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना शिकवू द्या, मराठी शाळा टिकवू द्या. 

राज्यातील जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा. नगर पालिका शाळांमध्ये कला / क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्वा तात्काळ करण्यात याव्यात. 

विधान परिषदेतील शिक्षक आमदार मतदार या संघात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा.

 जिल्हा परिषद प्रशालेतील माध्यमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात याव्यात. 

केंद्रीय शाळांची नव्याने पुनर्रचना करून प्रत्येक केंद्रीय शाळेत संगणक ऑपरेटर. लिपीक व शिपाई पदे भरण्यात यावीत.

 सातवा वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ मिळावा.



 राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करावी. 

उपशिक्षण अधिकारी पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांच्या मुलाखती घेऊन नियुक्त्या देण्यात याव्यात.

 राज्यातील आंतर जिल्हा बदली प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करावी व जिल्हा अंतर्गत बदली करिता जिल्हा स्तरावर सॉफ्टवेअर कार्यान्वीत करून प्रक्रिया राबवावी, वर्ष वर्षभर सुरू असलेला माहितीचा गोंधळ थांबवावा. राज्यातील शिक्षण विभागाला या कामी वर्षभर गुंतवून ठेवून नये. पूर्वी प्रमाणे जिल्हा स्तरावर प्रक्रिया राबवावी.

अशा प्रमुख मागण्या मांडत आदर्श शिक्षक समिती धरणे आंदोलन घोषीत केलेले आहे.

२ टिप्पण्या:

Smart classmate म्हणाले...

नमस्कार,
आपले कार्य नावाप्रमाणेच आदर्श असेच आहे
कोकणातली आंतरजिल्हा बदली झालेले अनेक शिक्षक बांधव अजूनही कार्यमुक्त होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.बदली होऊन तीन चार वर्षे झालीत पण त्यांना न्याय मिळालेला नाही.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत होत आहे.
तरी आपण आपल्या आंदोलनामध्ये *कोकणातील जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे* ही मागणी अग्रक्रमाने घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती
🙏🙏
आपल्या आंदोलनास मनापासून शुभेच्छा
शिक्षक एकजुटीचा विजय असो

Loptop म्हणाले...

मुख्यालयचा प्रश्न हा औरंगाबाद साठी खूप डोकेदुखी झाली आहे